पुस्तक – The guardian angels (द गार्डियन अँजल्स)
लेखक – Rohit Gore (रोहित गोरे)
भाषा – English (इंग्रजी)

पाने – ३२८
ISBN – 978-93-81-841280
आदी आणि राधा या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आदी आणि एका मध्यमवर्गीय, कर्मचारी युनियन नेत्याची मुलगी राधा यांची शाळेत भेट होते. मैत्री होते. आणि पुढे ते भेटत राहतात. “आदी”च्या वडिलांचा व्यवसाय म्हणजे भांडवलशाही लोकांकडून कामगारांचं शोषण आहे असा राधाचा नेहमीचा विचार आदीला कधी मान्य नसतो. तरी त्यांची मैत्री टिकून राहते. करियरच्या सर्वस्वी दोन वेगळ्या वाटा निवडल्यामुळे ते एकमेकांपासून कधी दूर राहतात तर कधी एकाच शहरात. आदी व्यवसायात उतरतो तर राधा समाजकार्यात. पुढे असे काही जीवावर उठणारे प्रसंग घडतात की त्यात ते एकेमकांना साथ देतात. दोघांच्या आयुष्यात प्रेमाचे त्रिकोण येतात. अश्याप्रकारे परिस्थितीच्या वर-खाली होण्याबरोबरच त्यांचे संबंध वर-खाली होतात. लहानग्या मुलांच्या मैत्री पासून प्रौढांचा परस्परांचा आहे तसा स्वीकार कारण्यापर्यंतचा हा प्रवास आहे.

ह्याहून जास्त काही सांगणं म्हणजे भावी वाचकांचा रसभंग होईल. पण साधारण बॉलिवूड पिक्चर मधल्या मसाल्यासारखे नेहमीचे प्रसंग यात आहेत. आदी बद्दल निवेदक सांगतो तर राधा तिच्या डायरीत आपलं मन मोकळं करतेय असं दाखवलं आहे. पण यामुळे कादंबरीच्या प्रवाहात काही फरक पडत नाही. पात्र आणि त्यांचं वागणं मनाची पकड घेत नाहीत. “लव्ह at फर्स्ट साईट” झाल्यामुळे पुढे काही झालं तरी ते एकत्र येत राहतायत असंच वाटत राहतं. आदी शिकायला परदेशात जातो; परत आल्यावर ” कल से मैं पापा का ऑफिस जॉइन करूँगा” असं म्हणत बिझनेस मध्ये उतरतो. पण सगळं लक्ष प्रेमावर. बाकी सगळंच अगदी सहज चित्रपटांसारखं.

राधा आणि आदी ह्या दोन मुख्य पात्रांशिवाय बाकी कोणाची मनोभूमिका मांडलेली नाही.

पुस्तकात नाट्यमय प्रसंग आहेत पण काहीतरी नाट्य आणायचं म्हणून आल्यासारखे वाटतात. पुस्तक वाचताना मजा आली नाही. सुरुवातीला सविस्तर पानं वाचली आणि फक्त पुढे काय झालं ह्यावर नजर टाकत पुस्तक संपवलं.

आदीची तरुण बहीण एकदा घरातून निघून जाते. आदी आणि राधा तिला शोधायला जातात तो प्रसंग

आता आपलं नातं तुटलं असं दोघांना वाटायला लागतं तेव्हाचा प्रसंग

पुस्तकातलं इंग्रजी चांगलं सोपं आहे. ओढूनताणून क्लिष्ट भारतीय-इंग्रजी नाही. मराठी लेखक असल्यामुळे पात्रांची मराठी नावं आहेत. इंग्रजी वाक्यांमध्ये “aai”, “baba” असे शब्द घालून मराठीपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे सुद्धा टिपकल हिंदी चित्रपटांसारखं. उद्योगपती अंबानी, लवासा प्रकरण यांच्याशी साधर्म्य साधणारी वर्णनं आहेत. पण ते तेवढंच. खऱ्या घटनांवर आधारित नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/