(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

ராதை மனதில் ராதை மனதில் என்ன ரகசியமோ
रादै मनदिल् रादै मनदिल् एन्न रगसियमो (राधेच्या मनात, राधेच्या मनात काय रहस्य आहे ?)
கண் ரெண்டும் தந்தியடிக்க கண்ணா வா கண்டு பிடிக்க..
कण् रॆंडुम् तंदियडिक्क कण्णा वा कंडु पिडिक्क (दोन्ही डोळे इशारे देतायत, कान्हा ये शोधायला )

ராதை மனதில் ராதை மனதில் என்ன ரகசியமோ
रादै मनदिल् रादै मनदिल् एन्न रगसियमो (राधेच्या मनात, राधेच्या मनात काय रहस्य आहे ?)
கண் ரெண்டும் தந்தியடிக்க கண்ணா வா கண்டு பிடிக்க..
कण् रॆंडुम् तंदियडिक्क कण्णा वा कंडु पिडिक्क (दोन्ही डोळे इशारे देतायत, कान्हा ये शोधायला )

கொள்ளை நிலவடிக்கும் வெள்ளை ராத்திரியில் கோதை ராதை நடந்தால்..
कॊळ्ळै निलवडिक्कुम् वॆळ्ळै रात्तिरियिल् कोदै रादै नडन्दाल् (चोरी घडत असलेल्या शुभ्र रात्री, केशसंभार असणारी राधा जात असेल )
மூங்கில் காட்டில் ஒரு கானம் கசிந்தவுடன் மூச்சு வாங்கி உறைந்தாள்..
मूंगिल् काट्टिल् ऒरु गानम् कसिन्दवुडन् मूच्चु वांगि उरैन्दाळ् (बांबूच्या वनातून गाणं ऐकू येऊ लागताच ती चकित होऊन स्तब्ध झाली)

பாடல் வந்த வழி ஆடை பறந்ததையும் பாவை மறந்து தொலைந்தாள்..
पाडल् वन्द वळि आडै परन्ददैयुम् पावै मरन्दु तॊलैन्दाळ् (गाणं येत होतं त्या दिशेने तिचे तिचे कपडेही उडून गेल्याचे तिच्या लक्षात आले नाही)
நெஞ்சை மூடிக் கொள்ள ஆடை தேவை என்று நிலவின் ஒளியை இழுத்தாள்..
नॆंजै मूडिक्कॊळ्ळ आडै तेवै एन्रु तेवै निलविन् ऒळियै इळुत्ताळ् ( छाती झाकायला कपडे हवेत म्हणून चंद्राचे चांदणे ओढले)

நெஞ்சின் ஓசை ஒடுங்கிவிட்டால்..
नॆंजिन् ओसै ऒडुंगिविट्टाल् (छातीतली धडधड कमी झाली तरी)
நிழலை கண்டு நடுங்கிவிட்டாள்..
निळलै कंडु नडुंगिविट्टाळ् (सावली बघून ती थरथरू लागली)
கண்ணன் தேடி வந்த மகள்..
कण्णन् तेडि वन्द मगळ् (कान्हाला शोधायला आलेली मुलगी)
தன்னை தொலைத்து மயங்கிவிட்டாள்..
तन्नै तॊलैत्तु मयंगिविट्टाळ् (स्वतःला हरवून मूर्च्छित झाली)

தான் இருக்கின்ற இடத்தினில் இருதயம் காணவில்லை
तान् इरुक्किन्र इडत्तिल् इरुदयम् काणविल्लै (ती होती तिथे तिचे हृदय नव्हते)
எங்கே எங்கே சொல் சொல்..
एंगे एंगे सॊल् सॊल् (कुठे आहे ? कुठे आहे ? सांग सांग )

கண் ரெண்டும் தந்தியடிக்க.. கண்ணா வா கண்டுபிடிக்க..
कण् रॆंडुम् तंदियडिक्क कण्णा वा कंडु पिडिक्क (दोन्ही डोळे इशारे देतायत, कान्हा ये शोधायला )

ராதை மனதில் ராதை மனதில் என்ன ரகசியமோ
रादै मनदिल् रादै मनदिल् एन्न रगसियमो (राधेच्या मनात, राधेच्या मनात काय रहस्य आहे ?)
கண் ரெண்டும் தந்தியடிக்க கண்ணா வா கண்டு பிடிக்க..
कण् रॆंडुम् तंदियडिक्क कण्णा वा कंडु पिडिक्क (दोन्ही डोळे इशारे देतायत, कान्हा ये शोधायला )

கண்ணன் ஊதும் குழல் காற்றில் தூங்கிவிட்டு காந்தம் போல இழுக்கும்..
कण्णन् ऊदुम् कुळल् काट्रिल् तूंगिविट्टु कांदम् पोल इळुक्कुम् (कान्हा वाजवत असलेली बासरी वाऱ्यावर विहरत चुंबकाप्रमाणे खेचत होती)
மங்கை வந்தவுடன் மறைந்து கொள்ளுவது மாய கண்ணன் வழக்கம்..
मंगै वन्दवुडन् मरैन्दु क्कॊळ्ळुवदु माय कण्णन् वळक्कम् (गोपी आल्यावर लपून जाणे ही तर त्या मायावी कान्हाची सवयच)
காடு இருண்டு விட கண்கள் சிவந்து விட காதல் ராதை அலைந்தால்..
काडु इरण्डु विड कण्गळ् सिवन्दु विड कादल् रादै अलैन्दाल् (जंगल अंधारलं, डोळे लाल झाले, आणि राधा इकडून तिकडे जात राहिली)
அவனை தேடி அவள் கண்ணை தொலைத்து விட்டு ஆசை நோயில் விழுந்தால்..
अवनै तेडि अवळ् कण्णै तॊलैत्तुविट्टु आसै नोयिल् विळुन्दाल् (त्याला शोधता शोधता डोळे थकून ती इच्छापीडेने त्रासली)

