पुस्तक : खेळिया – कथा नरेंद्र मोदी नामक झंझावाताची (Kheliya – Katha Narendra Modi Namak Jhanjhavatachi)
लेखक – सुदेश वर्मा (Sudesh Verma)
अनुवादक – सुधीर जोगळेकर (Sudhir Joglekar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ४२०
मूळ पुस्तक – Narendra Modi : The game changer
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी
ISBN – 978-93-80549-93-4
प्रकाशक – मैत्रेय प्रकाशन
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ह्या व्यक्तिमत्त्वाने गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजाला आकर्षित केलं आहे. सामाजिक जीवनात वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. प्रेम आणि द्वेष; विश्वास आणि भीती अश्या टोकाच्या भावना त्यांच्याबद्दल समाजात आहेत. भावना कुठल्याही असोत त्या जितक्या सत्यावर आधारित किमान पक्षी उपलब्ध माहितीच्या आधारावर असतील तितक्या चांगल्या. त्यामुळे मोदीयुगात वावरताना आपल्याला मोदींबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यादृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे.
हे पुस्तक(पहिली आवृत्ती) २०१३ साली प्रकाशित झाली आहे. त्यावेळी भाजप ने पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून मोदींचं नाव पुढे आणलं होतं. गुजरात मॉडेल राबवणारे मोदी, विकासाचं राजकारण करणारे मोदी, २००२ गुजरात दंगलींबद्दल टीका झेलणारे मोदी  असा मतामतांचा गलबला झालेला असताना माहिती, सत्य, तथ्य लोकांसमोर आणावं ह्या उद्देशाने लेखकाने हे पुस्तक लिहिलं आहे.
त्या मनोगतातला हा भाग

 

 

२०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुढच्या आवृत्तीत निवडणुकांमधल्या अभूतपूर्व विजयाबद्दलचं एक प्रकरण जोडण्यात आलं. मोदींच्या जन्मापासून २०१४ पर्यंतच्या जीवनातले महत्त्वाचे टप्पे यात सविस्तर सांगितले आहेत.
अनुक्रमणिका
नरेंद्र मोदींचा मूळचा पिंड सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याकडे कल असलेला. पण तरुण वयात संपर्कात आलेल्या अधिकारी व्यक्तींकडून त्यांना आपले जीवन समाजाभिमुख करण्याचा सल्ला मिळाला.  त्याबद्दलचा पुस्तकातला एक प्रसंग

 

आधी संघ स्वयंसेवक, संघ अधिकारी मग भाजप मध्ये कार्यकर्ता असा मोदींचा प्रवास सुरु झाला. आणीबाणीच्या काळात त्याविरुद्धच्या चळवळीत झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता दाखवणारा एक प्रसंग
स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाने, समर्पणाने गुजराथ राज्यातल्या भाजप संघटनेत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. निवडणुका जिंकण्यामध्ये त्यांच्या व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. तरीही केशूभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेला या बड्या प्रस्थांच्या गटबाजीत मोदींचा बळी गेला. दोन्ही बाजूंना ते आपले विरोधी आणि प्रतिस्पर्धी वाटत होते. आणि आज आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही अशी घटना घडली होती. मोदींची गुजराथ भाजप मधून दूर करण्यात आलं. त्यावेळच्या मोदींच्या भावना दाखवणारा हा प्रसंग

 

