(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)
என்ன சொல்லி என்னைச் சொல்ல (एन्न सॊल्लि एन्नै चॊल्ल)
काय बोलून (कुठल्या शब्दांत) सांगू माझ्याबद्दल
காதல் என்னைக் கையால் தள்ள (कादल् एन्नै कैयाल् तळ्ळ)
प्रेम माझा हात धरून खेचत आहे
என்ன சொல்லி என்னைச் சொல்ல (एन्न सॊल्लि एन्नै चॊल्ल )
काय बोलून (कुठल्या शब्दांत) सांगू माझ्याबद्दल
காதல் என்னைக் கையால் தள்ள (कादल् एन्नै कैयाल् तळ्ळ)
प्रेम माझा हात धरून खेचत आहे
இதயம்தான் சரிந்ததே உன்னிடம் மெல்ல (इदयम्दान् सरिन्ददे उन्निडम् मॆल्ल)
हृदय तुझ्याजवळ येत आहे हळूहळू
ஸ்வாசமே ஸ்வாசமே (स्वासमे स्वासमे )
(माझ्या) श्वासा, श्वासा
ஜன்னல் காற்றாகி வா (जन्नल् काट्रागि वा)
वाऱ्याप्रमाणे खिडकीतून ये
ஜரிகைப் பூவாகி வா (जरिगै पूवागी वा)
जरतारी फूल बनून ये
மின்னல் மழையாகி வா (मिन्नल् मळैयागि वा)
विजांच्या कडकडाटातल्या पावसाप्रमाणे ये
உயிரின் மூச்சாகி வா (उयिरिन् मूच्चागि वा)
प्राणाच्या श्वासाप्रमाणे ये

வாசமே வாசமே (वासमे वासमे)
हे सुगंधा, सुगंधा
வாசமே வாசமே (वासमे वासमे)
हे सुगंधा, सुगंधा
என்ன சொல்லி என்னைச் சொல்ல (एन्न सॊल्लि एन्नै चॊल्ल)
काय बोलून (कुठल्या शब्दांत) सांगू माझ्याबद्दल
கண்கள் ரெண்டில் கண்கள் செல்ல (कण्गळ् रॆण्डिल् कण्गळ् सॆल्ल)
दोन्ही डोळ्यांत डोळे (नजरेत नजर) मिसळल्यावर
சிறகுகள் முளைக்குதே மனசுக்குள் மெல்ல (सिरगुगळ् मुळैक्कुदे मनसुक्कुळ् मॆल्ल)
पंख फुटतात मनाला हळूहळू
ஜன்னல் காற்றாகி வா (जन्नल् काट्रागि वा)
वाऱ्याप्रमाणे खिडकीतून ये
ஜரிகைப் பூவாகி வா (जरिगै पूवागी वा)
जरतारी फूल बनून ये
மின்னல் மழையாகி வா (मिन्नल् मळैयागि वा)
विजांच्या कडकडाटातल्या पावसाप्रमाणे ये
உயிரின் மூச்சாகி வா (उयिरिन् मूच्चागि वा)
प्राणाच्या श्वासाप्रमाणे ये
இடது கண்ணாலே அகிம்சைகள் செய்தாய் (इडदु कण्णाले अगिम्सैगळ् सॆय्दाय्)
डाव्या डोळ्याने अहिंसा पाळतोस
வலது கண்ணாலே வன்முறை செய்தாய் (वलदु कण्णाले वन्मुरै सॆय्दाय्)
उजव्या डोळ्याने हिंसा करतोस
இடது கண்ணாலே அகிம்சைகள் செய்தாய் (इडदु कण्णाले अगिम्सैगळ् सॆय्दाय्)
डाव्या डोळ्याने अहिंसा पाळतोस
வலது கண்ணாலே வன்முறை செய்தாய் (वलदु कण्णाले वन्मुरै सॆय्दाय्)
उजव्या डोळ्याने हिंसा करतोस
ஆறறிவோடு உயிரது கொண்டேன் (आररिवोडू उयिरदु कॊण्डेन्)
सहा इंद्रियांनी (पंच ज्ञानेंद्रिय आणि मन) जगतो आहे
ஏழாம் அறிவாக காதல் வரக் கண்டேன் (एळाम् अरिवाग कादल् वरक् कण्डेन् )
पण प्रेम हे जणू सातवं इंद्रिय होताना बघतो आहे
இயற்கைக் கோளாறில் இயங்கிய என்னை (इयर्कैक् कोळारिल् इयंगिय एन्नै)
नैसर्गिक (देहसुलभ भावनांच्या) झटापटीत अडकलेल्या मला
செயற்கைக் கோளாக உன்னை சுற்ற வைத்தாய் (सॆयर्कैक् कोळाग उन्नै सुट्र वैत्ताय्)
