(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)

வெண்ணிலவே வெண்ணிலவே (वॆण्णिलवे वॆण्णिलवे )
शुभ्र चन्द्रा , शुभ्र चन्द्रा
விண்ணை தாண்டி வருவாயா? (विण्णै ताण्डि वरुवाया? )
आकाश सोडून येशील का ?
விளையாட வெண்ணிலவே வெண்ணிலவே (वॆण्णिलवे वॆण्णिलवे )
शुभ्र चन्द्रा , शुभ्र चन्द्रा
விண்ணை தாண்டி வருவாயா? (विण्णै ताण्डि वरुवाया? )
आकाश सोडून येशील का ?
விளையாட ஜோடி தேவை (विळैयाड जोडि तेवै)
खेळायला जोडीदार हवाय
வெண்ணிலவே வெண்ணிலவே (वॆण्णिलवे वॆण्णिलवे )
शुभ्र चन्द्रा , शुभ्र चन्द्रा
விண்ணை தாண்டி வருவாயா? (विण्णै ताण्डि वरुवाया? )
आकाश सोडून येशील का ?
விளையாட ஜோடி தேவை (विळैयाड जोडि तेवै)
खेळायला जोडीदार हवाय

வெண்ணிலவே வெண்ணிலவே (वॆण्णिलवे वॆण्णिलवे )
शुभ्र चन्द्रा , शुभ्र चन्द्रा
விண்ணை தாண்டி வருவாயா? (विण्णै ताण्डि वरुवाया? )
आकाश सोडून येशील का ?
விளையாட ஜோடி தேவை (विळैयाड जोडि तेवै)
खेळायला जोडीदार हवाय
இந்த பூலோகத்தில் யாரும் பார்க்கும்முன்னே (इन्द बूलोगत्तिल् यारुम् पार्क्कुम्मुन्ने )
ह्या धरणीवर बघण्याआधी
உன்னை அதிகாலை அனுப்பி வைப்போம் (उन्नै अदिकालै अनुप्पि वैप्पोम् )
तुला पहाटेच परत जाऊ देऊ

இது இருள் அல்ல , அது ஒளி அல்ல (इदु इरुळ् अल्ल , अदु ऒळि अल्ल )
हा अंधारही नाही , हा उजेडही नाही
இது ரெண்டொடும் சேராத பொன்நேரம் (इदु रॆण्डॊडुम् सेराद पॊन्नेरम्)
ह्या दोन्ही पेक्षा वेगळा सोनेरी क्षण आहे

இது இருள் அல்ல , அது ஒளி அல்ல (इदु इरुळ् अल्ल , अदु ऒळि अल्ल )
हा अंधारही नाही , हा उजेडही नाही
இது ரெண்டொடும் சேராத பொன்நேரம் (इदु रॆण्डॊडुम् सेराद पॊन्नेरम्)
ह्या दोन्ही पेक्षा वेगळा सोनेरी क्षण आहे
தலை சாயாதே விழி மூடாதே (तलै सायादे विऴि मूडादे)
चेहरा झुकवू नकोस , डोळे नकोस
சில மொட்டுக்கள் சட்டென்று பூவாகும் (सिल मॊट्टुक्कळ् सट्टॆऩ्ऱु पूवागुम् )
काही काळ्या क्षणात उमलतील
பெண்ணே பெண்ணே (पॆण्णे पॆण्णे )
अगं मुली अगं मुली
பூலோகம் எல்லாமே தூங்கிபோன பின்னே(बूलोगम् एल्लामे तूंगिपोन पिन्ने)
पृथ्वीवर सगळे झोपले की त्यानंतर
புல்லோடு பூவிழூம் ஓசை கேட்கும் பெண்ணே (पुल्लोडु पूविऴूम् ओसै केट्कुम् पॆण्णे )
गवताशी फूल बोलल्याचाही आवाज ऐकू येईल
நாம் இரவின் மடியில் பிள்ளைகளாவோம் (नाम् इरविन् मडियिल् पिळ्ळैगळावोम् )
आपण निजू रात्रीच्या मांडीवर
பாலூட்ட நிலவுண்டு (पालूट्ट निलवुण्डु)
लहान बाळासारखं दूध पाजायला चंद्र आहे

