(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान)

உயிரே… உயிரே… उयिरे उयिरे
प्राणा प्राणा / माझ्या प्राणप्रिये माझ्या प्राणप्रिये
வந்து என்னோடு கலந்துவிடு… वन्दु एन्नोडु कलन्दुविडु
येऊन माझ्यात मिसळून जा
உயிரே… உயிரே…उयिरे उयिरे
प्राणप्रिये प्राणप्रिये
என்னை உன்னோடு கலந்துவிடு…एन्नै उन्नोडु कलन्दुविडु
मला तुझ्याशी एकरूप कर
நினைவே… நினைவே… निनैवे निनैवे
आठवणींनो आठवणींनो (अगं माझ्या आठवणीत राहणाऱ्या प्रिये)
எந்தன் நெஞ்சோடு கலந்துவிடு…एन्दन् नॆंजोडु कलन्दुविडु
माझ्या हृदयात सामावून जा
நிலவே… நிலவே…निलवे निलवे
चंद्रा.. चंद्रा
இந்த விண்ணோடு கலந்துவிடு…इन्द विण्णोडु कलन्दुविडु
आकाशाशी एकरूप होऊन जा
காதல் இருந்தால்…कादल् इरुन्दाल्
प्रेम असेल तर
எந்தன் கண்ணோடு கலந்துவிடு…एन्दन् कण्णोडु कलन्दुविडु
माझ्या दृष्टीशी एकरूप हो
காலம் தடுத்தால்…कालम् तडुत्ताल्
दैव थांबवत असेल तर
என்னை மண்ணோடு கலந்துவிடு…एन्नै मण्णोडु कलन्दुविडु
मला ह्या मातीत मिसळन टाक / राख होऊन जाऊ दे मला

உயிரே… உயிரே…उयिरे उयिरे
प्राणप्रिये प्राणप्रिये
வந்து என்னோடு கலந்துவிடு… वन्दु एन्नोडु कलन्दुविडु
येऊन माझ्यात मिसळून जा
நினைவே… நினைவே… निनैवे निनैवे
आठवणींनो आठवणींनो (अगं माझ्या आठवणीत राहणाऱ्या प्रिये)
எந்தன் நெஞ்சோடு கலந்துவிடு…एन्दन् नॆंजोडु कलन्दुविडु
माझ्या हृदयात सामावून जा

என் சுவாசக் காற்று வரும்பாதை பார்த்து…एन् स्वासम् काट्रु वरुम्बादै पार्त्तु
माझा श्वास येतोय जातोय हे बघत
உயிர்தாங்கி நானிருப்பேன்…उयिर्तांगि नानिरुप्पेन्
जीव टिकवून मी असेन
மலா்கொண்ட பெண்மை வாராமல் போனால்…मलर्कॊण्ड पॆण्मै वारामल् पोनाल्
फुलणारे स्त्रीत्व आले नाही तर
மலைமீது தீக்குளிப்பேன்…मलैमीदु तीक्कुळिप्पेन्
डोंगरावर स्वतःला पेटवून घेईन
என் உயிர் போகும் போனாலும் துயரில்லை கண்ணே…एन् उयिर् पोगुम् पोनालुम् तुयरील्लै कण्णे
माझा जीव जाईल ..जाऊदे .. त्याचे दुःख नाही
அதற்காகவா பாடினேன்…अदर्कागवा पाडिनेन्
त्यासाठी का मी हे गाणे म्हणतोय ?
வரும் எதிர்காலம் உன் மீது பழிபோடும் பெண்ணே…वरुम् एदिर्कालम् उन् मीदु पळिपोडुम् पॆण्णे
मुली, येणारा काळ तुला दोषी ठरवेल
அதற்காகத்தான் வாடினேன்…अदर्कागत्तान् वाडिनेन्
त्यासाठीच मी कोमेजून गेलो आहे
முதலா முடிவா அதை உன் கையில் கொடுத்துவிட்டேன்…मुदला मुडिवा अदै उन् कैयिल् कॊडुत्तुविट्टेन्
सुरुवात का शेवट .. आता तुझ्या हातात सोडत आहे

உயிரே… உயிரே…उयिरे उयिरे
माझ्या प्राणप्रिये माझ्या प्राणप्रिये
இன்று உன்னோடு கலந்துவிட்டேன்…इन्रु उन्नोडु कलन्दुविट्टेन्
आज तुझ्याशी एकरूप झाले आहे
உறவே… உறவே…उरवे उरवे
नातं जुळलेल्या … नातं जुळलेल्या
இன்று என் வாசல் கடந்துவிட்டேன்…इन्रु एन् वासल् कडन्दुविट्टेन्
आज माझे अंगण ओलांडले आहे

நினைவே… நினைவே… निनैवे निनैवे
आठवणींनो आठवणींनो (अगं माझ्या आठवणीत राहणाऱ्या प्रिया)
உந்தன் நெஞ்சோடு நிறைந்துவிட்டேன்…उन्दन् नॆंजोडु निरैन्दुविट्टेन्
तुझ्या हृदयाने मी भरले आहे
கனவே… கனவே…कनवे कनवे
स्वप्ना स्वप्ना
உந்தன் கண்ணோடு கறைந்துவிட்டேன்…उन्दन् कण्णोडु करैन्दुविट्टेन्
तुझ्या डोळ्यांचा रंग मला लागला आहे

