(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
உன்னோடு வாழாத வாழ்வென்ன வாழ்வு (उन्नोडु वाऴाद वाऴ्वॆन्न वाऴ्वु )
तुझ्याबरोबर न जगलेले जीवन, हे कसले जीवन
என் உள்நெஞ்சு சொல்கின்றது (एन् उळ्नॆन्जु सॊल्गिन्रदु )
असे माझे हृदय म्हणते
பூவோடு பேசாத காற்றென்ன காற்று (पूवोडु पेसाद काट्रॆन्न काट्रु)
फुलांशी न बोलणारा वारा, हा कसला वारा
ஒரு பூஞ்சோலை கேட்கின்றது (ऒरु पूंजॊलै केट्किन्ऱदु)
असं फुलबाग विचारते
மண்ணில் ஏன் ஏன் ஏன் நீயும் வந்தாய் (मण्णिल् एन् एन् एन् नीयुम् वन्दाय्)
धरतीवर तू कशासाठी आलास ?
எந்தன் பெண்மை பூப்பூக்கவே (एन्दन् पॆण्मै पूप्पूक्कवे)
माझे स्त्रीत्व फुलवायलाच
நான் பிறக்கும் முன்னே (नान् पिऱक्कुम् मुन्ने )
माझा जन्म होण्याआधी
அட நீ பிறந்ததேன் (अड नी पिऱन्ददेन् )
तुझा जन्म का झाला
நான் பிறக்கும் போது (नान् पिऱक्कुम् पोदु )
माझा जन्म होताना
நீ உந்தன் கையில் என்னை ஏந்தத்தானோ (नी उन्दन् कैयिल् एन्नै एन्दत्तानो)
तू तुझ्या हातात मला उचललेस
உன்னோடு வாழாத வாழ்வென்ன வாழ்வு (उन्नोडु वाऴाद वाऴ्वॆन्न वाऴ्वु )
तुझ्याबरोबर न जगलेले जीवन, हे कसले जीवन
என் உள்நெஞ்சு சொல்கின்றது (एन् उळ्नॆन्जु सॊल्गिन्रदु )
असे माझे हृदय म्हणते
மெல்லிய ஆண்மகனை (मॆल्लिय आण्मगनै )
नाजूक पुरुष
பெண்ணுக்கு பிடிக்காது (पॆण्णुक्कु पिडिक्कादु)
मुलींना आवडत नाहीत
முரடா உனை ரசித்தேன் (मुरडा उनै रसित्तेन्)
उद्धट तू मला भावलास
தொட்டதும் விழுந்துவிடும் ஆடவன் பிடிக்காது (तॊट्टदुम् विऴुन्दुविडुम् आडवन् पिडिक्कादु )
नुसत्या स्पर्शाने पडणारा/भुलणारा पुरुष मला आवडत नाही.
கர்வம் அதை மதித்தேன் (गर्वम् अदै मदित्तेन्)
तुझ्या गर्वाची मला किंमत आहे
முடி குத்தும் உந்தன் மார்பு (मुडि कुत्तुम् उन्दन् मार्बु )
तुझी केसाळ छाती
என் பஞ்சு மெத்தையோ (एन् पंजु मॆत्तैयो )
माझी स्पंजाची गादी
என் உயிர் திறக்கும் முத்தம் அது (एन् उयिर् तिऱक्कुम् मुत्तम्)
माझे प्राण खुलवणारे चुंबन ते
என்ன வித்தையோ (अदु एन्न वित्तैयो)
कसली ही कला !
