पुस्तकाचे नाव – प्रार्थना

लेखिका – माधवी देसाई

निसर्गरम्य गोव्यातल्या एका खेडेगावातल्या पात्रांवर अधारलेली ही कादंबरी आहे. कादंबरीतलं प्रत्येकजण आपपल्या परीने वेगवेगळ्या समस्यांशी झुंजतो आहे – कोणी गरीबीशी, कोणी नवऱ्याच्या स्वभावाशी, कोणी सामाजिक परिस्थितीशी, कोणी जोडपे परधर्मी विवाहाल्या होणाऱ्या विरोधाशी, एका चर्चचा फादर चर्चच्या कठोर नियमांशी,  ई.

एकाच गावात राहणारे गावकरी या अर्थाने ही सर्व पात्रे एकमेकांशी संबंध असणारीच आहेत. पण या पात्रांचे परस्परसंबंध बदलतात, दुरावततात ते नव्याने समोर ठाकलेल्या समस्यांमुळे. आणि समस्यांची उकल करताना काही पात्रांचे संबंध वेगळ्या पद्धतीने नव्याने जुळतात. असा एकूण कादंबरीचा प्रवास आहे.

कादंबरी छान आहे.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-


———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-