(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
சிநேகிதனே சிநேகிதனே ரகசிய சிநேகிதனே… (स्नेगिदने स्नेगिदने रगसिय स्नेगिदने)
मित्रा मित्रा माझे गुपित अशा मित्रा
சின்ன சின்னதாய் கோரிக்கைகள்…(चिन्न चिन्नदाय् कोरिक्कैगळ्)
छोट्या छोट्याच माझ्या मागण्या
செவி கொடு சிநேகிதனே…(सॆवि कॊडु स्नेगिदने)
लक्ष दे त्यांच्याकडे मित्रा
இதே அழுத்தம் அழுத்தம்…(इदे अऴुत्तम् अऴुत्तम्)
हीच तीव्रता तीव्रता
இதே அணைப்பு அணைப்பு…(इदे अणैप्पु अणैप्पु)
हीच मिठी मिठी
வாழ்வின் எல்லை வரை வேண்டும் வேண்டும்…(वाऴ्विन् एल्लै वरै वेंडुम् वेंडुम्)
आयुष्याच्या शेवटापर्यंत हवी आहे हवी आहे
வாழ்வின் எல்லை வரை வேண்டும் வேண்டுமே…(वाऴ्विन् एल्लै वरै वेंडुम् वेंडुमे)
आयुष्याच्या शेवटापर्यंत हवी आहे हवीच आहे
சிநேகிதனே… சிநேகிதனே ரகசிய சிநேகிதனே…(स्नेगिदने स्नेगिदने रगसिय स्नेगिदने)
मित्रा मित्रा माझे गुपित अशा मित्रा
சின்னச் சின்ன அத்துமீறல் புரிவாய்…(चिन्नच् चिन्न अत्तुमीऱल् पुरिवाय्)
छोट्या छोट्या मर्यादा ओलांडशील
என் செல் எல்லாம் பூக்கள் பூக்கச் செய்வாய்…(एन् सॆल् एल्लाम् पूक्कळ् पूक्कच् चॆय्वाय्)
माझ्या सगळ्या पेशींमध्ये फुले फुलवशील
மலா்களில் மலா்வாய்…(मलर्गळिल् मलर्वाय्)
फुलांमध्ये तू फुलशील
பூப்பறிக்கும் பக்தன் போல மெதுவாய்…(पूप्पऱिक्कुम् बक्तन् पोल मॆदुवाय्)
फुले वेचणाऱ्या एखाद्या भक्ताप्रमाणे, हळुवारपणे
நான் தூங்கும் போது விரல் நகம் களைவாய்…(नान् तूङ्कुम् बोदु विरल् नगम् कळैवाय्)
मी निजलेले असताना माझ्या बोटांची नखं कापून देशील
சத்தமின்றி துயில்வாய்…(सत्तमिऩ्ऱि तुयिल्वाय्)
आवाज न करता शांत झोपशील
ஐவிரல் இடுக்கில் ஆலிவ் எண்ணெய் பூசி…(ऐविरल् इडुक्किल् आलिव् एण्णॆय् पूसि)
माझ्या पाची बोटांमध्ये ऑलिव्ह तेल लावून
சேவையும் செய்ய வேண்டும்…(सॆवैयुम् सॆय्य वेंडुम्)
सेवा करशील
நீ அழும்போது நான் அழ நோ்ந்தால்…(नी अऴुम्बोदु नान् अऴ नेर्न्दाल्)
तू रडताना मीही रडते आहे बघितल्यावर
துடைக்கின்ற விரல் வேண்டும்…(तुडैक्किऩ्ऱ विरल् वेंडुम्)
अश्रू पुसणारे बोट हवे
சிநேகிதனே சிநேகிதனே ரகசிய சிநேகிதனே… (स्नेगिदने स्नेगिदने रगसिय स्नेगिदने)
मित्रा मित्रा माझे गुपित अशा मित्रा
சின்ன சின்னதாய் கோரிக்கைகள்…(चिन्न चिन्नदाय् कोरिक्कैगळ्)
छोट्या छोट्याच माझ्या मागण्या
செவி கொடு சிநேகிதனே…(सॆवि कॊडु स्नेगिदने)
लक्ष दे त्यांच्याकडे मित्रा
நேற்று முன்னிரவில்…(नेट्रु मुऩ्ऩिरविल्)
कल पूर्वरात्री
உன் நித்திலப்பூ மடியில்…(उन् नित्तिलप्पू मडियिल्)
तुझ्या मोत्यांच्या फुलासारख्या मांडीवर
காற்று நுழைவது ஓ…(काट्रु नुऴैवदु ओ)
वाऱ्याची झुळूक आली
உயிர் கலந்து களித்திருந்தேன்…(उयिर् कलन्दु कळित्तिरुन्देन्)
मी आनंदाने भरून गेलो.
