पुस्तक – हास्यमुद्रा (Hasymudra)
लेखक – मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २३६
मुकुंद टाकसाळे यांच्या विनोदी कथांचा हा संग्रह आहे. मध्यमवर्गीय मराठी माणासांच्या घरी घडणाऱ्या घडू शकणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून, गमतीजमतीतून प्रसंग खुलवले आहेत. चारुहास पंडित यांची कथांना साजेशी व्यंगचित्रे या गोष्टींना अजूनच खुलवतात.
अनुक्रमणिका –
टकले अंकलची ट्रॅजेडी – रोजचा पेपर टाकणारा पोऱ्या चुकीचा पेपर टाकतोय म्हणून त्याला सकाळी गाठून निरोप सांगायचा. इतकी साधी गोष्ट; पण एकातून एक गोंधळ कसा घडतो आणि तो निस्तरताना अजून काय गोंधळ घडतो. ते सांगणारी कथा. “तारक मेहता का ऊल्टा चष्मा” ची आठवण येईल.
हिप्नोटिझम – संमोहन करून माणसाला वश करता येतं,त्याच्या कडून हवं ते करवून घेता येतं, त्याच्या मनातलं काढून घेता येतं असं म्हणतात. पण खरंच कोणी मनातला राग उघड उघड बोलला तर कठीण प्रसंग ओढवतो. आणि अशातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा हिप्नोटिझम कसं कामी आलं याची गोष्ट.
कबूतर जा जा जा – घरात घुसलं कबूतर आणि घरच्यांची पळापळ
नाट्यपरीक्षक काकाजी – तऱ्हेवाईक नाट्यपरीक्षकाचा नमुना आणि त्याच्या तऱ्हा
सखूची डायरी – समाजसेवा म्हणून आपल्या मोलकरणीला लिहालया शिकवणारी मालकीण आणि ही मोलकरीण मग “काय काय” लिहून ठेवते याची धमाल
शिंकामोर्तब – बोलताना आपण काही विधान केलं आणि तेवढ्यात कोणी शिंकलं तर आपण “सत्य आहे” असं म्हणतो. या योगायोगामुळे कथा नायकाचं लग्न ठरतं का आणि शिंका गेल्यावर मोडतं की काय; बघा वाचून.
चोरीचा मामला – इन मीन चार बिऱ्हाडं असणाऱ्या सोसायटीत चोरी होते – चपलांची, बादल्यांची. आणि त्यातून या सभासदांचे तात्विक वाद होतात, वॉचमन ची योजना होते आणि फसते !
मरावे परी … – एका होतकरू अभिनेत्याचा स्ट्रगल
लॅचकी चं रामायण – किल्ली घरात आणि आपण बाहेर. आणि पुढचा गोंधळात गोंधळ.
आमची माती आमचं चांदणं – १९९८ साली प्रकाशित या पुस्तकातल्या कथेला तेव्हाच्या सरकारी दूरदर्शनच्या भोंगळ कारभाराची पार्श्वभूमी आहे. काहीही विषय, कसेतरी दिग्दर्शित केलेले कार्यक्रम यातून टीव्हीवर दिसण्याच्या इच्छापूर्तीचा सुद्धा कसा विचका होतो त्यावरची गोष्ट
हात दाखवून अवलक्षण – स्वीमिंग पूल मध्ये पोहताना एका गृहस्थाला आपली जुनी मैत्रीण दिसली. तिला हात दाखवून “हाय” केलं पण. तिच्या नवऱ्याला कळल्यावर “हाय रे कर्मा” म्हणायची पाळी आली.
रात्रंदिन आम्हा परीक्षेचा प्रसंग – लहानपणापासून मुलांच्या मागे लागणारे, मुलांना चतुरस्त्र करण्याच्या नादात कितीतरी क्लासेसला घालणारे, परीक्षेला बसवणऱ्या पालक व त्यातून मुलांची होणारी कुचंबणा
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
इतर विनोदी पुस्तकांची परीक्षणे
जयवंत दळवींचा विनोदनामा (Jayavant Dalavincha Vinodanama) – जयवंत दळवी (Jayavant Dalvi)
झुळूक अमेरिकन तोऱ्याची ( Jhuluk Amerikan toryachi) – शरद वर्दे (Sharad Varde)
फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
भोकरवाडीतील रसवंतीगृह (bhokarawadItIl rasavantIgruh) -द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
राशा (Rasha)-शरद वर्दे (Sharad Varde)
બહેરો હસે બે વાર (बहेरो हसे बे वार/bahero hase be var)-તારક મહેતા (तारक मेहता/Tarak Mehata)
Mrs. Funnybones (मिसेस. फनीबोन्स) – Twinkle Khanna (ट्विंकल खन्ना)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–