पुस्तक – पुढारी दीपस्तंभ दिवाळी अंक २०२१ (Pudhari Deepastambh Diwali Edition 2021)
भाषा – मराठी
पाने – २८८

हा दिवाळी अंक खूप लेख, थोड्या कथा आणि काही कविता असा भरगच्च मजकूर असलेला आहे. २ पानी लेख, थोडे मोठे लेख आणि काही दीर्घ लेख असे बरेच आहेत. त्यामुळे सगळ्या लेखांबद्दल लिहिणं कठीण आहे. अनुक्रमणिकेवरून विषयांचा अंदाज येईल.

अनुक्रमणिका

 

काही लेखांची झलक देतो.

कोरोना महामारी आणि लोकडाऊनमुळे अनेकांच्या नोरकरीवर, व्यवसायावर गदा आली. अनेकांना व्यवसाय बदलावे लागले, कमी उत्पन्नावर काम करावे लागले. अश्या ह्या बदलाबदलीच्या काळात ज्यांनी स्वतःत, स्वतःच्या उद्योगात खास बदल करून नवीन भरारी घेतली अश्या लोकांच्या यशोगाथा एका भागात आहेत. उदा.

कोकणातल्या कातळशिल्प अथवा खोदचित्रांची ओळख करून देणारा दीर्घ लेख

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक ह्यांच्या कार्यशैलीचा वेध घेणारा छोटा लेख

फेसबुक , व्हॉटसवपर तुम्हाला विनोदी चित्र येत असतील ज्यात एकदोन वेगवेगळी दृश्य आणि काही मजकूर टाकून धमाल विनोदी टिप्पणी केलेली असते. त्यांना मीम(meme ) म्हणतात.  (मला त्यासाठी सुचलेला शब्द म्हणजे मी त्यांना “थट्टाचित्र”).  तर हे मिम्स नवीन पिढीच्या अभिव्यक्तीचा खास आविष्कार आहे. मराठीत अशी चित्र बनवणाऱ्या वैभव भिवरकर यांनी मिम्स म्हणजे काय, कशी तयार करतात वगैरे माहिती देणारा लेख लिहिला आहे. असाच एक लेख तरुणाईला भुरळ घालणाऱ्या गेमिंग इंडस्ट्री बद्दल आहे.
या अंकात “कष्टकऱ्यांच्या कविता” अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन नेहमीपेक्षा वेगळ्या कवींची कला सादर केली आहे. कविता भाग मी टाळतोच. ह्यातला सुद्धा टाळलाच.
एका आगामी कादंबरीचा काही भाग
भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ वर थोडीच पुस्तकं लिहिली गेली आहेत.  त्या पुस्तकांचा आढावा घेणारा एक लेख

अंकांमधले छोटे लेख फारच त्रोटक वाटले तरी ते अनोख्या व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देतात. मध्यम आकाराचे लेख विषयाची फार वरवर माहिती देतात. दीर्घ लेख खरे माहितीपूर्ण आहेत. तुम्हाला बरेच लेख वाचायला आवडतील.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/