पुस्तक : मनोगती (Manogati)
लेखक : डॉ. आनंद नाडकर्णी(Dr. Anand Nadkarni)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८६
ISBN : दिलेला नाही
 
डॉ. आनंद कुलकर्णी हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहेत. आयपीच संस्था, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र इ सामाजिक उपक्रमांत ते सक्रिय असतात. त्यांच्या वेध या उपक्रमाद्वारे समाजातल्या चांगल्याला, कर्तृत्त्वाला ते पुढे आणत असतात. ही त्यांची अगदी वरवरची ओळख आहे.
 
पाश्चात्त्य मानसोपचार तज्ञ अल्बर्ट एलिस यांची मांडणी आणि महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने मांडलेले तत्वज्ञान यांच्यातली साम्यस्थळे समजावून सांगणारे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचताना एकीकडे आपल्याला एलिस यांच्या मांडणीची, त्यांनी पुढे आणलेल्या संकल्पनांची,  मानसशास्त्रातील संज्ञांची ओळख होते. तर दुसरीकडे भारतीय अध्यात्म, तत्त्वज्ञानाकडे “कसं वागावं” हे मार्गदर्शन करणारं; “सेल्फ हेल्प” साधन म्हणून कसं बघता येईल हा दृष्टीकोन मिळतो. चर्चा मनाची, मनोव्यापारांची होत असल्यामुळे मनावर नियंत्रण, विचारांचे व्यवस्थापन, स्वसंवाद सुधारणे अशा कितीतरी उपयुक्त गोष्टी शिकता येतात. त्याबद्दलची नवनवीन तंत्र समजतात.
 
अनुक्रमणिका 

 

 
मानसशास्त्रातील ABC ची संकल्पना (Activating event, belief, consequences) समजावून सांगताना ओघात अल्बर्ट एलिस यांची REBT आणि भारतीय तत्त्वज्ञानातील ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग ही त्रिसूत्री यांच्यातलं हे साम्य समोर येतं.

 

 
 
स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वागण्याची  प्रतिक्रिया म्हणून आपण त्या व्यक्तीला लेबले चिकटवत बसतो. हा स्वार्थीच आहे; हा खूप हुशार आहे; मी मूर्खच आहे इत्यादी. अशी लेबले लावून आपण स्वतःला दुसऱ्याबद्दल आणि स्वतःबद्दल सर्वअंगाने विचार करण्यापासून जणू रोखतच असतो. या बाबतीत सुद्धा एलिस आणि विनोबा दोघांनाही काही सांगायचंय.
 
 
 
 

 

 
लेखक मानसोपचार तज्ञ आहे म्हणून तो स्वतः अगदी आदर्श वागत असल्याचे त्याचे म्हणणे नाही. उलट स्वतःमध्ये बदल घडवून आणणे किती कठीण आहे; याचा त्याला स्वानुभव आहे. म्हणूनच तो त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांशी रिलेट करू शकतो. त्यासंदर्भात स्वतःच्या रागाचं वर्णन त्यांनी कसं केलं ते बघा. अशा उदाहरणांमुळे ते केवळ पुस्तकी बोलत नाहीत तर स्वानुभवाचे बोल आहेत हे जाणवून त्यांचं लेखन आपल्याला भिडतं.

 

 
 
नामस्मरणाचा, मंत्रजपाचा पुण्य मिळवण्यासाठी जो फायदा असेल तो असो; पण मानसशास्त्रामध्ये सुद्धा जप किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणे हे एक तंत्र आहे.

 

 
 
वरच्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे तांत्रिक संकल्पना मांडणारे बोजड पुस्तक नाही तर तांत्रिक संकल्पना सोप्या शब्दात समजून सांगणारे पुस्तक आहे. आपली धार्मिक कर्मकांडे यांच्याकडे डोळस पद्धतीने  बघायला लावणारे पुस्तक आहे. आमच्या वेदात सगळं होतं असा अभिनिवेश न बाळगता आमच्या पूर्वजांनी हे आधीच सांगितलं होतं याचा सुखद अनुभव देणारं पुस्तक आहे. 
 
थोडक्यात काय; देवा-धर्माने सांगितलं म्हणून म्हणा किंवा पाश्चात्य विज्ञान सांगतंय म्हणून म्हणा; पण आपल्या मनाबद्दल, त्याच्या ताकदीबद्दल समजून घेणं किती आवश्यक आहे याबद्दल हे पुस्तक आपली जागरूकता वाढवतं. मी आणि माझ्या मनातले विचार हे वेगळे आहेत, माझ्या विचारांकडे मला त्रयस्थपणे बघता आले तर खूप मोठा पल्ला गाठता येईल हे बिंबवतं. म्हणून हे पुस्तक वाचा, चावा, पचवा असं मी म्हणेन.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————

———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

आरोग्य, स्वमदत, मानसशास्त्र, शरीरशास्त्र इ संबंधित इतर पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/