पुस्तक : When only love remains (व्हेन ओन्ली लव्ह रिमेन्स )

लेखक : Durjoy Datta (दुर्जोय दत्ता)

भाषा : English (इंग्रजी)

पाने : २७८

ISBN : 978-0-14342264-8

एक एअर होस्टेस तरुण मुलगी एका गिटार वाजवणाऱ्या, गाणाऱ्या मुलाची गाणी त्याच्या युट्यूब वर ऐकते. गाणी बेताचीच असली तरी तिला ती खूप भावतात. ती त्याच्या प्रेमातच पडते. मग त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळते. ते प्रेमात पडतात. लगेच एकत्र राहायला लागतात. मग अचानक वाईट प्रसंग. प्रेमाने एकमेकांची साथ देणं होतं. सगळं टिपिकल प्रेमकहाणी सारखं. सगळं सोपं गोडगोड. व्यवसाय-धंदे, जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी याचं टेन्शन नाही, आजूबाजूचे लोक – घरची मंडळी यांच्या भूमिका गृहीतच धरलेल्या. आणि मग ओढूनताणून नाट्य.

पुस्तकाची भाषा सोपी आहे. पण कथा , पात्र रचना, पात्र रंगवणे काही जमलेलं नाही. चार ओळींचं कथाबीज आहे. त्यामुळे लेखकाची खरी कमाल ती फुलावण्यातच होती. पण ते काही जमलेलं नाही. चाळत चाळत पुस्तक वाचलं तरी काही राहून गेल्यासारखं वाटलं नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/