पुस्तक – रेत समाधी (Ret Samadhi)
लेखिका – गीतांजली श्री (Geetanjali Shree)
अनुवादक – सरिता आठवले (Sarita Athavale)
भाषा – मराठी
पाने – ४१४
मूळ पुस्तक – रेत समाधी
भाषा – हिंदी
प्रकाशन – मधुश्री पब्लिकेशन, फेब्रुवारी २०२३
ISBN – 978-81-959784-3-4
छापील किंमत – रु. ४९९/-

वाचनालयात नवीन पुस्तक, “बुकर पारितोषिक” विजेते पुस्तक दिसल्यावर उत्सुकतेने हातात घेतलं. पाठमजकूर (ब्लर्ब) सुद्धा इंटरेस्टिंग वाटला. “ऐंशी वर्षाची एक वृद्धा पतिनिधनांनंतर घरात निराश बसली आहे. तिला पुन्हा माणसात आणण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करतायत. पण तिला हे काही नकोय आणि अचानक तिला काहीतरी नवीन आयुष्य हवंय. ती मुक्त स्वच्छंद होते .. ” असं लिहिलं होतं(वरच्या फोटोत ते तुम्ही पूर्ण वाचू शकाल). त्यामुळे उत्सुकतेने पुस्तक वाचायला घेतलं. मात्र पहिली कितीतरी पानं वाचली तरी गोष्ट काही पुढेच सरकेना. घरातले लोक तिच्याशी बोलायचा प्रत्यन करतायत हे कळलं. पण ते काही खास करतायत असं दिसत नव्हतं. ज्या नेपथ्याकडे फक्त अंगुलीनिर्देश पुरेसा आहे त्या नेपथ्याचं, घरातल्या साध्या साध्या गोष्टींचं वर्णन करण्यात कितीतरी परिच्छेद. मग मी पानं झरझर वाचून मूळ कथानक कुठे सुरु होतंय ते बघतोय; तर नाहीच. वर्णनं, “रँडम” प्रसंग, कोणाचे कल्पनाविलास, काही स्वप्न, असंबद्ध बडबड.

कदाचित ह्या वेळी लेखिकेची शैली मला पटत नसेल; जरा ताजेतवाने असताना वाचूया म्हणून वेगळ्या वेळी वाचलं, दोन दिवसांनी वाचलं. पण काहीच अर्थबोध झाला नाही. पुस्तकाने पकड घेतली नाहीच. चाळून संपवून टाकलं.

नुसता शाब्दिक अतिसार ! बाहेर बरंच येतंय पण उपयोगाचं काहीच नाही ! त्यामुळे ते वाचण्यात वेळ घालवला नाही.

तुम्ही सुद्धा ही थोडी पानं वाचून काही अंदाज येतोय का बघा. काही प्रसंगांची उदाहरणं खाली दिली आहेत. ते प्रसंग काय आहेत आणि का आहेत, हे मला कळलं नाही त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी सांगू शकत नाही.

प्रसंग १


प्रसंग २


प्रसंग ३


“आंतरराष्ट्रीय पारितोषिक” प्राप्त पुस्तकांचा/लेखकांचा हा धडकी भरणारा अनुभव नवा नाही. “White tiger “, “God of small things”, नेमाडे यांचे हिंदू, सलमान रश्दींचे “Shalimar the clown” अशीच कंटाळवाणी. “God of small things” मध्ये सुद्धा कसं भरताड वर्णन आहे हे मी लिहिलेल्या परीक्षणात वाचू शकाल
https://learnmarathiwithkaushik.com/courses/the-god-of-small-thing/
“हिंदू.. ” पण तसंच
https://learnmarathiwithkaushik.com/courses/hindu-jaganyachi-sammruddh-adagal/

लेखक, संपादक, प्रकाशक, “सुजाण वाचक”, पुरस्कार समिती, अनुवादक, अनुवादाचा संपादक,आणि अनुवादाचा प्रकाशक इतक्या चाळण्यांतून सुद्धा असा मजकूर बाहेर येतो आणि तो गौरवला जातो ! काही वेगळ्याच मुशीतून ही माणसं घडवली असावी.
हिंदीतल्या “रेत”ला मराठीत वाळू किंवा रेती म्हणतो. “रेत” चा मराठी अर्थ वीर्य, शुक्राणू असा आहे. भाषांतर करताना नाव बदलायला पाहिजे होते. हा सुद्धा एक विचित्रपणा आहे.

खरं म्हणजे हे परीक्षण लिहिण्यात सुद्धा वेळ घालवणार नव्हतो. पण कदाचित माझं परीक्षण वाचून वाचकांना कल्पना येईल आणि हे पुस्तक घेताना ते सावध होतील. आणि ज्यांना पुस्तक आवडलं असेल ते मला त्यांचं मत सांगतील. म्हणून परीक्षण लिहायचं ठरवलं. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचायचं धाडस केलं असेल तर तुमचा अनुभव सांगा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet