पुस्तक – बोलगप्पा (Bolgappa)
लेखक – शरद वर्दे (Sharad Varde)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २१४
प्रकाशन – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
ISBN – 978-93-87453-32-6

शरद वर्दे ह्यांनी लिहिलेल्या आणि लोकसता (चतुरंग पुरवणी), प्रहार (कोलाज पुरवणी) आणि नवाकाळ ह्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेमुळे तीन-चार पानी लहान लेख आहेत. विषय खूप वेगवेगळे आहेत. सुशिक्षित, सुखवस्तू, मध्यमवर्गीय कुटुंब ह्या लेखांचे केंद्रस्थान आहे. अश्या कुटुंबांत नेहमी घडणारे प्रसंग, गमतीजमती, छोटे वादविवाद, जीवनशैलीत पडलेला प्रचंड बदल, दोन पिढ्यांमधलं विचारांचं अंतर, परदेशस्थ कुटुंबियांच्या वागण्यावर तिथल्या राहणीमानाचा प्रभाव, भारत आणि परदेशांची तुलना असे बरेच विषय आहेत. दोन तीन लोकांच्या गप्पांच्या रूपात लेखांची मांडणी आहे. सगळे थोड्या विनोदी, हलक्याफुलक्या पद्धतीने हाताळले आहेत. खूप खळखळून हसायला लावणारे नसले तरी वाचायला छान आहेत. मनोरंजक आहेत.
काही उदाहरणे वाचूया

आंघोळ सकाळी करावी की संध्याकाळी ह्याबद्दल दोन पिढ्यांचे वेगळे विचार


बदलती, किंबहुना ढासळती शिक्षणपद्धती, शिक्षणाचा बाजार वगैरे


भारतीय असो की परदेशी, सगळी माणसं इथून तिथून सारखीच. रशियन माणसांच्या अंधश्रद्धा सांगणारा एक लेख


अनिवासी भारतीयांवरचा अमेरिकन खाद्य संस्कृतीचा परिणाम


अजून बऱ्याच विषयांवर हे लेख आहेत.


ह्या आधी शरद वर्दे ह्यांची तीन पुस्तके वाचली होती. ती अप्रतिम होती, त्यांची परीक्षणे पुढील लिंकवर वाचू शकाल.

वरची पुस्तके एका विशिष्ट विषयाला धरून आणि दीर्घलेखांची होती. त्यातून विषय व लेखकाची शैली, मांडणी ह्याची छान मजा घेता आली. “बोलगप्पा” पुस्तकाचं स्वरूप बरंच वेगळं. ते आधीच्या पुस्तकांइतकं भावलं नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/