உன்னைப் போலே ஆண் இல்லையே (उन्नैप् पोले आण् इल्लैये )
तुझ्या सारखा माणूस नाही
நீயும் போனால் நான் இல்லையே (नीयुम् पोनाल् नान् इल्लैये)
तू गेलास तर मीही नाही
நீர் அடிப்பதாலே (नीर् अडिप्पदाले)
पाणी आपटलं म्हणून
மீன் நழுவதில்லையே (मीन् नऴुवदिल्लैये )
मासा निसटून जात नाही
ஆம் நமக்குள் ஊடலில்லை (आम् नमक्कुळ् ऊडलिल्लै)
आपल्यात काही वाद नाही
உன்னோடு வாழாத வாழ்வென்ன வாழ்வு (उन्नोडु वाऴाद वाऴ्वॆन्न वाऴ्वु )
तुझ्याबरोबर न जगलेले जीवन, हे कसले जीवन
என் உள்நெஞ்சு சொல்கின்றது (एन् उळ्नॆन्जु सॊल्गिन्रदु )
असे माझे हृदय म्हणते
பூவோடு பேசாத காற்றென்ன காற்று (पूवोडु पेसाद काट्रॆन्न काट्रु)
फुलांशी न बोलणारा वारा, हा कसला वारा
ஒரு பூஞ்சோலை கேட்கின்றது (ऒरु पूंजॊलै केट्किन्ऱदु)
असं फुलबाग विचारते
நீ ஒரு தீ என்றால் (नी ऒरु ती एन्ऱाल्)
तू आग असशील तर
நான் குளிர் காய்வேன் (नान् कुळिर् काय्वेन् )
मी थंडीत ऊब घेईन
அன்பே தீயாய் இரு (अन्बे तीयाय् इरु )
प्रियकरा तू आगच बनून रहा
நீ ஒரு முள் என்றால் (नी ऒरु मुळ् एन्ऱाल् )
तू काटा असशील तर
நான் அதில் ரோஜா (नान् अदिल् रोजा)
मी त्यातले गुलाबाचे फूल
அன்பே முள்ளாய் இரு (अन्बे मुळ्ळाय् इरु)
प्रियकरा तू काटाच बनून रहा
நீ வீரமான கள்ளன் (नी वीरमान कळ्ळन् )
तू एक धाडसी चोर आहेस
உள்ளூரும் சொல்லுது (उळ्ळूरुम् सॊल्लुदु)
सगळं गाव म्हणतंय
நீ ஈரமான பாறை (नी ईरमान पाऱै)
तू एक ओलावा असलेला खडक आहेस
என் உள்ளம் சொல்லுது (एन् उळ्ळम् सॊल्लुदु )
असं माझं मन म्हणतंय
உன்னை மொத்தம் நேசிக்கிறேன் (उन्नै मॊत्तम् नेसिक्किऱेन्)
तुझ्यावर पूर्णपणे प्रेम करते
உந்தன் மூச்சை சுவாசிக்கிறேன் (उन्दन् मूच्चै स्वासिक्किऱेन्)
तुझ्या श्वासाचा श्वास घेते
நீ வசிக்கும் குடிசை (नी वसिक्कुम् कुडिसै)
तू राहतोस ती झोपडी
என் மாட மாளிகை (एन् माड माळिगै )
माझा महाल
காதலோடு பேதம் இல்லை (कादलोडु बेदम् इल्लै)
प्रेमात काही फरक नाही
உன்னோடு வாழாத வாழ்வென்ன வாழ்வு (उन्नोडु वाऴाद वाऴ्वॆन्न वाऴ्वु )
तुझ्याबरोबर न जगलेले जीवन, हे कसले जीवन
என் உள்நெஞ்சு சொல்கின்றது (एन् उळ्नॆन्जु सॊल्गिन्रदु )
असे माझे हृदय म्हणते
பூவோடு பேசாத காற்றென்ன காற்று (पूवोडु पेसाद काट्रॆन्न काट्रु)
फुलांशी न बोलणारा वारा, हा कसला वारा
ஒரு பூஞ்சோலை கேட்கின்றது (ऒरु पूंजॊलै केट्किन्ऱदु)
असं फुलबाग विचारते
மண்ணில் ஏன் ஏன் ஏன் நீயும் வந்தாய் (मण्णिल् एन् एन् एन् नीयुम् वन्दाय्)
धरतीवर तू कशासाठी आलास ?
எந்தன் பெண்மை பூப்பூக்கவே (एन्दन् पॆण्मै पूप्पूक्कवे)
माझे स्त्रीत्व फुलवायलाच
நான் பிறக்கும் முன்னே (नान् पिऱक्कुम् मुन्ने )
माझा जन्म होण्याआधी
அட நீ பிறந்ததேன் (अड नी पिऱन्ददेन् )
तुझा जन्म का झाला
நான் பிறக்கும் போது (नान् पिऱक्कुम् पोदु )
माझा जन्म होताना
நீ உந்தன் கையில் என்னை ஏந்தத்தானோ (नी उन्दन् कैयिल् एन्नै एन्दत्तानो)
तू तुझ्या हातात मला उचललेस
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

