पुस्तक : सती ते सरोगसी (Satee te sarogasee)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १७६
ISBN : 978-93-86628-38-1
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे भारतातल्या महिला कायद्यात होत गेलेले बदल, सुधारणा यांचा मागोवा घेणारे हे पुस्तक आहे. ब्रिटिश राजवटीत सतीबंदीचा कायदा करण्यात आला तिथपासून २०१७ सालच्या अखेरीपर्यंतचा कालखंड यात समाविष्ट आहे. सतीबंदी, विधवापुनर्विवाहाला मान्यता, संमतीवयाचा कायदा, हिंदू विवाह कायदा, घटस्फोट आणि पोटगी, महिला आरक्षण, महिला अत्याचार प्रतिबंध अशा बऱ्याच कायद्यांचा आणि घडामोडींचा समावेश यात आहे.
अनुक्रमणिका :
कायदा करावा लागला तेव्हा सामाजिक परिस्थिती काय होती, कायद्याच्या मागण्या कशा पुढे येत होत्या, एखादी विशिष्ट घटनेमुळे कायदा करणं कसं भाग पडलं, साधारण कायद्याचे स्वरूप काय आहे अशी माहिती पुस्तकात आहे. उदा. सतीबंदी कायदा करावा लागला तेव्हा सतीची प्रथा का पुढे आली आणि कश्या पद्धतीने अंमलात येत होती त्याबद्दल.
(फोटोंवर क्लिककरून झूम करून वाचा)
कायदे बनले तेव्हा एका झटक्यात परिपूर्ण कायदा बनला असं नाही तर वेळोवेळी कायद्यात सुधारणा करण्यात आला. त्यातल्या स्वातंत्र्यानंतर दत्तक कायदा झाला त्याच्या प्रक्रियेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.
या पुस्तकात कायद्यांची चर्चा करताना त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचीही सविस्तर माहिती दिली आहे. उदा. विशाखा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी
शेवटच्या प्रकरणात सध्याचे कायदे, त्यांच्यातल्या कमतरता, कायद्याचा आदर्श पद्धतीने न होणारा वापर, कायद्याबद्दलची निरक्षरता यांच्यावरही प्रकाश टाकला आहे.
पुस्तकाच्या शेवटी ११ परिशिष्टे आहेत. “..तर काय करावं” हे सांगणारी ही परिशिष्टे आहेत म्हणजे अटीततीच्या प्रसंगात कायदा काय सांगतो; कायद्याची मदत घेताना काय प्राथमिक तयारी केली पाहिजे यावरची टिपणे यात आहेत.
त्यात उल्लेख झालेल्या घटना
पोलिसांची मदत घ्यायची असल्यास …
वकील नेमण्याची वेळ आली तर …
कोर्टात खेचण्याची धमकी कोणी देत असल्यास …
बलात्काराचा प्रसंग ओढवल्यास … इ.
एक उदाहरण
अश्याप्रकारे माहितीने भरलेलं असे हे पुस्तक आहे. कायद्याची साक्षरता वाढवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने हे वाचलेच पाहिजे.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-