(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

ஸ்ரீராமா என அழைத்துப் பாருங்கள் (श्रीरामा एन अऴैत्तुप् पारुंगळ्)
श्रीरामा अशी म्हणून हाक मारून बघा
இளந்தென்றல் உடன்வீசும் பாருங்கள் (इळन्तॆन्रल् उडन्वीसुम् पारुंगळ् )
ताजी हवा वाहू लागेल, पहा / तुम्ही ताजेतवाने व्हाल, पहा
ஸ்ரீராமா என சொல்லிப் பாருங்கள் (श्रीरामा एन सॊल्लिप् पारुंगळ् )
श्रीरामा असं म्हणून बघा
உடன் இன்ப இசை ஒலிக்கும் கேளுங்கள் (उडन् इन्ब इसै ऒलिक्कुम् केळुंगळ् )
त्याबरोबर गोड संगीत गुंजू लागेल, ऐका

தந்தை சொல்லை காத்திடவே வனமே சென்றவன் (तन्दै सोल्लै कात्तिडवे वनमे सॆन्रवन् )
वडिलांच्या शब्दासाठी वनात गेला
தாயாம் ஜானகியின் குணமே நிறைந்தவன் (तायाम् जानकियिन् गुणमे निरैन्दवन् )
माता जानकीच्या गुणांनी पूर्ण झालेला

நம்பினோரை கரமே தந்து காத்து நிற்பவன் (नम्बिनोरै करमे तन्दु कात्तु निऱ्पवन् )
त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी (मदतीचा ) हात पुढे करून उभा राहणार

நலமே தந்து குடும்பத்திலே மகிழ்வு தருபவன் (नलमे तन्दु कुडुंबत्तिलेमकिऴ्वु तरुबवन्)
सुख देऊन कुटुंबात आनंद देणारा
நலமே தந்து குடும்பத்திலே மகிழ்வு தருபவன் (नलमे तन्दु कुडुंबत्तिलेमकिऴ्वु तरुबवन्)
सुख देऊन कुटुंबात आनंद देणारा

ஸ்ரீராமா என அழைத்துப் பாருங்கள் (श्रीरामा एन अऴैत्तुप् पारुंगळ्)
श्रीरामा अशी म्हणून हाक मारून बघा
இளந்தென்றல் உடன்வீசும் பாருங்கள் (इळन्तॆन्रल् उडन्वीसुम् पारुंगळ् )
ताजी हवा वाहू लागेल, पहा / तुम्ही ताजेतवाने व्हाल, पहा

அன்பு அணைப்பு பாசமாக குகனை கண்டவன் (अन्बु अणैप्पु पासमाग गुगनै कण्डवन् )
निषादराज गुहाला प्रेमालिंगन देऊन मायेने पाहणारा
பண்பு நேர்மை நீதி என்று வழியில் நடந்தவன் (पण्बु नेर्मै नीति एन्रु वऴियिल् नडन्दवन् )
चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाच्या मार्गावर चालणारा
அன்பு அணைப்பு பாசமாக குகனை கண்டவன் (अन्बु अणैप्पु पासमाग गुगनै कण्डवन् )
निषादराज गुहाला प्रेमालिंगन देऊन मायेने पाहणा
பண்பு நேர்மை நீதி என்று வழியில் நடந்தவன் (पण्बु नेर्मै नीति एन्रु वऴियिल् नडन्दवन् )
चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि न्यायाच्या मार्गावर चालणारा
மனித குலம் வாழ்ந்திடவே தன் வாழ்வை தந்தவன் (मनिद कुलम् वाऴ्न्दिडवे तन् वाऴ्वै तन्दवन्)
मानवजातीने जगावे म्हणून त्याने आपले जीवन व्यतीत करणारा

ஏகபத்தினி விரதன் காத்த கலை நாயகன் (एकपत्तिनि विरदन् कात्त कलै नायकन्)
एकपत्नीव्रत पाळणारा, कलानायक
ஏகபத்தினி விரதன் காத்த கலை நாயகன் (एकपत्तिनि विरदन् कात्त कलै नायकन्)
एकपत्नीव्रत पाळणारा, कलानायक

ஸ்ரீராமா என அழைத்துப் பாருங்கள் (श्रीरामा एन अऴैत्तुप् पारुंगळ्)
श्रीरामा अशी म्हणून हाक मारून बघा
இளந்தென்றல் உடன்வீசும் பாருங்கள் (इळन्तॆन्रल् उडन्वीसुम् पारुंगळ् )
ताजी हवा वाहू लागेल, पहा / तुम्ही ताजेतवाने व्हाल, पहा

சத்திய மைந்தன் ஸ்ரீராமனையே நாடிச் செல்லுங்கள் (सत्तिय मैन्दन् श्रीरामनैये नाडिच् चॆल्लुङ्कळ् )
सत्यासाठी लढणाऱ्या श्रीरामाच्या (प्राप्तीच्या) शोधात चला
வாய்மை காத்த வள்ளலையே எண்ணி வாழுங்கள் (वाय्मै कात्त वळ्ळलैये एण्णि वाऴुङ्कळ् )
सत्याची कास घरून मुक्ती प्राप्त करून जागा

இருண்ட உங்கள் வாழ்வினிலே புது ஒளியே தோன்றிடும் (इरुण्ड उंगळ् वाऴ्विनिले पुदु ऒळिये तोन्रिडुम् )
अंधारलेल्या तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश दिसेल

இன்னல் யாவும் ஸ்ரீராமன் அருளால் மறைந்தே போய்விடும் (इन्नल् यावुम् श्रीरामन् अरुळाल् मऱैन्दे पोय्विडुम्)
श्रीरामाच्या कृपेने सर्व दुःखे नाहीशी होतील
இன்னல் யாவும் ஸ்ரீராமன் அருளால் மறைந்தே போய்விடும் (इन्नल् यावुम् श्रीरामन् अरुळाल् मऱैन्दे पोय्विडुम्)
श्रीरामाच्या कृपेने सर्व दुःखे नाहीशी होतील

ஸ்ரீராமா என அழைத்துப் பாருங்கள் (श्रीरामा एन अऴैत्तुप् पारुंगळ्)
श्रीरामा अशी म्हणून हाक मारून बघा
இளந்தென்றல் உடன்வீசும் பாருங்கள் (इळन्तॆन्रल् उडन्वीसुम् पारुंगळ् )
ताजी हवा वाहू लागेल, पहा / तुम्ही ताजेतवाने व्हाल, पहा
ஸ்ரீராமா என சொல்லிப் பாருங்கள் (श्रीरामा एन सॊल्लिप् पारुंगळ् )
श्रीरामा असं म्हणून बघा
உடன் இன்ப இசை ஒலிக்கும் கேளுங்கள் (उडन् इन्ब इसै ऒलिक्कुम् केळुंगळ् )
त्याबरोबर गोड संगीत गुंजू लागेल, ऐका

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link