पुस्तक : Songs of Kabir (सॉंग्स ऑफ कबीर)

भाषांतर : Rabindranath Tagore (रविंद्रनाथ ठाकुर (टागोर))

भाषा : English इंग्रजी 

पाने : ६७

ISBN : 978-1-61640-448-2


कबीरांच्या गाण्यांचे/दोह्यांचे रविंद्रनाथ ठाकुरांनी केलेली इंग्रजी भाषांतरांचं हे पुस्तक आहे. १०० दोह्यांचं भाषांतर आहे. उदा.



सुरुवातील कबीरांचे संक्षिप्त चरित्र आणि त्यांचे तत्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा आणि त्यांच्या तत्व्ज्ञाना प्रमाणेच युरोपियन/ख्रिश्चन समाजात कोण संत, व्यक्ती आणि विचारपरंपरा होऊन गेला यांच्या तौलनिक विचार केला आहे. उदा.



कबीर आणि रविंद्रनाथ ही दोन मोठी नावं जोडलेली असल्याने मी पुस्तक घेतलं. पण कबीरांचा संदेश साधा सोपा आहे – आपल्या आतच परमेश्वर आहे; कुठल्याही धर्माची कर्मकांडं करण्याची काही आवश्यकता नाही, नित्यकाम करत रहा, हे जग नश्वर आहे, सगळी मोहमाया आहे, प्रेम आणि भूतदयेने वागा इ. त्यामुळे एक पाठोपाठ एक वाचत गेलो की एकसुरी वाचन कंटाळवाणे होते. त्यात त्यांचे मूळ दोहेही दिलेले  नसल्याने भाषेचे, शब्दाचे वैशिष्ट्य पण लक्षात येत नाही. त्यामुळे अर्थ कळतो पण भाव भिडत नही. 


अभ्यासूंना वाचायला आवडेल. किंवा परदेशी व्यक्तींना ज्यांना हे भारतीय तत्त्वज्ञान नवीन आहे त्यांना वाचायला चांगलं आहे.



———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-



———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-