कृत्रिम उपग्रहाप्रमाणे तुझ्या भोवती फिरते केलेस
அணுசக்திப் பார்வையில் உயிர்சக்தி தந்தாய் (अणुसक्तिप् पार्वैयिल् उयिर्सक्ति तन्दाय्)
अणुशक्ती असलेल्या नजरेने मला प्राणशक्ती दिलीस
அணுசக்திப் பார்வையில் உயிர்சக்தி தந்தாய் (अणुसक्तिप् पार्वैयिल् उयिर्सक्ति तन्दाय्)
अणुशक्ती असलेल्या नजरेने मला प्राणशक्ती दिलीस
ஸ்வாசமே ஸ்வாசமே (स्वासमे स्वासमे )
(माझ्या) श्वासा, श्वासा
இசைத்தட்டு போலே இருந்த என் நெஞ்சை (इसैत्तट्टु पोले इरुन्द एन् नॆंजै)
संगीताच्या तबकडीप्रमाणे असणाऱ्या माझ्या हृदयाला
பறக்கும் தட்டாக பறந்திடச் செய்தாய் (परक्कुम् तट्टाग परन्दिड सॆय्दाय्)
उडत्या तबकडीप्रमाणे उडते केलेस
நதிகளில்லாத அரபுதேசம் நான் (नदिगळिल्लाद अरबुदेसम् नान्)
नदी नसलेल्या अरबस्तानासारखी मी होते
நைல் நதியாக எனக்குள்ளே வந்தாய் (नाइल् नदियाग एनक्कुळ्ळे वन्दाय्)
नाईल नदी होऊन माझ्यात शिरलास
நிலவு இல்லாத புதன் கிரகம் நானே (निलवु इल्लाद बुदन् ग्रगम् नाने )
चंद्र नसलेल्या बुध ग्रहाप्रमाणे मी होतो
முழு நிலவாக என்னுடன் சேர்ந்தாய் (मुळु निलवाग एन्नुडन् सॆर्न्दाय्)
पूर्ण चंद्र होऊन मला मिळालीस
கிழக்காக நீ கிடைத்தாய் விடிந்துவிட்டேனே (किळक्काग नी किडैत्ताय् विडिन्दुविट्टेने)
पूर्व दिशेला तू भेटलास. मी पहाट झाले.
வாசமே வாசமே (वासमे वासमे)
हे सुगंधा, सुगंधा
என்ன சொல்லி (एन्न सॊल्लि)
काय सांगून
என்ன சொல்லி என்னைச் சொல்ல (एन्न सॊल्लि एन्नै चॊल्ल )
काय बोलून (कुठल्या शब्दांत) सांगू माझ्याबद्दल
காதல் என்னைக் கையால் தள்ள (कादल् एन्नै कैयाल् तळ्ळ)
प्रेम माझा हात धरून खेचत आहे
ஜன்னல் காற்றாகி வா (जन्नल् काट्रागि वा)
वाऱ्याप्रमाणे खिडकीतून ये
ஜரிகைப் பூவாகி வா (जरिगै पूवागी वा)
जरतारी फूल बनून ये
மின்னல் மழையாகி வா (मिन्नल् मळैयागि वा)
विजांच्या कडकडाटातल्या पावसाप्रमाणे ये
உயிரின் மூச்சாகி வா (उयिरिन् मूच्चागि वा)
प्राणाच्या श्वासाप्रमाणे ये
ஜன்னல் காற்றாகி வா (जन्नल् काट्रागि वा)
वाऱ्याप्रमाणे खिडकीतून ये
ஜரிகைப் பூவாகி வா (जरिगै पूवागी वा)
जरतारी फूल बनून ये
மின்னல் மழையாகி வா (मिन्नल् मळैयागि वा)
विजांच्या कडकडाटातल्या पावसाप्रमाणे ये
உயிரின் மூச்சாகி வா (उयिरिन् मूच्चागि वा)
प्राणाच्या श्वासाप्रमाणे ये
ஜன்னல் காற்றாகி வா (जन्नल् काट्रागि वा)
वाऱ्याप्रमाणे खिडकीतून ये
ஜரிகைப் பூவாகி வா (जरिगै पूवागी वा)
जरतारी फूल बनून ये
மின்னல் மழையாகி வா (मिन्नल् मळैयागि वा)
विजांच्या कडकडाटातल्या पावसाप्रमाणे ये
உயிரின் மூச்சாகி வா (उयिरिन् मूच्चागि वा)
प्राणाच्या श्वासाप्रमाणे ये
… வாசமே (वासमे)
हे सुगंधा
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe