६ फेब्रुवारी २०२३- गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्ताने ह्यावेळी लतादीदींचं एक लोकप्रिय तमिळ गाणं आपल्यापुढे सादर करत आहे. लतादीदींची मराठी आणि हिंदी गाणी तुम्ही ऐकली असतीलच. ह्यानिमित्ताने तमीळ गाणेसुद्धा त्या किती सहजतेने गायल्या आहेत हे लक्षात येईल. भराभर उच्चार करायला लागणारी वैशिष्टयपूर्ण शब्दरचना ह्या गाण्यात आहे. ते गाणं ऐकून म्हणायचा प्रयत्न करा म्हणजे अजूनच नवल वाटेल.

माझा हा उपक्रम आणि प्रयत्न कसा वाटला ते मला learnmarathifast@gmail.com वर ईमेल द्वारे कळवू शकाल. उपक्रम आवडला तर ह्या पेजची लिंक शेअर करायला विसरू नका.

வளையோசை கல கல கலவென கவிதைகள் படிக்குது
वळैयोसै कल कल कलवॅन कविदैगळ् पडिक्कुदु (बांगड्या किणकिण करून कविता वाचतात)
குளு குளு தென்றல் காற்றும் வீசுது
कुळु कुळु तॆन्रल काट्रुम् वीसुदु (गार गार झुळुका असणारा वारा सुद्धा वाहतो आहे)

சில நேரம் சிலு சிலு சிலு என சிறு விரல் பட பட துடிக்குது
सिल नेरम् सिलु सिलु सिलु एन सिलु विरल् पड पड तुडिक्कुदु (काही वेळा , हळू हळू हळू बोटे फिरतात )
எங்கும் தேகம் கூசுது
एंगुम् देगम् कूसुदु (सगळीकडे देह रोमांचित होतो)

சின்ன பெண் பெண்ணல்ல வண்ண பூந்தோட்டம்
चिन्न पॆण् पॆण्णल्ल वण्ण पून्दोट्टम् (लहान मुलगी, मुलगी नाही रंगीत फुलबाग आहे)
கொட்டட்டும் மேளம் தான் அன்று காதல் தேரோட்டம்
कॊट्टट्टुम् मेळम् दान् अन्रु कादल् तेरोट्टम् (नागरे वाजूदेत तेव्हा असेल प्रेमाची रथयात्रा)

ஒரு காதல் கடிதம் விழி போடும்
ऒरु कादल् कडिदम् विळि पोडुम् (नजर एक प्रेमपत्र लिहील)
உன்னை காணும் சபலம் வர கூடும்
उन्नै काणुम् सबलम् कूडुम् (तुला बघण्याची ऊर्मी येईल)
நீ பார்க்கும் பார்வைகள் பூவாகும்
नी पार्क्कुम् पार्वैगळ् पूवागुम् (तू टाकलेल्या दृष्टिक्षेपांची फुले होतील)
நெஞ்சுக்குள் தைக்கின்ற முள்ளாகும்
नॆन्जुक्कुळ् तैक्किन्र मुळ्ळागुम् (हृदयात बोचणारा काटा होईल)

கண்ணே என் கண் பட்ட காயம்
कण्णे एन् कण् पट्ट कायम् (सुंदरी, माझ्या नजरेने केलेली जखम)
கை வைக்க தானாக ஆறும்
कै वैक्क तनाग आरूम् (हात लावल्यावर(माझ्या स्पर्शाने) आपोआप बरी होईल)

முன்னாலும் பின்னாலும் தள்ளாடும் செம் மேனி என் மேனி
मुन्नालुम् पिन्नालुम् तळ्ळाडुम् सॆम् मेनी एन् मेनी (पुढे आणि मागे झोके घेईल माझे आनंदित शरीर)
உன் தோளில் ஆடும் நாள்
उन् तोळिल् आडुम् नाळ् (ज्यादिवशी तुझ्या खांद्यावर टेकेन)

உன்னை காணாதுருகும் நொடி நேரம்
उन्नै काणादुरुगुम् नोडि नेरम् (तुला दिसेनासे करणारे क्षण)
பல மாதம் வருடம் என மாறும்
पल मादम् वरुडम् मारुम् (जणू अनेक महिने, वर्ष झाल्यासारखे होतात)

நீங்காத ரீங்காரம்
नींगाद रींगारम् (न जाणारे गुंजन)
நான் தானே நெஞ்சோடு நெஞ்சாக நின்றேனே
नान् दाने नॆन्जोड नॆन्जाग निन्रेने (माझ्या ह्या हृदयीचे त्या हृदयी आले)
ராகங்கள் தாளங்களோடு
रागंगळ् ताळंगळोडु (तालांसह राग)
ராஜ உன் பேர் சொல்லும் பாரு
राज उन् पेर् सॊल्लुम् पारू (राजा बघ तुझे नाव घेत आहेत)
சிந்தாமல் நின்றாடும் செந்தேனே
सिंदामल् निन्राडुम् सॆन्देने (न ठिबकणाऱ्या गोड मधा !)
சங்கீதம் உண்டாகும் நீ பேசும் பேச்சில் தான்
संगीदम् उंडागुम् नी पेसुम् पेच्चिल् दान् (संगीत बनते तू उच्चारलेल्या बोलण्यातून)

माझा हा उपक्रम आणि प्रयत्न कसा वाटला ते मला learnmarathifast@gmail.com वर ईमेल द्वारे कळवू शकाल. उपक्रम आवडला तर ह्या पेजची लिंक शेअर करायला विसरू नका.

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/