पुस्तक – Yes! I am corrupt (येस! आय अॅम करप्ट )
लेखक – Arun Harkare (अरुण हरकारे)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – १२४
ISBN – दिलेला नाही

लेखक श्री. अरुण हरकारे ह्यांनी हे पुस्तक मला वाचण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. 

भ्रष्टाचार हा भारतीय समजाला जडलेला असाध्य रोग. सरकारी काम म्हणजे त्यात दिरंगाई, कामाची कमी गुणवत्ता आणि संबंधितांची पैशाची बेगमी हे कटू वास्तव. रोज वृत्तपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवर नवनवीन घोटाळे आपण वाचत असतो. अश्याच एका घरबांधणी घोटाळ्यावर आधारित ही कादंबरी/दीर्घ कथा आहे. ह्यात सरकारी गृहनिर्माण खात्यातर्फे गरीबांसाठी घरं बांधली जातात पण ती घरं अतिशय वाईट दर्जाची असतात. निकृष्ट माल वापरून कंत्राटदार पैसे कमावतो. ह्याकडे कानाडोळा करण्याचे पैसे सरकारी अधिकारी, राजकारणी, मंत्री घेतात. कोणी नियमानुसार काम करायला गेले तर त्याला ह्या व्यवस्थेत टिकून दिले जात नाही. एका प्रामाणिक कंत्राटदाराला प्रामाणिकपणाचं फळ मिळतं. खोट्यानाट्या तक्रारी दाखवून त्याच्याकडून काम काढून घेतलं जातं. जबर दंड वसूल केला जातो. बिचारा देशोधडीला लागतो. त्याचा मुलगा मोठा होऊन दुसऱ्या बिल्डर कडे नोकरीला लागतो. नाईलाजाने त्याला भ्रष्टाचारात सामील व्हावे लागते. पण ह्या व्यवस्थेची माहिती मिळवून, आपल्या वडिलांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो.

तो यशस्वी होतो का? आणि झाला तर ही भ्रष्ट व्यवस्था त्याला सुखासुखी जगू देईल का? हे तुम्हाला कादंबरी वाचल्यावर कळेल.

भ्रष्टाचार कसा होतो त्याचा एक प्रसंगभ्रष्ट अधिकाऱ्याने बांधलेल्या इमारतीत अपघात होतो. ह्या प्रकरणात त्याला अडकवण्यासाठी कादंबरीचा नायक लोकांना उकसावतोकादंबरीची कथा तशी साधी आहे. पात्रे द्विरंगी आहेत. भ्रष्टाचारी हे “निखळ भ्रष्टाचारी” आहेत. सरळ सरळ पैसे मागतात नाहीतर काम करणार नाही म्हणतात. सरळमार्गी माणसं सरळ वागतात. त्यामुळे भ्रष्टाचार लपवायच्या क्लृप्त्या, बेरकीपणा, खोटेपणा उघड करण्यासाठी करावे लागलेली शोध मोहीम; सज्जनाची अगतिकता असलं काही नाट्य किंवा चढउतार नाहीत. पात्रांची मनोभूमिका रंगवायचा प्रयत्न नाही. पुस्तकाच्या शेवटी शेवटी तर एखाद्या घटनेचे वृत्त सांगावे तसे दुसरे पात्र घटनांची जंत्री सांगते. पेपरात आलेल्या खऱ्या खऱ्या बातम्यांची यादी दिली आहे. त्यामुळे कथा-कादंबरीचा बाज पूर्णपणे निघून जातो.

परीक्षणाच्या सुरुवातीला म्हटलं तसं, भ्रष्टाचाराच्या बातम्या नेहमी वाचनात येत असतात. त्या बातम्याही सुरस-चमत्कारिक-रम्य(!) असतात(दुर्दैवाने). त्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन हे पुस्तक काही सत्य खणून वाचकांसमोर मांडत नाही; संबंधितांच्या जाणिवांचा वेध घेत नाही किंवा ही समस्या सोडवण्याचा एखादा नावा मार्ग सांगत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

<a href=”https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/”>https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/</a>

&nbsp;