पुस्तक – The extra in ordinary (द एक्स्ट्रा इन ऑर्डीनरी)
लेखक – Ashutosh Marathe (आशुतोष मराठे)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – १३२

ISBN – 978-1-63886-618-3

लेखक आशुतोष मराठे यांनी या पुस्तकाचे परीक्षण माझ्या सारख्या “हौशी” परीक्षण लिहिणाऱ्याकडून जाणून घ्यायची इच्छा दर्शवली व त्यासाठी या पुस्तकाची प्रत माझ्यापर्यंत पोचवायची व्यवस्था केली या बद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.

दैनंदिन आयुष्यात आपला कितीतरी लोकांशी संपर्क  येतो. पुन्हापुन्हा संपर्क आल्याने माणसाच्या स्वभावाची आपल्याला थोडी ओळख होते. पण अचानक अशी काहीतरी घटना घडते की त्या माणसाचा वेगळाच पैलू आपल्याला दिसतो. एखादा गुण-अवगुण प्रकर्षाने जाणवतो. कधीकधी एखादी लहानशीच घटना अनिवार समाधान देऊन जाते. तर कधी जिव्हाळा, घृणा, तृप्ती, आनंद असे भावनेचे कढ अनिवार होतात. आपल्या अवतीभोवतीच्या साध्या – “ऑर्डीनरी” माणसांमधलं असं काहीतरी जादा – “एक्स्ट्रा” दाखवणारे प्रसंग आपण बरेच वेळा अनुभवत असतो. आशुतोष मराठे यांचे असे स्वानुभव त्यांनी “द एक्स्ट्रा इन ऑर्डीनरी” पुस्तकात संग्रहित केले आहेत.
एकेक प्रसंग सांगणारे २-३ पानांचे छोटेखानी ३९ लेख यात आहेत. “Intense”, “Funny”, “Inspirational” अशी त्यांची वर्गवारी केली आहे.
“Intense” मध्ये ज्यामुळे लेखकाच्या भावना उचंबळून आल्या असे प्रसंग आहेत. उदा. काही भिकारी आपली वाईट अवस्था अशी मांडतात की काळजाला हात घातला जातो; पाळीव कुत्र्याची सवय असणाऱ्याचा कुत्र्याचा मृत्यू होतो तेव्हा; एका निरक्षर माणसाची फसवणूक होते तेव्हा इ.
त्यांच्या बँकेतल्या एटीएम मधून बॅग गहाळ झाली तो प्रसंग

“Funny” गटात नावाप्रमाणेच थोडे मजेशीर, हलकेफुलके प्रसंग आहेत.  लहानपणी मित्रांबरोबर रेल्वे प्रवासात टॉयलेट मध्ये काढलेली रात्र, हिंदी न येणाऱ्या आजीबाईचा मराठी न येणाऱ्या भैय्याशी मुंबैय्या हिंदीतला संवाद, परदेशात भारतीय खाण्याच्या घमघमाटामुळे पाकिस्तानी माणसातला “देसी” जागा होतो इ.

घरी काम करणाऱ्या सुताराला घरधन्याचा पगार कळतो तेव्हाचा प्रसंग वाचून बघा

“Inspirational” गटात जगण्यातल्या विपरीत परिस्थितीला धीराने तोंड देणाऱ्या लोकांचे प्रसंग आहेत. धुणीभांडी, स्वयंपाकाची कामे करून मुलांना वाढवणाऱ्या, शिकवणाऱ्या महिलांबद्दल आहे. तसेच गरीब असूनही अत्युच्च प्रामाणिकपणा दाखवणारे तर श्रीमंत असूनही त्याचा माज न करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव आहेत.

उदा. प्रामाणिक रखवालदाराचा आलेला हा अनुभव

लेखकाची निवेदनशैली आणि विषयाची निवड सुधा मूर्तींसारखी वाटली. एखाद्या ब्लॉग सारखे स्वान्त:सुखाय लेखन आहे. प्रसंग घडले तसे थोडक्यात सांगितले आहेत. मीठमसाला लावून रंजकता, नाट्य आणण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पुस्तकाच्या नावात आहे त्याप्रमाणे “ऑर्डीनरी” मजकूर वाचतोय असं वाटतं. त्यात काही “एक्स्ट्रा” नसल्यामुळे पुस्तक आपल्यावर छाप पाडत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/