ऊतुक्काडु वेंकट “कवी” सुब्बैयार हे १७००-१७६५ मधील तमिळ कवी आणि संगीतकार. त्यांच्या रचना कर्नाटक शास्त्रीय संगीतात प्रसिद्ध आहेत. तंजावर वर मराठ्यांची सत्ता असतानाच्या काळातले ते कवी. त्यांच्या काही मराठी रचनाही आहेत म्हणे.
त्यांची ही एक रचना – “विषमक्कारक् कण्णन्” . बाल कृष्णाच्या खोड्या वर्णन करणारे तितकेच मजेशीर पारंपरिक तामिळ गाणे आहे.
ते तितक्याच मजेशीर ढंगात स्वरबद्धसुद्धा केलं आहे. ते ऐकायला मजा येतेच. ह्या गाण्यावरची भरतनाट्यम नृत्य सुद्धा बघा.
(टीप – पुढे काही शब्दांमध्ये तुम्हाला वेगळ्या मात्रा दिसतील. कॆ, गॆ, चॆ, जॆ, ऒ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे के, गे, चे, जे इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान. तसंच कॊ, गॊ, चॊ, जॊ इ. ह्यांचा उच्चार नेहमीच्या अक्षरांसारखाच आहे म्हणजे को, गो, चो, जो, ओ इ. पण थोडा ऱ्हस्व (म्हणजे नेहमीपेक्षा लहान). तमिळ मध्ये दोन “ळ” आणि दोन “र” आहेत. दुसरा उच्चार दाखवण्यासाठी खाली बिंदू असणारे “ळ” आणि “र” वापरले आहेत.)
விஷமக்காரக் கண்ணன்.. विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
விஷமக்காரக் கண்ணன் विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
பொல்லாத விஷமக்காரக் கண்ணன். पॊल्लाद विषमक्कारक् कण्णन्
अतिशय खोडकर कान्हा
பொல்லாத விஷமக்காரக் கண்ணன்..पॊल्लाद विषमक्कारक् कण्णन्
अतिशय खोडकर कान्हा
வேடிக்கையாய் பாட்டுப் பாடி..वेडिक्कैयाय् पाट्टुप् पाडि
चित्रविचित्र गाणी म्हणत
விதம் விதமாய் ஆட்டம் ஆடி.. विदम् विदमाय् आट्टम् आडि
नाना तऱ्हेने नाच करत
நாழிக்கொரு லீலை செய்யும் नाऴिक्कॊरु लीलै सॆय्युम्
रोज एक लीला करतो
நந்த கோபால கிருஷ்ணன்.. नन्द गोपाल किरुष्णन्
नन्द गोपाल कृष्ण
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्!
खोडकर कान्हा
வேடிக்கையாய் பாட்டுப் பாடி..वेडिक्कैयाय् पाट्टुप् पाडि
चित्रविचित्र गाणी म्हणत
விதம் விதமாய் ஆட்டம் ஆடி.. विदम् विदमाय् आट्टम् आडि
नाना तऱ्हेने नाच करत
நாழிக்கொரு லீலை செய்யும் नाऴिक्कॊरु लीलै सॆय्युम्
रोज एक लीला करतो
நந்த கோபால கிருஷ்ணன்.. नन्द गोपाल किरुष्णन्
नन्द गोपाल कृष्ण
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्!
खोडकर कान्हा
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्!
