(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
அதிகாலை மழை தானா (अदिकालै मऴै दाना)
पहाटेची पावसाची सर आहे ना
அவனோடு இனி நானா (अवनोडु इनि नाना)
त्याच्याबरोबर आता मी असणार ना
இது நான் கேட்ட காலங்கள் தானா (इदु नान् केट्ट कालंगळ् दाना)
हेच मी मागितलेले दिवस ना
இதிகாசம் இது தானா (इदिकासम् इदु दाना)
इतिहास घडतोय ना
இவளோடு நடந்தேனா (इवळोडु नडन्देना)
तिच्याबरोबर मी चाललो ना
இந்த மாயத்தில் நானும் விழுந்தேனா (इन्द मायत्तिल् नानुम् विऴुन्देना)
ह्या जादूने मी मोहित झालो ना
உயிரே உயிரே (उयिरे उयिरे)
माझ्या जिवा माझ्या जिवा
உறையும் உயிரே (उऱैयुम् उयिरे)
सुखावलेल्या जिवा
இனிமேல் ……(इनिमेल्)
ह्या पुढे
நீதானா……(नीदाना)
तूच ना
உயிரே உயிரே (उयिरे उयिरे)
माझ्या जिवा माझ्या जिवा
உறையும் உயிரே (उऱैयुम् उयिरे)
सुखावलेल्या जिवा
இனிமேல் ……(इनिमेल्)
ह्या पुढे
நீதானா……(नीदाना)
तूच ना
அவசரமாய் (अवसरमाय्)
अचानकपणे
அச்சாகும் (अच्चागुम्)
कोरली जाईल
நாம் கைகோர்த்த காதல் கதை (नाम् कैकोर्त्त कादल् कदै)
हातात हात गुंफलेली प्रेमकथा
அழகழகாய் பேசிடும் (अऴकऴकाय् पेसिडुम्)
गोड गोड बोलेल
நாம் மண்ணோடு வாழும் வரை (नाम् मण्णोडु वाऴुम् वरै)
आपण जगात राहू तो पर्यंत
உன் மேல் சட்டை வாசம் (उन् मेल् सट्टै वासम्)
गंध तुझ्या कपड्यांचा
என் மூச்சோடு பேசும் (एन् मूच्चोडु पेसुम्)
माझ्या श्वासाशी बोलेल
பொய் பூசாத நேசங்களே (पॊय् पूसाद नेसंगळे)
खोट्याचा स्पर्श न झालेले प्रेम
உயிரே உயிரே (उयिरे उयिरे)
माझ्या जिवा माझ्या जिवा
உறையும் உயிரே (उऱैयुम् उयिरे)
सुखावलेल्या जिवा
இனிமேல் ……(इनिमेल्)
ह्या पुढे
நீதானா……(नीदाना)
तूच ना
உயிரே உயிரே (उयिरे उयिरे)
माझ्या जिवा माझ्या जिवा
உறையும் உயிரே (उऱैयुम् उयिरे)
सुखावलेल्या जिवा
இனிமேல் ……(इनिमेल्)
ह्या पुढे
நீதானா……(नीदाना)
तूच ना
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

