“रोजा” चित्रपटातील अतिशय लोकप्रिय आणि सुश्राव्य देशभक्तीपर गीत “भारत हमको जान से प्यारा है” चे मूळ तामिळ बोल “तमिळा तमिळा नाळै नम् नाळे” असे आहेत. दोन्ही गाण्यांचा भाव एकच असला तरी शब्द फारच वेगळे आहेत.
தமிழா தமிழா நாளை நம் நாளே
तमिळा तमिळा नाळै नम् नाळे (अरे तमिळ माणसा, अरे तमिळा, उद्या (येणार काळ) आपलाच आहे)
தமிழா தமிழா நாடும் நம் நாடே
तमिळा तमिळा नाडुम् नम् नाडे (तमिळा, तमिळा, देशही आपलाच आहे)
தமிழா தமிழா நாளை நம் நாளே
तमिळा तमिळा नाळै नम् नाळे (तमिळा, तमिळा, उद्या (येणार काळ) आपलाच आहे)
தமிழா தமிழா நாடும் நம் நாடே
तमिळा तमिळा नाडुम् नम् नाडे (तमिळा, तमिळा, देशही आपलाच आहे)
என் வீடு தாய் தமிழ் நாடு என்றே சொல்லடா
एन् वीडु ताय् तमिळनाडु एन्रे सॊल्लडा (माझे घर माता तमिळनाडू हे म्हण रे )
என் நாமம் இந்தியன் என்றே என்றும் நில்லடா
एन् नामम् इंदियन् एन्रे एन्रुम् निल्लडा (मी इंडियन असे नेहमी म्हणत रहा )
தமிழா தமிழா நாளை நம் நாளே
तमिळा, तमिळा, नाळै नम् नाळे
தமிழா தமிழா நாடும் நம் நாடே
तमिळा, तमिळा, नाडुम् नम् नाडे
நிறம் மாறலாம் குணம் ஒன்று தான்
निरम् मारलाम् गुणम् ऒन्रुदान् (रंग बदलू शकतील पण गुण एकच आहेत)
இடம் மாறலாம் நிலம் ஒன்று தான்
इडम् मारलाम् निलम् ऒन्रुदान् (जागा बदलू शकतील पण भूमी एकच आहे)
மொழி மாறலாம் பொருள் ஒன்று தான்
मॊळि मारलाम् पॊरुळ् ऒन्रुदान् (भाषा बदलतील पण भाव एकच आहेत)
கலி மாறலாம் கொடி ஒன்று தான்
कलि मारलाम् कॊडि ऒन्रुदान्. (काळ बदलेल पण झेंडा एकच आहे )
திசை மாறலாம் நிலம் ஒன்று தான்
दिसै मारलाम् निलम् ऒन्रुदान् (दिशा वेगवेगळ्या असतील, भूमी एकाच आहे)
இசை மாறலாம் மொழி ஒன்று தான்
इसै मारलाम् मॊळि ऒन्रुदान् (संगीत बदलेल पण भाषा एकच )
நம் இந்தியா அது ஒன்று தான்
नम् इंदिया अदु ऒन्रुदान् (आपला भारत , तो एकच )
வா
वा (ये !)
தமிழா தமிழா கண்கள் கலங்காதே
तमिळा, तमिळा, कण्गळ् कलंगादे (तमिळा तमिळा डोळे भिजवू नकोस)
விடியும் விடியும் உள்ளம் மயங்காதே
विडियुम् विडियुम् उळ्ळम् मयंगादे (उजाडेल उजाडेल, आतल्या आत हरवू नकोस)
தமிழா தமிழா கண்கள் கலங்காதே
तमिळा, तमिळा, कण्गळ् कलंगादे (तमिळा तमिळा डोळे भिजवू नकोस)
விடியும் விடியும் உள்ளம் மயங்காதே
विडियुम् विडियुम् उळ्ळम् मयंगादे (उजाडेल उजाडेल, आतल्या आत हरवू नकोस)
உனக்குள்ளே இந்திய ரத்தம் உண்டா இல்லையா
उनककुळ्ळे इंदिय रत्तम् उंडा इल्लैया (तुझ्या आत भारतीय रक्त आहे कि नाही ?)
ஒன்றான பாரதம் உன்னை காக்கும் இல்லையா
ऒन्रान बारदम् उन्नै काक्कुम् इल्लैया (एकसंध भारत देश तुझे रक्षण करणार नाही का ?)
தமிழா தமிழா நாளை நம் நாளே
तमिळा, तमिळा, नाळै नम् नाळे
தமிழா தமிழா நாடும் நம் நாடே
तमिळा, तमिळा, नाडुम् नम् नाडे
நவபாரதம் பொதுவானது
नवबारदम् पॊदुवानदु (नवीन भारत सर्वांचा आहे)
இது வேர்வையால் உருவானது
इदु वेर्वैयाल् उरुवानदु (हा घामाने/कष्टाने उभा राहिला आहे)
பல தேகமோ எருவானது
पल देगमो एरुवानदु (अनेकांच्या देहाचे खत झाले (समर्पित झाले))
அதனால் இது உருவானது
अदनाल् इदु उरुवानदु (त्यातून हा घडलेला आहे)
உபகண்டமாய் வலுவானது
उबगंडमाय् वलुवानदु (उपखंडाच्या रूपात शक्तिशाली झाला आहे)
அட வானிலா பிளவென்பது
अड वानिला पिळवॅन्बदु (आकाश दुभंगता येईल का ?)
இம் மண்ணிலா பிரிவென்பது
इम् मण्णिला पिरिवॅन्बदु (ही भूमी दुभंगता येईल का ?)
எழு வா
एळु वा (ऊठ ! ये !)
शेवटच्या ४ ओळींचे शब्द आणि त्यांचा अर्थ ह्यांमध्ये मतभेद आहेत. तमिळ भाषा चांगल्या रीतीने जाणणाऱ्या कोणी अचूक शब्द आणि अर्थ सांगावा.
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–