दिवाळी अंक – दृष्टी श्रुती (२०२०) Drushti Shruti Diwali Special Edition 2020
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ३५३
ISBN – दिलेला नाही.
PDF स्वरूपात उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दृष्टी-श्रुती या पीडीएफ स्वरुपातल्या दिवाळी अंकाची सुरुवात मागच्या वर्षी झाली. त्यावेळी अंकात ह्या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली होती. त्याबद्दल पुढील लिंकवर थोडं वाचा म्हणजे या उपक्रमाचं वेगळेपण लक्षात येईल. (https://learnmarathiwithkaushik.com/courses/drushti-shruti-diwali-special-edition-2019)
ह्या वर्षीचा दिवाळी अंक “तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी कलाकृती” या संकल्पनेवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, तिथे आपली छाप सोडणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यावर प्रभाव टाकणारे पुस्तक, नाटक, चित्रपट यांच्याबद्दल लिहिलं आहे. हलकेफुलके चित्रपट, गंभीर नाटक, उपनिषद, कादंबऱ्या, स्वमदत पुस्तकं असे विविध विषय असल्यामुळे प्रत्येक लेख वेगळा आहे.
अनुक्रमणिका :

एकाअर्थी हा या कलाकृतींच्या रसग्रहणात्मक लेखांचा संग्रह आहे. पण तेवढ्यापुरते लेख मर्यादित नाहीत. कुणाला कलाकाराबद्दल अजून लिहावंसं वाटलंय, कुणाला ज्या परिस्थितीत ते पुस्तक वाचलं गेलं त्याचा प्रभाव लिहावासा वाटलाय, कोणी त्यावेळी घडलेले गमतीदार किस्से सांगितलेत तर कोणी त्या जुन्या काळात पुन्हा गुंगून गेलंय.या वाचनातून व्यक्तीला काय दिलं, काय परिणाम साधला हे सुद्धा कळतं. “मी का वाचतो किंवा मी का कलाकृती बघतो, ऐकतो” याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळं येईल. अशीच वेगवेगळी उत्तरं आपल्याला या लेखांमध्ये दिसतील. त्यातली काही आपल्याशी जुळतील काही नवी कळतील.

दिलीप प्रभावळकर यांनी “चौकट राजा”, “हसावा फसवी” इ. मधले अनुभव सांगितले आहेत . तर करुणेचा कोशंट लेखात मंदार कुलकर्णी “चौकट राजा” त्यांच्या मनाला  कसा भिडला हे सांगतात. प्रभावळकरांच्या लेखातली दोन पानं.
गणेश मतकरींच्या लेखानुसार तर “दिलवाले दुल्हनिया ..” बघून त्याबद्दल लिहावंसं वाटलं; यातून चित्रपट समीक्षा लेखनाच्या कारकिर्दीचे बीज रोवले गेले आणि मुराकामी यांचा कथासंग्रह वाचनातून कथा लेखनाची सुरुवात झाली.
गंभीर चित्रपटांपेक्षा विनोदी चित्रपट जरा हलक्या दर्जाचे असा दृष्टिकोन काही जणांचा असू शकतो. पण परिस्थितीनुसार कलाकृती बघण्याचा हा भाव सुद्धा बदलू शकतो; कोरोनाकाळातला हा अनुभव सांगितलाय मृणाल कुलकर्णी यांनी.
गद्धेपंचविशी, चौघीजणी, रारंगढांग, अल्केमिस्ट इ. प्रसिद्ध पुस्तकलांवर लेख आहेत.
लेखामधलं पुस्तक, नाटक आपल्याला पण भावलं असेल तर , “अरे व्वा, मी पण हेच म्हणालो होतो” असं मनात म्हणालो. तर बरीच नवीन नावं कळली वाचायला.
“जिंदगी ना मिलेगी दोबारा” चित्रपटातून मृदुला बेळे यांना “खऱ्या जगण्याचा मूलमंत्र” सापडला तो असा

मासिकातल्या सगळ्या व्यक्ती मुळातल्याच संवेदनशील, भावनेचा ओलावा असणाऱ्या आहेत. त्यामुळे एक दोन वैज्ञानिक पुस्तकांचे उल्लेख सोडले तर भावांनाना साद घालणाऱ्या, दुसऱ्याला अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला शिकवणाऱ्या कलाकृतीच सगळ्यांना आवडल्या आहेत. त्यामुळे त्यातून मिळालेली शिकवण, वाढलेली प्रगल्भता हा मुद्द्यांचा लसावि आहे. त्यामुळे थोडा तोचतोचपणा लेखांमध्ये येतो.

थेट कलाकृतींवर नाहीत पण शिकवून जाणाऱ्या आयुष्यातला अनुभवावरचे काही लेख आहेत.

उदा.नंदुरबार मधल्या आदीवासी, गरीब वस्त्यांमधलं जगणं याबद्दल आदिती जोगळेकरचा लेख आहे.
मित्राला झालेल्या अपघाताबद्दल हृषीकेश जोशी यांनी लिहिलं आहे.
“लिंडाऊ नोबेल सभा” या भन्नाट परिषदेची माहिती एका लेखात झाली. दर वर्षी जर्मनीतल्या लिंडाऊ मध्ये ३०-४० नोबेल पुरस्कार विजेते नवोदित वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांना भेटतात. त्या परिषदेला डॉ. दीप्ती सिधये उपस्थित होत्या. तो अनुभव त्यांनी सांगितला आहे.

रसिकांनी रसिकांसाठी तयार केलेला हा दिवाळी अंक आहे.. दिसायला साधा तरी देखणा आहे. त्याहून विशेष म्हणजे मराठीमध्ये असा उपक्रम करणाऱ्या या चमूचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या कामावर अभिप्राय देण्यासाठी हा दिवाळी अंक वाचा.

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

इतर दिवाळी अंकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/