पुस्तक – टाकाची मोडी पत्रे (Takachi modi patre)
लेखक – मंदार लवाटे आणि सौ. भास्वती सोमण (Mandar Lawate & Bhaswati Soman)
पाने – ११२
भाषा – मराठी (Marathi)
ISBN – 978-81-933412-4-7
ऐतिहासिक मोडी लिपी शिकण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढत आहे. त्यादृष्टीने नवीन पुस्तके व युट्युब चॅनल सुद्धा हळूहळू पुढे येतायत. ह्या आधी अश्या काही पुस्तकांची माहिती मी दिली होती. (त्यांच्या लिंक्स ह्या परीक्षणाच्या शेवटी दिल्या आहेत). लवाटे-सोमण जोडीने लिहिलेल्या “सोपी मोडी पत्रे” पुस्तकानंतर त्यांचं पुढचं पुस्तक आहे “टाकाची मोडी पत्रे”. ब्रिटिशकाळात लिहिण्यासाठी बोरू ऐवजी “टाक” वापरायला सुरुवात झाली. मोडी लिपीत बदल झाला नसला तरी तिच्या दृश्यस्वरूपात बदल झाला. अक्षर छोटे झाले. त्यामुळे वाचन कठीण झाले. म्हणून मोडी सरावासाठी ह्या प्रकारची पत्रे वाचणे सुद्धा आवश्यक आहे.
पुस्तकाच्या पाठपानावर आणि मनोगतात ह्याबद्दल अजून माहिती कळेल.
पुस्तकात ५०/६० पत्रे आहेत. कुलमुखत्यारपत्र, करारपत्र अशी पत्रे थोडी आहेत. जास्त पत्रे ही दोन व्यक्तींच्या वैयक्तिक पत्रव्यवहारातली; भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद/पदाधिकारी ह्यांच्यातला पत्र व्यवहार आहे. भाषा शंभर वर्षांपूर्वीची असल्यामुळे मजकूर समजायला कठीण जात नाही. पण टाकाने लिहिताना अक्षरांच्या गाठी नीट येत नाहीत त्यामुळे बरीच अक्षरे सारखी दिसतात. थोडा गोंधळ होतो. शब्द नीट सुरू करून अर्ध्याच्या पुढे काहीतरी गिचमिड लिहून सोडून द्यायचा; वाचणारा समजून घेईल; अशी तेव्हाची लेखन पद्धती दिसते.
डाव्या पानावर मोडीतील पत्र आणि उजव्या बाजूला देवनागरी लिप्यांतरण दिलेलं आहे. कठीण शब्द लगेच तळटीपेच्या स्वरूपात दिले आहेत. एक दोन उदाहरणे देतो.
सरकारी दफ्तरातील तक्रार आणि निवारण ह्या संदर्भातले पत्र
भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद/पदाधिकारी ह्यांच्यातले पत्र
ह्या पुस्तकासाठी पत्रे गोळा करणे, त्यांतल्या योग्य पात्रांची निवड करणे, मग सगळ्यांचे लिप्यंतर करणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. कमी प्रचलित विषयावर पुस्तक छापणे हे सुद्धा धाडसाचे काम आहे. पण मंदार लवाटे आणि सौ. भास्वती सोमण ह्यांनी हे सर्व कष्ट मोडीप्रेमापोटी उचलले आहेत. त्याबद्दल त्यांना सादर प्रणाम. मोडी लिपी शिकू इच्छिणाऱ्यांनी ह्या अभ्यासनीय आणि संग्राह्य पुस्तकाचा नक्की लाभ घेऊन लेखकांना दाद दिली पाहिजे.
पुस्तक कुठे मिळेल ?
हे पुस्तक मी फ्लिपकार्ट वरून घेतले. फ्लिपकार्ट, अमेझॉन, सह्याद्रीबुक्स ह्यांच्यावर ऑनलाईन उपलब्ध आहे.
छापील किंमत – रु. १८०/-
मी दिलेली पुस्तक श्रेणी
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
मोडी लिपीशी संबधित इतर पुस्तकांची परीक्षणे
- मोडी लिपी शिका सरावातून (Modi Script Learn & Practice)-नवीनकुमार माळी (Navinkumar Mali)
- सहज सोपी मोडी लिपी (Sahaj Sopi Modi Lipi) – श्रीकृष्ण लक्ष्मण टिळक (Shrikrushna Lakshman Tilak)
- राजर्षी शाहू छत्रपती महाराज (Rajarshi Shahu Chatrapati Maharaj)- जयसिंगराव पवार (Jayasingarav Pawar) – मोडी लिप्यंतरण नवीनकुमार माळी
- स्वामी विवेकानंदांची बोधवचने (Swami Vivekanandanchi Bodhavachane) – मोडी लिप्यंतर : नवीनकुमार माळी (Navinkumar Mali)
- सोपी मोडी पत्रे (Sopi Modi Patre) – मंदार लवाटे आणि भास्वती सोमण (Mandar Lawate & Bhaswati Soman)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–