काल ११ जुलै २०२६ ला, महान गायिका एस. जानकी ह्यांचे निधन झाले. त्यांनी तमिळसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली होती. माझ्या “तमिळ गाणी मराठीत” ह्या उपक्रमात आज त्यांनी गायलेल्या एका लोकप्रिय तमिळ गाण्याची ओळख करून देतो. आणि एस. जानकी अम्मांना मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची गाणी त्यांचा सूर सदैव आपल्या कानात गुणगुणत राहील. ओम शांति: |
(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
தாலாட்டும் பூங்காற்று நானல்லவா (तालाट्टुम पूंगाट्रु नानल्लवा)
अंगाई गाणारी सुगंधी झुळूक मीच आहे ना?
நீ கேட்டுப் பாராட்டு ஓ மன்னவா (नी केट्टुप् पाराट्टु ओ मन्नवा)
ती ऐकून कौतुक कर रे राजा !
வருவாயோ……..வாராயோ…..(वरुवायो……..वारायो…..)
तू येशील का? … की येणार नाहीस?
ஓ நெஞ்சமே ஓ நெஞ்சமே (ओ नॆन्जमे ओ नॆन्जमे)
अरे माझ्या मना… अरे माझ्या मना…
என் நெஞ்சமே உன் தஞ்சமே (एन् नॆन्जमे उन् तन्जमे)
माझे मन, फक्त तुझाच आसरा आहे.
தாலாட்டும் பூங்காற்று நானல்லவா (तालाट्टुम पूंगाट्रु नानल्लवा)
अंगाई गाणारी सुगंधी झुळूक मीच आहे ना?
நீ கேட்டுப் பாராட்டு ஓ மன்னவா (नी केट्टुप् पाराट्टु ओ मन्नवा)
ती ऐकून कौतुक कर रे राजा !
நள்ளிரவில் நான் கண் விழிக்க (नळ्ळिरविल् नान् कण् विळिक्क)
मध्यरात्री मी जागी राहते,
உன் நினைவில் என் மெய் சிலிர்க்க (उन् निनैविल् एन् मेय् सिलिर्क्क)
तुझ्या आठवणीने माझ्या अंगावर शहारे येतात
பஞ்சணையில் நீ முள் விரித்தாய் (पन्जणैयिल् नी मुळ् विरित्ताय्)
बिछान्यावर तू काटे पसरवलेस
பெண் மனதை நீ ஏன் பறித்தாய் (पॆण् मनदै नी येन् पऱित्ताय्)
स्त्रीचे मन तू का चोरलेस
ஏக்கம் தீயாக ஏதோ நோயாக (एक्कम् तीयाग एदो नोयाग)
माझी तळमळ आगीसारखी एखाद्या आजारासारखी झाली आहे
காணும் கோலங்கள் யாவும் நீயாக (काणुम् कोलङ्गळ् यावुम् नीयाग)
जे पाहते ते तुझेच रूप घेते
வாசலில் மன்னா உன் தேர் வர ( वासलिल् मन्ना उन् तेर् वर )
माझ्या दारात तुझा रथ येईल म्हणून,
ஆடுது பூந்தோரணம்… (आडुदु पून्दोरणम्…)
फुलांचे तोरण झोके घेत आहे
தாலாட்டும் பூங்காற்று நானல்லவா (तालाट्टुम पूंगाट्रु नानल्लवा)
अंगाई गाणारी सुगंधी झुळूक मीच आहे ना?
நீ கேட்டுப் பாராட்டு ஓ மன்னவா (नी केट्टुप् पाराट्टु ओ मन्नवा)
ती ऐकून कौतुक कर रे राजा !
சரணம் 2
எப்பொழுதும் உன் சொப்பனங்கள் (एप्पॊळुदुम् उन् सोप्पनङ्गळ्)
सतत तुझीच स्वप्ने
முப்பொழுதும் உன் கற்பனைகள் (मुप्पॊळुदुम् उन् कर्पनैगळ्)
तिन्हीत्रिकाळ तुझ्याच कल्पना
சிந்தனையில் நம் சங்கமங்கள் (सिन्दनैयिल् नम् संगमंगळ्)
विचारांमध्ये आपलेच मिलन
ஒன்றிரண்டா என் சஞ்சலங்கள் (ओन्ऱिरन्डा एन् संजलंगळ्)
एक दोन का आहेत माझ्या वेदना/व्याकुळतेच्या गोष्टी ?
காலை நான் பாடும் காதல் பூபாளம் (कालै नान् पाडुम् कादल् बूपाळम्)
सकाळी मी गात असलेली ही प्रेमाची भूपाळी
காதில் கேட்காதோ கண்ணா எந்நாளும் (कादिल् केट्कादो कण्णा एन्नाळुम्)
हे कृष्णा, तुझ्या कानावर कधीच पडणार नाही का?
ஆசையில் நாள்தோறும் நான் தொழும் (आसैयिल् नाळ्दोऱुम् नान् तॊऴुम्)
मी रोज आशेने ज्याची पूजा करते,
ஆலயம் நீயல்லவா… (आलयम् नीयल्लवा…)
ते मंदिर तूच आहेस ना…
தாலாட்டும் பூங்காற்று நானல்லவா (तालाट्टुम पूंगाट्रु नानल्लवा)
अंगाई गाणारी सुगंधी झुळूक मीच आहे ना?
நீ கேட்டுப் பாராட்டு ஓ மன்னவா (नी केट्टुप् पाराट्टु ओ मन्नवा)
ती ऐकून कौतुक कर रे राजा !
வருவாயோ……..வாராயோ…..(वरुवायो……..वारायो…..)
तू येशील का? … की येणार नाहीस?
ஓ நெஞ்சமே ஓ நெஞ்சமே (ओ नॆन्जमे ओ नॆन्जमे)
अरे माझ्या मना… अरे माझ्या मना…
என் நெஞ்சமே உன் தஞ்சமே (एन् नॆन्जमे उन् तन्जमे)
माझे मन, फक्त तुझाच आसरा आहे.
தாலாட்டும் பூங்காற்று நானல்லவா (तालाट्टुम पूंगाट्रु नानल्लवा)
अंगाई गाणारी सुगंधी झुळूक मीच आहे ना?
நீ கேட்டுப் பாராட்டு ஓ மன்னவா (नी केट्टुप् पाराट्टु ओ मन्नवा)
ती ऐकून कौतुक कर रे राजा !
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