खोडकर कान्हा
நீலமேகம் போலே இருப்பான்.. नीलमेगम् पोले इरुप्पान्
नीलमेघासारखा आहे
நீலமேகம் போலே இருப்பான்.. नीलमेगम् पोले इरुप्पान्
नीलमेघासारखा आहे
பாடினாலும் நெஞ்சில் வந்து குடியிருப்பான்..पाडिनालुम् नॆंजिल् वन्दु कुडियिरुप्पान्
गायला की मनात ठसतो
நீலமேகம் போலே இருப்பான்.. नीलमेगम् पोले इरुप्पान्
नीलमेघासारखा आहे
பாடினாலும் நெஞ்சில் வந்து குடியிருப்பான்..पाडिनालुम् नॆंजिल् वन्दु कुडियिरुप्पान्
गायला की मनात ठसतो
கோலப் புல்லாங்குழல் ஊதி गोलप् पुल्लांगुऴल् ऊदि
बासरी वाजवून
கோபிகைகளை கள்ளமாடி..गोपिगैगळै कळ्ळमाडि
गोपींकडून चोरी करतो
கோலப் புல்லாங்குழல் ஊதி गोलप् पुल्लांगुऴल् ऊदि
बासरी वाजवून
கோபிகைகளை கள்ளமாடி..गोपिगैगळै कळ्ळमाडि
गोपींकडून चोरी करतो
கொஞ்சம் போல வெண்ணை தாடி कॊंजम् पोल वॆण्णै ताडि
“थोडं तरी लोणी दे गं”
என்று கேட்டு ஆட்டமாடி..एन्रु केट्टु आट्टमाडि
असं म्हणत नाचतो
விஷமக்காரக் கண்ணன்..विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्!
खोडकर कान्हा
பக்கத்து வீட்டுப் பெண்ணை அழைப்பான் पक्कत्तु वीट्टुप् पॆण्णै अऴैप्पान्
शेजारपाजारच्या मुलींना बोलावतो
பக்கத்து வீட்டுப் பெண்ணை அழைப்பான் पक्कत्तु वीट्टुप् पॆण्णै अऴैप्पान्
शेजारपाजारच्या मुलींना बोलावतो
முகாரி ராகம் பாடச்சொல்லி வம்புக்கிழுப்பான் मुकारि रागम् पाडच्चॊल्लि वम्बुक्किऴुप्पान्
“मुकारी” राग गाऊन दाखवायचा हट्ट करतो
பக்கத்து வீட்டுப் பெண்ணை அழைப்பான் पक्कत्तु वीट्टुप् पॆण्णै अऴैप्पान्
शेजारपाजारच्या मुलींना बोलावतो
முகாரி ராகம் பாடச்சொல்லி வம்புக் கிழுப்பான் मुकारि रागम् पाडच्चॊल्लि वम्बुक्किऴुप्पान्
“मुकारी” राग गाऊन दाखवायचा हट्ट करतो
எனக்கு அது தெரியாது என்றால் एनक्कु अदु तॆरियादु एन्राल्
“मला येत नाही” म्हटलं की
நெக்குருகக் கிள்ளி விட்டு, नॆक्कुरुगक् किळ्ळि विट्टु,
जोरदार चिमटा काढतो
எனக்கு அது தெரியாது என்றால் एनक्कु अदु तॆरियादु एन्राल्
“मला येत नाही” म्हटलं की
நெக்குருகக் கிள்ளி விட்டு, नॆक्कुरुगक् किळ्ळि विट्टु,
जोरदार चिमटा काढतो
அவளை நெக்குருகக் கிள்ளி விட்டு.. अवळै नॆक्कुरुगक् किळ्ळि विट्टु,
तिला जोरदार चिमटा काढतो
அவள் விக்கி விக்கி அழும்போது, अवळ् विक्कि विक्कि अऴुम्बोदु,
ती हमसून हमसून रडू लागल्यावर
இதான்டி முகாரி ராகம் என்பான்! इदान्डि मुकारि रागम् एन्बान्!
“हाच आहे ‘मुकारी’ राग” असं म्हणतो
விஷமக்காரக் கண்ணன்.. विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
எனக்கு அது தெரியாது என்றால் एनक्कु अदु तॆरियादु एन्राल्
“मला येत नाही” म्हटलं की
நெக்குருகக் கிள்ளி விட்டு.. नॆक्कुरुगक् किळ्ळि विट्टु,
जोरदार चिमटा काढतो
விக்கி விக்கி அழும்போது, विक्कि विक्कि अऴुम्बोदु,
हमसून हमसून रडू लागल्यावर
இதான்டி முகாரி என்பான்! इदान्डि मुकारि एन्बान्!
