पुस्तक : Squaring the blockchain (स्क्वेअरिंग द ब्लॉकचेन )

लेखक : Kunal Nadwani (कुणाल नंदवानी )

भाषा : English (इंग्रजी )

पाने : १५१

ISBN : 978-93-88150-01-9



Short review in English :


This books given introduction of how blockchain works, how crypto-currencies emerged, their history, how the valuation and exchange of these currencies happen, the frauds and technology handled it.


Then the book analyses the the blockchain technology from different perspectives. How and how much is blockchain decentralised ? blockchain has been thought as very secure one, but what were attacks and security breaches in cryptocurrencies that caused loss of millions. What are the challenges in scalability of blockchain based solution. It also talks as why is it a hype. It talks about failed endevours to force-fit in banking, record keeping, government where major organizations had to call off their projects after spending millions in RnD.


Author does not deny the might of blockchain but asks us to carefully observe all characteristics, trade-offs. He thinks that current hype of blockchain will burst soon and then more mature industry will use it for appropriate use cases.


If you have clear understanding of basic working of blockchain then this book will help you mature your thought process about its applicability. A nice to read small book.


See some photos of the book below after review in Marathi.


मराठीत पुस्तक परीक्षण

“बिटकॉईन” या अभासी चलनाबद्दल तुम्ही कदाचित वाचलं असेल. हे चलन कुठलीही बॅंक, संस्था किंवा सरकार नियंत्रित करत नाही. या चलनाची देवाणघेवाण जगात कुठेही ऑनलाईन होऊ शकते. व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची प्रत्यक्ष ओळख जाहीर न करता यात व्यवहार होऊ शकत असल्याने अवैध धंद्यांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो आणि केला जातो. त्यामुळेच हे चलन वादग्रस्त ठरले आहे. भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही. हे चलन ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्याचं नाव “ब्लॉकचेन”. 


कुठलही तंत्रज्ञान स्वतः नैतिक किंवा अनैतिक नसतं. तर त्याचा वापर कसा केला जातो ते महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे ब्लॉकचेनचे देखील अनेक चांगले उपयोग केले जात आहेत – बँकेमध्ये रेकॉर्ड जतन करण्यासाठी, स्मार्ट-कॉंट्रॅक्ट नोंदणीसाठी, स्थावर मालमत्ता नोंदणी इ. साठी.


“ब्लॉकचेन” कसे चालते, त्याची सुरुवात कशी झाली हा इतिहास सांगितला आहे. मग “ब्लॉकचेन” च्या गुण्धर्मांची सविस्तर चर्चा आहे. ही संकल्पना सर्वांगाने समजून घेण्यासाठीची चर्चा आहे. त्याचे बलस्थानं-व्ययस्थानं काय हे मांडायचा प्रयत्न आहे. 


हे अगदी नवे तंत्रज्ञान असल्याने आयटी क्षेत्रात याबद्दल खूप उत्सुकता आहे, ते वापरून बघण्याची चढाओढ आहे. केवळ नवं तंत्रज्ञान आहे म्हणून ते प्रत्येक ठिकाणी वापरायचा अट्टाहास लोक करतात. त्यातून फायदा होतच नाही त्यामुळे असे प्रकल्प बारगळतात, बंद पडतात. हे विविध क्षेत्रांची उदाहरणं घेऊन लेखकाने स्पष्ट केलं आहे. ब्लॉकचेन कुठे वापरता येईल हे थोडं स्पष्ट केलं आहे.


ब्लॉकचेन शिकण्यासाठी हे पुस्तक नाही. तर ज्यांना ब्लॉकचेन कसं काम करतं हे नीट कळलं आहे त्यांच्यासाठी हे पुढच्या पायरीवर नेणारं पुस्तक आहे.


अनुक्रमणिका / Index



लेखकाबद्दल / About author


Analysing the charactersistics of blockchain. How decentralised is it ?



An example of forced use of blockchain

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा (जमल्यास वाचा)
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————