मोदींना थेट उत्तरेत हरियाणा, हिमाचल, पंजाब इ. राज्यांत जबाबदारी देण्यात आली. तिथे सुद्धा त्यांनी चमकदार कामगिरी केली. पुढे गुजराथेतली राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी पक्षाला मोदींनाच पाचारण करावं लागलं. हा घटनाक्रम पुस्तकात सविस्तर आला आहे.
मुख्यमंत्री झाल्यावर “गुजरात मॉडेल” आकार घेऊ लागलं. शेती, उद्योग, कौशल्य विकास, पर्यटन, ऊर्जा पुरवठा, दळणवळण प्रत्येक क्षेत्रात गुजराथ मध्ये नवनव्या योजना त्यांनी सुरू केल्या. नोकरशाहीला कामाला लावलं. तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल सेवा, ऑनलाईन माहिती, एक खिडकी योजनांतून सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांचं “सरकारी काम” सोपं केलं. “गुजरात विकास प्रारूपा”च्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्र प्रकरण आहे. योजना, त्यांचं स्वरूप, दिसलेले परिणाम हे सगळं सविस्तर समजावून दिलं आहे.
नोकरशाहीची मानसिकता बदलली. प्रामाणिक अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या. निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. त्याबद्दलच्या प्रकरणातला हा भाग

 

जुनाट पद्धतीने विचार करून शेती व्यवसायाची जुनाट दुखणी दूर होणार होणार नाहीत हे ओळखून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी कल्पक कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याची एक झलक

 

 

कमी चर्चिला जाणारा आणि दाखवायला आकर्षक नसणारा असा सामाजिक आरोग्याचा, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा मुद्दा सुद्धा मोदींच्या नजरेतून सुटला नाही. त्यात खूप प्रगती बाकी असली तरी सुधारणेला सुरुवात झाली आहे. ती आकडेवारी एका प्रकरणात आहे. त्याबद्दल

 

ह्या सगळ्या विकासकामांमधून गुजराथ मधल्या मुस्लिम समाजाचा सुद्धा विकास झाला. पुन्हा पुन्हा मोदी निवडणुका जिंकत राहिले. मुस्लिम बहुल भागातून सुद्धा भाजप जिंकू लागला. तरीही मोदी म्हणजे मुस्लिम विरोधी हे टुमणं चालूच. पण ज्यांनी खरंच मोदींचं काम बघितलं, प्रत्यक्ष संपर्क साधला त्या मुस्लिम व्यक्तींचं सुद्धा मतपरिवर्तन झाल्याचे कितीतरी किस्से या पुस्तकात दिले आहेत. त्यातली ही दोन पानं

 

 

“बोलणाऱ्याची माती खपते पण न बोलणाऱ्याचे सोनेही खपत नाही” हा आपला अनुभव. मोदी मात्र सोनेरी काम करण्यात हुशार तितकेच बोलण्यात आणि कामाची जाहिरात करण्यात सुद्धा हुशार. त्या पैलूवर – मोदींचं गुजराथेतल्या आणि २०१४ च्या निवडणूक प्रचाराचं प्लॅनिंग , लोकांची नस ओळखून मुद्द्यांची निवड, प्रचाराची पद्धत – याबद्दल सुद्धा प्रकरणं आहेत.
पुस्तक बारीक टायपातलं भलं मोठं आहे. पण माहितीने भरलेलं आहे. सुधीर जोगळेकरांनी केलेलं भाषांतर सुद्धा सोपं, सहज आहे.

मोदी किती सांगोपांग विचार करू शकतात, नव्या कल्पना पुढे आणणाऱ्या लोकांना कशी मदत करतात आणि राज्याचा शब्दशः सर्वांगीण विकास कसा साधतात हे वाचून आपण थक्क होतो. इतक्या काय काय गोष्टी सुरु झाल्या होत्या की त्याची वरवर माहिती वाचताना सुद्धा आपण दमतो. तर हे सगळं घडवण्याचं किचकट काम सर्वाना बरोबर घेऊन, विरोध व टीका झेलून, अपयशाची शक्यता गृहीत धरून करताना मोदींची किती दमछाक झाली असेल !!  ह्या माहितीने मोदी विरोधी सुद्धा आपल्या विरोधाचा पुन्हा विचार करतील. गेला बाजार “मोदींचं सगळंच वाईट” ह्या मातापासून ढळून “त्यांचं बरंच चांगलं सुद्धा आहे” इतपत तरी येतील असं वाटतं.  सजग वाचकाला नक्की आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

राजकारण, समाजकारण यांच्याशी संबंधित अजून पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/