पुस्तक – फुले आणि पत्री (Phule aani patri)
लेखिका – माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १३९
ISBN – 81-7766-736-x

माधुरी शानभाग यांच्या लेखांचा हा संग्रह आहे. त्यांच्या लहानपणच्या आठवणी, छोटे मोठे किस्से, मुलांचे जन्म आणि त्यांना वाढवतानाचे अनुभव, नवी पिढी- जुनी पिढी यांच्या विचारासारणीतले व वागण्यातले फरक असे साधारण विषय आहेत. एकत्र कुटुंबातली धमाल, लग्न सराईचे दिवस, मुलं वाढवताना होणारी दमछाक, हल्लीची कॉलेजमधली पिढी चं वागणं आणि ती वाटते तितकी वाईट नाही असे कितीतरी छोटे मोठे प्रसंग लेखांमध्ये आहेत

अनुक्रमणिका

काही लेखांवर नजर टाकूया.

लेखिकेचे बालपण बेळगावात गेले. तिकडची खास मराठी व मराठी-कानडी-कोंकणी-मालवणी-हिंदी यांच्या एकमेकांवर होणारा परिणाम त्यांना नातेवाईकांच्या बोलण्यात कसा जाणवायचा याबद्दलच्या लेखातला भाग

 

जुन्याकाळाची खेळणी आणि हल्लीच्या मुलांची खेळणी यात कसा फरक पडला आहे. याचं चित्रण करणारा लेख. गंमत म्हणजे लेखातला “हल्ली” हा ९० च्या दशकातला असावा. तो सुद्धा आता किती कालबाह्य झालाय हे आपल्याला वाचताना जाणवतं

 

एकत्र कुटुंबातली, पूर्वीची लग्नं

नातेसंबंध आणि त्यातल्या तडजोडींवर मुक्त चिंतन करणारा लेख

लेखांवरून कळतं की लेखिकेचे लहानपण सुखवस्तू एकत्र कुटुंबात गेले आहे. लग्नानंतर प्राध्यापिका म्हणून नोकरी आणि गृहिणी अश्या दोन्ही जबाबदाऱ्या पाळत भरल्या घरात त्यांचा संसार चालू आहे. त्यामुळे आज साठी-सत्तरीच्या असलेल्या मध्यमवर्गीय, सवर्ण समाजातल्या स्त्रियांचे जे मनोविश्व यात रेखाटले गेले आहे. माझ्या आजीच्या भाषेत अगदी “बायकी” लेख आहेत. भाषा साधी सरळ आहेत. वाचायला कंटाळा येत नाही. पण खूप उत्सुकता वाटेल किंवा खूप वेगळं काही वाचतोय असं सुद्धा वाटत नाही.  स्मरणरंजनातून मनोरंजन करणारं एक हलकं फुलकं पुस्तक म्हणून वाचायला हरकत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/