உதடு துடிக்கும் பேச்சு இல்லை ..
उदडु तुडिक्कुम् पेच्चु इल्लै (ओठ हलतायत पण शब्द नाही)
உயிரும் இருக்கு மூச்சு இல்லை ..
उयिरुम् इरुक्क मूच्चु इल्लै (जीव आहे पण श्वास नाही)
வந்த பாதை நினைவு இல்லை ..
वन्द पादै निनैवु इल्लै (टी आली तो मार्ग आठवत नाहीये)
போகும் பாதை புரியவில்லை..
पोगुम् पादै पुरियविल्लै (कुठे जायचं ते समाजत नाहीये)

உன் புல்லாங்குழல் சத்தம் வந்தால் பேதை ராதை ஜீவன் கொள்வாள்
उन् पुल्लांगुळल् सत्तम् वन्दाल् बेदै रादै जीवन् कॊळ्वाळ् (तुझ्या बासरीचे स्वर आले तर बिचारी राधेच्या जीवात जीव येईल)
கண்ணா இங்கே வா வா..
कण्णा इंगे वा वा (कान्हा इकडे ये ये )
கண்ணீரில் உயிர் துடிக்க..
कण्णीरिल् उयिर् तुडिक्क (अश्रूंमध्ये जीव तडफडतो आहे)
கண்ணா வா உயிர் கொடுக்க..
कण्णा वा उयिर् कॊडुक्क (कान्हा ये जीवन द्यायला)

ராதை மனதில் ராதை மனதில் என்ன ரகசியமோ
रादै मनदिल् रादै मनदिल् एन्न रगसियमो (राधेच्या मनात, राधेच्या मनात काय रहस्य आहे ?)
கண் ரெண்டும் தந்தியடிக்க கண்ணா வா கண்டு பிடிக்க..
कण् रॆंडुम् तंदियडिक्क कण्णा वा कंडु पिडिक्क (दोन्ही डोळे इशारे देतायत, कान्हा ये शोधायला )

கன்னம் தீண்டியதும் கண்ணன் என்று அந்த கன்னி கண்கள் விழித்தாள்..
कन्नम् तीण्डियदुम् कण्णन् एन्रु अंद कन्नि कण्गळ् विळित्ताळ् (हनुवटीला स्पर्श झाल्यावर तो कान्हा आहे असं वाटून त्या स्त्रीचे डोळे उघडले)
கன்னம் தீண்டியது கண்ணன் அல்ல வெறும் காற்று என்று திகைத்தாள்..
कन्नम् तीण्डियदु कण्णन् अल्ल वॆरुम् काट्रु एन्रु तिगैत्ताळ् (पण हनुवटीला स्पर्श करणारा कान्हा नाही, केवळ वारा हे बघून चकित झाली)
கண்கள் மூடிக்கொண்டு கண்ணன் பேரை சொல்லி கைகள் நீட்டி அழைத்தாள்..
कण्गळ् मूडिक्कॊण्डु कण्णन् पेरै सॊल्लि कैगळ् नीट्टि अळैत्ताळ् (डोळे बंद करून हात उंचावून ती कान्हाचं नाव घेऊन पुकारू लागली)
காட்டில் தொலைத்துவிட்ட கண்ணின் நீர் துளியை இங்கு கண்டு பிடித்தாள்..
काट्टिल् तॊलैत्तुविट्ट कण्णिन् नीर् तुळियै इंगु कंडु पिडित्ताळ् (वनात हरवून डोळ्यांतले अश्रूच तिला सापडले)

கிளியின் சிறகை வாங்கிக்கொண்டு..
किळियिन् सिरगै वांगिक्कॊण्डु (पोपट पक्ष्याकडून पंख घेऊन)
கிழக்கு நோக்கி சிறகடித்தாள்..
किळक्कु नोक्कि सिरगडित्ताळ् (पूर्वेच्या दिशेने निघाले)
குயிலின் குரலை வாங்கிக்கொண்டு..
कुयिलिन् कुरलै वांगिक्कॊण्डु (कोकिळेचा आवाज घेऊन)
கூவி கூவி அவள் அழைத்தாள்..
कूवि कूवि अवळ् अळैत्ताळ् (कुहू कुहू पुकारत राहिली)

அவள் குறை உயிர் கரையும்முன் உடல் மண்ணில் சரியும்முன்
अवळ् कुरै उयिर् करैयुम्मुन् उडल् मण्णिल् सरियुम्मुन् (तिचे क्षीण झालेले प्राण नाहीसे होण्या अगोदर, शरीर ह्या मातीत पडण्याआधी)
கண்ணா கண்ணா நீ வா..
कण्णा कण्णा नी वा (कान्हा कान्हा तू ये )

கண்ணீரில் உயிர் துடிக்க..
कण्णीरिल् उयिर् तुडिक्क (अश्रूंमध्ये जीव तडफडतो आहे)
கண்ணா வா உயிர் கொடுக்க..
कण्णा वा उयिर् कॊडुक्क (कान्हा ये जीवदान द्यायला)

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe