पुस्तक : जगातील अद्भुत, चमत्कारी गावे  (Jagatil adbhut, chamatkari gave)
लेखक : प्रा. चंद्रकुमार नलगे  (Pro. Chandrakumar Nalage)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १०४
ISBN : दिलेला नाही 
 
आपली पृथ्वी नानाप्रकारच्या भौगोलिक रचनांनी भरलेली आहे. जमिनीचे, हवामानाचे , वनस्पतींचे कितीतरी प्रकार आहेत. मानवजातही निसर्गाचाच भाग. त्यामुळे पोशाख , खाणेपिणे, भाषा, चालीरीती, समजुती यांचे वैविध्य जगभर आढळते. काहीवेळा हे वैविध्य वैचित्र्याकडे झुकते. काहीवेळा कल्पनेपलीकडचे वाटते.
अश्या अनोख्या ठिकांणांची, गावांची, लोकांची अगदी थोडक्यात ओळख करून घेता येईल “जगातील अद्भुत, चमत्कारी गावे” या पुस्तकात .
 
एका पानात एक छायाचित्र, थोडी माहिती असं प्रत्येक लेखाचं स्वरूप आहे. वानगीदाखल ही काही पाने वाचा.
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)
 
 
पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली की अंदाज येईल की अजून काय गमतीजमती आहेत.
 

 

 
प्रस्तावनात दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व माहिती लेखकाने जमवलेली कात्रणे, त्यांच्या वाचनात आलेला मजकूर यांचे संग्रहण आहे. त्यामुळे खुद्द लेखकाने याची शहानिशा केलेली नाही. किंवा संदर्भसुद्धा दिलेले नाही. 
 
सगळ्याच गोष्टी काही अद्भुत म्हणाव्या अशा नाहीत उदा. मुंबईजवळच्या बदलापूर या शहरावरसुद्धा ह्यात लेख आहे. पण त्यात केवळ गावाची माहिती दिलेली आहे. आश्चर्य वाटायला लावणारं त्यात काही नाही. “जगातील सुंदर वाळवंट” म्हणून इराण मधल्या एका वाळवंटाचा उल्लेख आहे आणि त्याची भौगोलिक तथ्ये दिलेली आहेत. पण त्याला सुंदर म्हणण्याचं कारण काय ते दिलेलं आहे.
 
पुस्तकातली माहिती खूप गंभीर किंवा मुद्दाम लक्षात ठेवावी अशी नाही. सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात या पुस्तकात वाचलेल्या ठिकाणांचा मागोवा नेटवर घेणे, अजून माहिती मिळवणे, व्हिडीओ बघून त्याची इ-सैर करणे ओघाने आलंच. हे हलकं फुलकं माहिती-मनोरंजनात्मक पुस्तक आहे. सहज विरंगुळा म्हणून वाचायला पुस्तक चांगलं आहे. 

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

प्रवासवर्णने, वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, सामान्य ज्ञान संबंधित इतर पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/