पुस्तक – प्लँटोन (Planton)
लेखक – डॉ. संजय ढोले (Sanjay Dhole)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ४६२
ISBN -9789392482656
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस पहिली आवृत्ती जानेवारी २०२२
छापील किंमत – ५९५

मराठीत विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबऱ्या ह्यांचं लेखन इतर साहित्यप्रकारांच्या मानाने कमी होतं. त्यामुळे वाचनालयात “प्लँटोन” ही विज्ञानकादंबरी दिसल्यावर उत्सुकतेने हातात घेतली. लेखकाचा परिचय, पाठमजकूर (ब्लर्ब) वाचून खूप आश्वासक वाटली. पण प्रत्यक्ष वाचायला घेतल्यावर निराशा झाली. पहिली १०० पानं वाचली तरी त्यात विज्ञान न येता कादंबरीचा स्थलपरिचय, पात्रपरिचय, कालपरिचय, नेपथ्यरचना ह्यापद्धतीचं लेखनच होतं.

सरकारी वन खात्यात एक अधिकारी/वनपाल बदली होऊन नंदुरबाराच्या जंगलात येतो. तिथे त्याच्या लक्षात येतं की वनखात्याचे अधिकारी, स्थानिक राजकारणी आणि बडी धेंडे ह्यांच्या भ्रष्ट यूतीतून जंगलाचा ऱ्हास होतोय. तसंच इथल्या गरिबांवर आदिवासींवरही अन्याय होतोय. कादंबरीत ही नेपथ्यरचना करण्यात शे-दीडशे पानं घालवली आहेत. तोपर्यंत वैज्ञानिक भाग तर आलाच नव्हता. म्हणून पुढे जरा भराभर वाचलं मुख्य वाक्य वाचून कथानकाचा अंदाज घेत पुढे गेलो.
बऱ्याच पानांनंतर “प्लँटोन” ह्या वैज्ञानिक चमत्काराबद्दल कथानक पुढे सरकायला लागलं होतं. पण त्यातही वैज्ञानिक किचकटपणा होता. अद्भुतरम्यता कमी होती. पुढे हा चमत्कार वापरून गुन्हेगार कसे शोधले; नायक, नायिका त्यांच्या जोड्या ह्यांनी अन्यायाला वाचा कशी फोडली असं सगळं वर्णन आहे.
टीव्ही वर खाण्यापिण्यावरच्या कार्यक्रमात पाककृती सांगताना “नमक स्वादानुसार .. / चवीपुरते मीठ ..” असं सांगतात तसं इथे चिमटीभर विज्ञान पातेलंभर सामाजिक विषयात घातलंय. सामाजिक विषयातही नवखेपण नाही. निवेदन शैली रटाळ आहे. त्यामुळे ४६२ पानांपैकी उरलेली ३०० पाने (म्हणजे जवळजवळ तीन पुस्तकांचा ऐवज) सविस्तरपणे वाचावीत असं वाटलं नाही. त्यामुळे पुढची पाने वरवर चाळून संपवली.काही पाने उदाहरणादाखल…
नवीन वनपाल त्याच्या क्षेत्रातल्या वैज्ञानिक संस्थेला भेट देतो तो प्रसंग


वनस्पतींना भावना असतात, स्मृती असते ह्याबद्दलचे संशोधन पुढे मांडले जाते तो भाग

नायक, नायिका धाडस करून गुन्हेगारांचा माग काढतात तो भाग.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती

तुम्ही ही कादंबरी वाचली असेल किंवा नंतर वाचलीत तर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/