दिवाळी अंक : इतिहासाच्या पाऊलखुणा २०२० (Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : 65
ISBN : दिलेला नाही.
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ फाईल स्वरूपात उपलब्ध असलेल्या या दिवाळी अंकाचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षीच्या या अंकाची संकल्पना स्पष्ट केली होती. ती या लिंकवर वाचू शकाल (https://learnmarathiwithkaushik.com/courses/itihasachya-paulkhuna-diwali-special-edition-2019/)

अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर लेखांचे विषय सहज लक्षात येतीलच. तसंच पीडीएफ फाईल स्वरूपात असल्यामुळे अंक लगेच चाळून बघता येईल. त्यामुळे अगदी थोडक्यात लिहितो.

पुण्याच्या प्रसिद्ध भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या स्मृती जागवणारा लेख “श्रीकृष्णार्पणमस्तु”

मराठी भाषा ज्यात दिसते असे कोरीव लेणे किंवा शिलालेख किंवा ताम्रपट कुठला ? कर्नाटकातील श्रवणबेळगोळ इथला, अलिबाग जवळच्या आक्षीतला स्तंभ का आणि कुठला ? या प्रश्नाचा सचित्र ऊहापोह “मराठी कोरीव लेखांच्या पाहिलेपणाचा वाद” या लेखात केला आहे.

जुने शिलालेख ब्राह्मी लिपीत लिहिलेले आढळतात असं आपण वाचलेलं असतं. पण त्या लिपीचं “ब्राह्मी” हे नाव खरं का धम्मलिपी ? “ब्राह्मी” हे नाव विशिष्ट समाजाने ठरवलं का ? मग इतर लिपी खरोष्टी इ. चा उल्लेख सुद्धा धम्मलिपी म्हणून होतो त्याचं काय ? या मुद्द्यांचा ऊहापोह करणारा लेख

पुढच्या लेखात मराठा साम्राज्यातल्या पत्रव्यवहारांत खगोलीय घटना उदा ग्रहणे, उल्कावर्षाव आणि हवामानाच्या घटना – वादळे, अतिवृष्टी इ. चे उल्लेख आले आहेत. त्यांची उदाहरणे दिली आहेत

शास्त्रज्ञांच्या पैजा हा गमतीशीर लेख आहे. मोठे मोठे शास्त्रज्ञ एकमेकांशी मोठ्या मोठ्या मुद्द्यांवर अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या गमतीशीर पैजा लावतात. अगदी १ डॉलरची पैज; हरल्याने मासिकाची वर्गणी भरायची इ. अशी गमतीशीर उदाहरणे या लेखात आली आहेत.

मुंबईचं उपनगर असलेल्या ठाण्यावरही मुसलमानी राजवटी होती. त्यावेळी धर्मप्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकांना मृत्युदंड सुनावण्यात आला होता. त्या घटनेची माहिती देणारा एक लेख आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेची – मुस्लिम माथेफिरूने केलेल्या हत्येची – ही तेव्हाची आवृत्ती आहे.

इतिहास संशोधनात आदराचे स्थान असलेले वि.का. राजवाडे यांचे संक्षिप्त चरित्र एका लेखात आहे.

गिर्यारोहण, ट्रेकिंग याची आवड तरुण पिढीत वाढत आहे. हौशे, नवशे, गौशे आता डोंगरदऱ्यांत जाऊ लागल्यामुळे काही अपघातसुद्धा घडू लागले आहेत. त्याबद्दल शासनाने काही नियम बनवले आहेत का याबद्दलचा एक लेखच आहे.

पुराण काळापासून भारतीय समाजात माणसाळवलेला, सैन्यात वापरला जाणारा प्राणी – हत्ती. त्याबद्दल प्राचीन पुस्तकांमध्ये काय उल्लेख आहेत याचा थोडक्यात वेध घेणारा एक लेख आहे .

अकबर बादशहाच्या स्वभावातले परस्परविरोधी पैलू आणि काही त्याने केलेले राजहट्ट यावरचा लेख आहे.

शेवटचे काही लेख इंग्रजीत आहेत. मुघल जनान्यातल्या राजवैभवात आणि तरीही एका अर्थी घुसमटीत ज्या स्त्रियांनी आपलं काही स्वतंत्र अस्तित्व दाखवायचा प्रयत्न केला त्यांचा थोडक्यात वेध घेणारा एक लेख आहे.

अमेरिकेतल्या एका भीषण तुरुंगाची व्यवस्था कशी होती, कैद्यांचे हाल कसे केले जायचे, तुरुंगाचं व्यवस्थापन याबद्दल महती एका लेखात आहे.

शेवटचा लेख रोचक आहे. इतिहासाचा आणि जो इतिहास आपण घडवतो आहोत त्याचा. फास्ट फूड चा इतिहास. मॅक डोनाल्ड या लोकप्रिय उपहारगृहा साखळीची सुरुवात कशी झाली ती कशी पसरली हा इतिहास सांगितला आहे.

असे विविध विषय या दिवाळी अंकात समाविष्ट आहेत. इतिहासात खास रुची असणाऱ्यांना आवडेलच. त्यात खूप गती नसलेल्याना सुद्धा यातले बरेचसे लेख सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी वाचनीय आहेत.

पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

इतर दिवाळी अंकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या tutorials आहेत. मी या tutorial मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/