இன்று விண்ணிலவில் அந்த ஈர நினைவில்…(इऩ्ऱु विण्णिलविल् अन्द ईर निनैविल्)
आज चांदण्यात त्या आठवणीत भिजलेला
கன்று தவிப்பது ஓ…(कऩ्ऱु तविप्पदु ओ)
मी झुरतो आहे
மனம் கலங்கி புலம்புகிறேன்…(मनम् कलंगि पुलम्बुगिऱेन्)
मनातून उदास झालो आहे
கூந்தல் நெளிவில் எழில் கோலச்சரிவில்…(कून्दल् नॆळिविल् एऴिल् कोलच्चरिविल्)
केसांच्या बटांच्या सुंदर वळणांत
கூந்தல் நெளிவில் எழில் கோலச்சரிவில்…(कून्दल् नॆळिविल् एऴिल् कोलच्चरिविल्)
केसांच्या बटांच्या सुंदर वळणांत
கா்வம் அழிந்ததடி… என் கா்வம் அழிந்ததடி…(कर्वम् अऴिन्ददडि एन् कर्वम् अऴिन्ददडि)
गर्व गळून पडला .. माझा गर्व गळून पडला
சொன்னதெல்லாம் பகலிலே புரிவேன்…(सॊऩ्ऩदॆल्लाम् पगलिले पुरिवेन्)
सांगितलेलं सगळं दिवसा समजून घेईन
சொன்னதெல்லாம் பகலிலே புரிவேன்…(सॊऩ्ऩदॆल्लाम् पगलिले पुरिवेन्)
सांगितलेलं सगळं दिवसा समजून घेईन
நீ சொல்லாததும் இரவிலே புரிவேன்…(नी सॊल्लाददुम् इरविले पुरिवेन्)
तू न सांगितलेलंही रात्री समजेल
காதில் கூந்தல் நுழைப்பேன்…(कादिल् कून्दल् नुऴैप्पेन्)
तुझ्या कानात केस घालीन(गुदगुल्या करेन)
உந்தன் சட்டை நானும் போட்டு அலைவேன்…(उन्दन् चट्टै नानुम् पोट्टु अलैवेन्)
तुझा शर्ट घालून फिरेन
நீ குளிக்கையில் நானும் கொஞ்சம் நனைவேன்…(नी कुळिक्कैयिल् नानुम् कॊंजम् ननैवेन्)
तू अंघोळ करताना मीही थोडी भिजेन
உப்பு மூட்டை சுமப்பேன்…(उप्पु मूट्टै सुमप्पेन्)
मिठाचं पोतं उचलेन (तुला पाठीवर घेऊन फिरेन)
உன்னை அள்ளி எடுத்து உள்ளங்கையில் மடித்து…(उन्नै अळ्ळि एडुत्तु उळ्ळंगैयिल् मडित्तु)
तुला गोळा करून ओंजळीत बंद करून
கைக்குட்டையில் ஒளித்துக் கொள்வேன்…(कैक्कुट्टैयिल् ऒळित्तुक् कॊळ्वेन्)
माझ्या रुमालात लपवेन
வெளிவரும் போது விடுதலை செய்து…(वेळिवरुम् बोदु विडुदलै सॆय्दु)
तू बाहेर येताना तुझी सुटका करून
வேண்டும் வரம் வாங்கிக் கொள்வேன்…(वेंडुम् वरम् वांगिक् कॊळ्वेन्)
हवा तो वर मागून घेईन
சிநேகிதனே சிநேகிதனே ரகசிய சிநேகிதனே… (स्नेगिदने स्नेगिदने रगसिय स्नेगिदने)
मित्रा मित्रा माझे गुपित अशा मित्रा
சின்ன சின்னதாய் கோரிக்கைகள்…(चिन्न चिन्नदाय् कोरिक्कैगळ्)
छोट्या छोट्याच माझ्या मागण्या
செவி கொடு சிநேகிதனே…(सॆवि कॊडु स्नेगिदने)
लक्ष दे त्यांच्याकडे मित्रा
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

