पुस्तक – सोपी मोडी पत्रे (Sopi Modi Patre)
लेखक – मंदार लवाटे आणि भास्वती सोमण (Mandar Lawate & Bhaswati Soman)
भाषा – मराठी
पाने – १०४
ISBN – दिलेला नाही

प्राथमिक मोडी लिपी शिकण्यासाठी आवश्यक पुस्तकांबद्दलची माहिती आधीच्या परीक्षणांत आपण बघितली आहे. (त्यांच्या लिंक्स ह्या परीक्षणाच्या अखेरीस दिलेल्या आहेत). मोडी मुळाक्षरं, बाराखडी आणि छापील मजकूर वाचता येऊ लागला की हस्तलिखित कागदपत्रांच्या वाचनाकडे वळायची उत्सुकता वाढते. अश्यावेळी काही जुनी कागदपत्रे अभ्यासाला मिळाली पाहिजे असं वाटतं. पण अभिलेखागार, संग्रहालय, ऐतिहासिक वारसा संस्थांशी संबंध साधून ती कशी मिळवायची हे माहीत नसतं. काही जुन्या कागदांचे ऑनलाईन फोटो मिळाले तरी ते वाचताना एखाद्या शब्दावर गाडी अडली की ती अडलीच. कोणीतरी ते वाक्य खरं काय आहे हे समजावून सांगेपर्यंत प्रगती होत नाही. नुसतं वाचलं तरी त्यातला बारकावा, संक्षिप्त रूपाचा अर्थ कळला नाही तर पुढच्यावेळी पुन्हा हाच गोंधळ होऊ शकतो. प्राथमिक पातळीवरच्या विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी “सोपी मोडी पत्रे” हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे.
लेखकांचे मनोगत
ह्या पुस्तकात ५२ मोडी पत्रे आणि त्यांचे देवनागरी लिप्यांतरण दिलेले आहे. त्या पात्रात वापरलेले कठीण फारसी शब्द, तारीख आणि संक्षिप्त रूपे ह्यांचा उलगडा लगेचकेलेला आहे. त्यामुळे श्री. लवाटे  व सौ. सोमण जणू आपल्या बाजूला बसूनच आपल्याला मोडीची शिकवणी देत आहेत असे वाटते.
उदा.
बहुतेक पत्रे मराठेशाही-पेशवाई कालखंडातली आहेत. काही पत्रे घरगुती पत्रव्यवहार अश्या स्वरूपातली सुद्धा आहेत. पुस्तक लॉन्ग बुक आकारातील असल्यामुळे मोडी लेखन मोठ्या आकारात बघता येत. देवनागरी लिप्यांतरणांच्या पानावर मात्र “सोपी मोडी लिपी” हे  वाटरमार्क फारच मोठे आणि ठळक आहेत. त्यामुळे ते वाचायला थोडा त्रास होतो. पण ते फार विशेष नाही. तरी पुढच्या आवृत्त्तीत तो बदल करावा असं वाटतं.
देवनागरी लिप्यांतरणाबरोबरच सध्याच्या मराठीत “भाषांतर” दिले असते तर अजून छान झाले असते. म्हणजे  जुन्या शब्दांचा अर्थ डोक्यात पक्का बसायला अजून मदत झाली असती.
श्री. लवाटे  व सौ. सोमण ह्यांनी “टाकाची मोडी पत्रे” हे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. त्याबद्दल पुढच्या परीक्षणात लिहीन. मोडी शिकणाऱ्यांसासाठी फार मोठे काम ह्या दोघांनी केले आहे. त्याबद्दल दोघानांही सादर प्रणाम.
पुस्तक कुठे मिळेल ?
SahyadriBooks.org, Amazon.com, Flipkart.com वर उपलब्ध आहे.
छापील किंमत – रु. १७०/-

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मोडी लिपीशी संबधित इतर पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/