வெண்ணிலவே வெண்ணிலவே (वॆण्णिलवे वॆण्णिलवे )
शुभ्र चन्द्रा , शुभ्र चन्द्रा
விண்ணை தாண்டி வருவாயா? (विण्णै ताण्डि वरुवाया? )
आकाश सोडून येशील का ?
விளையாட ஜோடி தேவை(विळैयाड जोडि तेवै)
खेळायला जोडीदार हवाय
இந்த பூலோகத்தில் யாரும் பார்க்கும்முன்னே (इन्द बूलोगत्तिल् यारुम् पार्क्कुम्मुन्ने )
ह्या धरणीवर बघण्याआधी
உன்னை அதிகாலை அனுப்பி வைப்போம் (उन्नै अदिकालै अनुप्पि वैप्पोम् )
तुला पहाटेच परत जाऊ देऊ

எட்டாத உயரத்தில் நிலவை வைத்தவன் யாரு (एट्टाद उयरत्तिल् निलवै वैत्तवन् यारु )
पोचता येणार नाही इतक्या उंचीवर चंद्र कोणी ठेवला ?
கையோடு சிக்காமல் காற்றை வைத்தவன் யாரு (कैयोडु सिक्कामल् काट्रै वैत्तवन् यारु )
हातात धरता येणार नाही असा वारा कोणी केला
இதை எண்ணி எண்ணி இயற்கையை வியக்கிறேன் (इदै एण्णि एण्णि इयऱ्कैयै वियक्किरेन् )
हा विचार करून करून निसर्गाचे आश्चर्य वाटते
எட்டாத உயரத்தில் நிலவை வைத்தவன் யாரு (एट्टाद उयरत्तिल् निलवै वैत्तवन् यारु )
पोचता येणार नाही इतक्या उंचीवर चंद्र कोणी ठेवला ?
பெண்ணே பெண்ணே (पॆण्णे पॆण्णे )
अगं मुली अगं मुली

பூங்காற்று அறியாமல் பூவை திறக்க வேண்டும் (पुंगाट्रु अऱियामल् पूवै तिऱक्क वेण्डुम् )
फुलांच्या वाऱ्याला न कळता फूल उमलण्याची इच्छा आहे
பூக்கூட அறியாமல் தேனை ருசிக்க வேண்டும் (पूक्कूड अऱियामल् तेनै रुसिक्क वेण्डुम्)
फुलाच्याही नकळत मधाचा आस्वाद घ्यायचाय
அட உலகை ரசிக்க வேண்டும் நான் (अड उलगै रुसिक्क वेण्डुम् नान्)
अगं मला तर पूर्ण जगाचा आस्वाद घ्यायचाय
உன் போன்ற பெண்ணோடு (उन् पोन्ऱ पॆण्णोडु)
तुझ्या सारख्या मुलीसह

வெண்ணிலவே வெண்ணிலவே (वॆण्णिलवे वॆण्णिलवे )
शुभ्र चन्द्रा , शुभ्र चन्द्रा
விண்ணை தாண்டி வருவாயா? (विण्णै ताण्डि वरुवाया? )
आकाश सोडून येशील का ?
விளையாட ஜோடி தேவை (विळैयाड जोडि तेवै एय्)
खेळायला जोडीदार हवाय
இந்த பூலோகத்தில் யாரும் பார்க்கும்முன்னே (इन्द बूलोगत्तिल् यारुम् पार्क्कुम्मुन्ने )
ह्या धरणीवर बघण्याआधी
உன்னை அதிகாலை அனுப்பி வைப்போம் (उन्नै अदिकालै अनुप्पि वैप्पोम् )
तुला पहाटेच परत जाऊ देऊ

अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link