காதல் இருந்தால்…कादल् इरुन्दाल्
प्रेम असेल तर
எந்தன் கண்ணோடு கலந்துவிடு…एन्दन् कण्णोडु कलन्दुविडु
माझ्या दृष्टीशी एकरूप हो
காலம் தடுத்தால்…कालम् तडुत्ताल्
दैव थांबवत असेल तर
என்னை மண்ணோடு கலந்துவிடு…एन्नै मण्णोडु कलन्दुविडु
मला ह्या मातीत मिसळन टाक / राख होऊन जाऊ दे मला

உயிரே… உயிரே… उयिरे उयिरे
प्राणा प्राणा / माझ्या प्राणप्रिये माझ्या प्राणप्रिये
வந்து என்னோடு கலந்துவிடு… वन्दु एन्नोडु कलन्दुविडु
येऊन माझ्यात मिसळून जा
நினைவே… நினைவே… निनैवे निनैवे
आठवणींनो आठवणींनो (अगं माझ्या आठवणीत राहणाऱ्या प्रिये)
எந்தன் நெஞ்சோடு கலந்துவிடு…एन्दन् नॆंजोडु कलन्दुविडु
माझ्या हृदयात सामावून जा

ஓா் பார்வை பார்த்தே உயிர்தந்த பெண்மை… ओर् पार्वै पार्त्ते उयिर्तन्द पॆण्मै
पहिल्या नजरेतच प्राण अर्पण करणारी स्त्री
வாராமல் போய்விடுமா…वारामल् पोय्विडुमा
न येता राहू शकेल का ?
ஒரு கண்ணில் கொஞ்சம் வலிவந்த போது…ऒरु कण्णिल् कॊंजम् वलिवन्द पोदु
एका डोळ्यात काही दुखू लागलं तर
மறு கண்ணும் தூங்கிடுமா…मरू कण्णुम् तूंगिडुमा
दुसऱ्या डोळ्याला झोप येईल का ?
நான் கரும்பாறை பலதாண்டி வேராக வந்தேன்…नान् करूम्पारै पलताण्डि वेराग वन्देन्
अनेक खडक ओलांडणाऱ्या मुळाप्रमाणे मी आले आहे
கண்ணாளன் முகம் பார்க்கவே…कण्णाळन् मुगम् पार्क्कवे
प्रियकराचा चेहरा बघायलाच
என் கடுங்காவல் பலதாண்டி காற்றாக வந்தேன்…एन् कडुंगावल् पलताण्डि काट्राग वन्देन्
माझ्यावरचे कितीक पहारे ओलांडून वाऱ्यासारखी आहे
கண்ணா உன் குரல் கேட்கவே…कण्णा उन् कुरल् केट्कवे
जिवलगा तुझा आवाज ऐकायलाच रे
அடடா அடடா… இன்று கண்ணீரும் தித்திக்கின்றதே…अडडा अडडा इन्रु कण्णीरुम् तित्तिक्किन्रदे
अहाहा अहाहा.. आज अश्रू सुद्धा गोड वाटतायत

உயிரே… உயிரே… उयिरे उयिरे
प्राणा प्राणा / माझ्या प्राणप्रिये माझ्या प्राणप्रिये
வந்து என்னோடு கலந்துவிடு… वन्दु एन्नोडु कलन्दुविडु
येऊन माझ्यात मिसळून जा
உயிரே… உயிரே…उयिरे उयिरे
प्राणप्रिये प्राणप्रिये
என்னை உன்னோடு கலந்துவிடு…एन्नै उन्नोडु कलन्दुविडु
நினைவே… நினைவே… निनैवे निनैवे
आठवणींनो आठवणींनो (अगं माझ्या आठवणीत राहणाऱ्या प्रिये)
எந்தன் நெஞ்சோடு கலந்துவிடு…एन्दन् नॆंजोडु कलन्दुविडु
माझ्या हृदयात सामावून जा
நிலவே… நிலவே…निलवे निलवे
चंद्रा.. चंद्रा
இந்த விண்ணோடு கலந்துவிடு…इन्द विण्णोडु कलन्दुविडु
आकाशाशी एकरूप होऊन जा

மழைபோல் மழைபோல்…मळैपोल् मळैपोल्
पावसाप्रमाणे पावसाप्रमाणे
வந்து மண்ணோடு விழுந்துவிட்டேன்…वन्दु मण्णोडु विळुन्दु विट्टेन्
येऊन कोसळले मी धरणीवर
மனம்போல் மனம்போல்…मनम्पोल् मनम्पोल्
मनाप्रमाणे मनाप्रमाणे
உந்தன் ஊனோடு உறைந்துவிட்டேன்…उन्दन् ऊनोडु उरैन्दु विट्टेन्
तुझ्या शरीरात गोठून गेले आहे
உயிரே… உயிரே…उयिरे उयिरे
माझ्या प्राणप्रिये माझ्या प्राणप्रिये
இன்று உன்னோடு கலந்துவிட்டேன்…इन्रु उन्नोडु कलन्दुविट्टेन्
आज तुझ्याशी एकरूप झाले आहे
நினைவே… நினைவே… निनैवे निनैवे
आठवणींनो आठवणींनो (अगं माझ्या आठवणीत राहणाऱ्या प्रिये)
உந்தன் நெஞ்சோடு நிறைந்துவிட்டேன்…उन्दन् नॆंजोडु निरैन्दुविट्टेन्
तुझ्या हृदयाने मी भरले आहे

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe