पुस्तक – The bestseller she wrote (द बेस्टसेलर शी रोट )
लेखक – Ravi Subramanian (रवी सुब्रमण्यन )
भाषा – English (इंग्रजी )
पाने – 391
ISBN – 978-93-85152-38-2
कादंबरीचं कथा सूत्र साधारण असं आहे ->
आदित्य कपूर नावाचा प्रथितयश सर्वाधिक खपाचा लेखकाची एका तरुण मुलीशी ओळख होते. ती मुलगीही भरपूर वाचणारी, काही लिहू पाहणारी आणि विशेष म्हणजे सुंदर आकर्षक. आदित्य लग्न झालेला, एक मुलगा असेलेला असला तरी तिच्याकडे ओढला जातो. त्या मुलीची सुद्धा आदित्यसारखं “बेस्ट सेलर” व्हायची तीव्र इचछा असते. आदित्यशी सलगी वाढवून त्याच्या ओळखीने ह्या क्षेत्रात झटक्यात यश पदरात पाडून घेण्याच्या दिशेने तिची पावले पडू लागतात. वाहवत जातात. त्याचे बरे वाईट परिणाम होतात. त्यांच्या या प्रेमप्रकरणाचा परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही होतो आणि इतरांच्या वागणायचा परिणाम ह्या प्रेम प्रकरणावर. त्यामुळे जितकं वरवर दिसतं तितकंच घडत नाही. काही अनपेक्षित घटना घडतात.
मग श्रेयाचं पाहिलं पुस्तक प्रकाशित होतं का ? श्रेया-आदित्यच्या संबंधांचा परिणाम आदित्यच्या वैवाहिक आयुष्यावर काय होतो ? हे संबंध लपून नाही राहिले तर त्याचा परिणाम आदित्यच्या “मोठा लेखक” या प्रतिमेवर काय होतो ? दुसरे कोणी याचा फायदा उचलतात का ?
हे सगळं मी सांगून रसभंग करत नाही. त्यासाठी कादंबरी वाचा
कादंबरीची भाषा सोपी इंग्रजी आहे. पात्रांची नावं आणि त्यांची थेट ओळख करून दिलेली आहे. हे मला बरं वाटलं. नाहीतर भारतीय इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात किचकट शब्द वापरुंन पांडित्यदर्शन असतं. बऱ्याचवेळा पात्र परिचय करून देतच नाहीत. नक्की बाई आहे का पुरुष; लहान आहे का मोठा; ह्याचा आपणच अंदाज करत बसायचा. एक असं पुस्तक मी नुकतंच अर्ध्यावर सोडलं. पण त्याबाबतीत हे पुस्तक चांगलं आहे.
आदित्य आणि श्रेयाचा एक प्रसंग

 

 

 

मुख्य पात्र लेखक असल्यामुळे लेखन-प्रकाशन व्यवसायातील व्यावसायिक गणितं आणि “आतल्या गोष्टीं”बद्दल ओघात काही लिहिलं गेलं आहे. असाच एक प्रसंग.

 

 

 

आदित्य या पात्राच्या मनात चालणारे विचार कादंबरीत थोडेफार येतात पण इतर पात्रांबद्दल फारसं चित्रण नाही. कादंबरीचा भर प्रसंगावर आणि कथानक वेगात पुढे जाण्यावर आहे. त्यामुळे त्यातलं रहस्य किंवा पात्रांचं वागणं लेखक सांगेल तसं गृहीत धरून पुढे जावं लागतं.
कादंबरी छोट्या छोट्या प्रसांगातून पुढे जाते. पुढे काय घडेल काय घडेल याचा अंदाज येतो तरी ने नक्की कसं घडलं असेल हे वाचत राहावंसं वाटतं. शेवटी शेवटी प्रसंग अनपेक्षित वळणं घेतात. त्यामुळे कधी नव्हे ते ४०० पानी इंग्रजी पुस्तक इतक्या लवकर वाचून संपलं. तुम्हालाही सहज विरंगुळा म्हणून वाचायला आवडू शकेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/