“हाच आहे ‘मुकारी’ राग” असं म्हणतो
விஷமக்காரக் கண்ணன்.. विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
வெண்ணை பானை மூடக்கூடாது, वॆण्णै पानै मूडक्कूडादु,
लोण्याचं मडकं झाकायचं नाही बरं !
வெண்ணை பானை மூடக்கூடாது.. वॆण्णै पानै मूडक्कूडादु,
लोण्याचं मडकं झाकायचं नाही बरं !
இவன் வந்து விழுங்கினாலும் கேட்கக்கூடாது.. इवन् वन्दु विऴुंगिनालुम् केट्कक्कूडादु
ह्याने येऊन मटकावलं तरी विचारायचं नाही बरं !
இவன் அம்மாக்கிட்டே சொல்லக்கூடாது..इवन् अम्माक्किट्टे सॊल्लक्कूडादु
त्याच्या आईला सांगायचं नाही बरं
சொல்லிவிட்டால் அட்டகாசம் தாங்க ஒண்ணாது..! सॊल्लिविट्टाल् अट्टगासम् तांग ऒण्णादु!
सांगितलंत तर त्याचा राग-गोंधळ सहन करण्यापलीकडचा होतो
சும்மா ஒரு பேச்சுக்கானும் सुम्मा ऒरु पेच्चुक्कानुम्
नुसतं एखाद्या शब्दापुरतं
திருடன் என்று சொல்லிவிட்டால், तिरुडन् एऩ्ऱु सॊल्लिविट्टाल्,
“चोर” म्हणालात तर ..
இவனை திருடன் என்று சொல்லிவிட்டால்.. इवनै तिरुडन् एऩ्ऱु सॊल्लिविट्टाल्
त्याला “चोर” म्हणालात तर ..
உன் அம்மா, பாட்டி, அத்தை, தாத்தா उन् अम्मा, पाट्टि, अत्तै, तात्ता
“तुमची आई , आजी , आत्या, आजोबा
அத்தனையும் திருடனென்பான்..! अत्तनैयुम् तिरुडनॆन्बान् !
सगळे चोर” असं म्हणतो
விஷமக்காரக் கண்ணன்.. विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
சும்மா ஒரு பேச்சுக்கானும் सुम्मा ऒरु पेच्चुक्कानुम्
नुसतं एखाद्या शब्दापुरतं
திருடன் என்று சொல்லிவிட்டால், तिरुडन् एऩ्ऱु सॊल्लिविट्टाल्,
“चोर” म्हणालात तर ..
உன் அம்மா, பாட்டி, அத்தை, தாத்தா उन् अम्मा, पाट्टि, अत्तै, तात्ता
“तुमची आई , आजी , आत्या, आजोबा
அத்தனையும் திருடனென்பான்..! अत्तनैयुम् तिरुडनॆन्बान् !
सगळे चोर” असं म्हणतो
விஷமக்காரக் கண்ணன்.. विषमक्कारक् कण्णन्
खोडकर कान्हा
வேடிக்கையாய் பாட்டுப் பாடி..वेडिक्कैयाय् पाट्टुप् पाडि
चित्रविचित्र गाणी म्हणत
விதம் விதமாய் ஆட்டம் ஆடி.. विदम् विदमाय् आट्टम् आडि
नाना तऱ्हेने नाच करत
நாழிக்கொரு லீலை செய்யும் नाऴिक्कॊरु लीलै सॆय्युम्
रोज एक लीला करतो
நந்த கோபால கிருஷ்ணன்.. नन्द गोपाल किरुष्णन्
नन्द गोपाल कृष्ण
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्!
खोडकर कान्हा
விஷமக்காரக் கண்ணன்! विषमक्कारक् कण्णन्!
खोडकर कान्हा
अजून तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link