पुस्तक – झांझिबारी मसाला (Zanzibari Masala)
लेखक – उमेश कदम (Umesh Kadam)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २०२
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, मी २०२२
ISBN – 978934258570
छापील किंमत – रु. २५०/-
उमेश कदम ह्यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह आहे. ह्या कथांचं वैशीष्ट्य म्हणजे परदेशात प्रवास किंवा परदेशी माणसांशी आलेला संपर्क ह्यातून घडणाऱ्या प्रसंगांभोवती कथांची गुंफण आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार उमेश कदम हे शिक्षण आणि आपल्या नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहिले आहेत. परदेश म्हणजे फक्त युरोप अमेरीका नाही तर आफ्रिकन देश आणि पौर्वात्त्य देश सुद्धा ! ह्या वास्तव्यात त्यांना आलेले स्वानुभव, त्यांना भेटलेली माणसे, त्यांच्याकडून कळलेले किस्से ह्याला थोडी काल्पनिकतेची जोड देऊन त्यांनी ह्या कथा लिहिल्या आहेत. त्यातून प्रवासवर्णन + किश्श्यांच्या गमतीजमती + लेख + मानवी संबंधाचे पैलू असा “मसाला” तयार झाला आहे. त्याला चपखल नाव दिले आहे “झांझिबारी मसाला”
लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती वाचल्यावर त्यांच्या विद्वत्तेची आणि अनुभवसंपन्नतेची जाणीव होईल.
अनुक्रमणिका
प्रत्येक गोष्टीबद्दल थोडक्यात सांगतो
जुई जपानला जाते – लग्नाच्या वयाची मुलगी करियरसाठी जपानला जाते. पोर परदेशात जाणार म्हणून. आईवडिलांची घालमेल. तिच्या साठी भारतात “स्थळ”दर्शन चालू असताना तिला तिकडेच कोणी आवडला तर .. ?
खंडेनवमी इन मॅनहॅटन – ही गोष्ट मला खूप आवडली. एकेकाळच्या संस्थानिक घराण्यातला पण आता इंजिनियर म्हणून एमएनसी कंपनीत काम करणार मालोजी आता नोकरीसाठी अमेरिकेत गेलाय. दिवस नेमके दसऱ्याचे. खंडेनवमीची शस्त्रपूजा करायची घराण्याची परंपरा. पण अमेरिकेत खरं शस्त्र कसं बाळगणार ? तो तर गुन्हाच. पण आले देवाजिच्या मना.. तर “खंडेनवमी इन मॅनहॅटन” होईल का ?
समीरचं समांतर जीवन – मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा “चावटपणा” करण्याचा सल्ला समीरला मिळतोय. काय घडणार त्यात ? क्रायसिस मधून सुटका की नवा क्रायसिस.
बाय बाय बिजू – कथा नायक रॉटरडॅम शहरात गेल्यावर त्याची राहायची सोय होत नाही. भाषेच्या अडचणीमुळे त्यात भरच पडते. तेव्हा त्याला योगायोगाने भेटतो भारतातून आलेला बिजू. गरीब घरातून येऊन आपलं नशीब काढण्यासाठी युरोपात कष्ट करणारा बिजू. त्याच्या वागण्यामुळे मदत झाली आणि पुढे त्याच्या वागण्यामुळे त्रासही. “बरं झालं हा भेटला” ते “कशाला हा भेटला” असा प्रवास करणारी हि कथा.
वजन कमी करण्याची गुरुकिल्ली – वजन कमी करण्याच्यासाठी “डाएट”च्या प्रयत्नांमध्ये येणारं यशापयश हा नेहमीचा विनोदी विषय. नायकाची जीभ त्याच्याबरोबर बोलतेय आणि चांगलं चुंगलं खायला लावतेय असं कल्पनारंजन आहे.
पॅरिसची पोरगी पटवली पाटलानं – ही पण धमाल कथा आहे. पैशाने श्रीमंत पण परदेशाचा, परभाषेचा काही अनुभव नाही असे गावचे पाटील आपल्या मित्राबरोबर आलेत पॅरिस बघायला. त्यांना खास करून “रंगीन हसीन पॅरिस” बघायचंय. पण नुसतं बघायला गेले आणि जणू काही “बघायचा” कार्यक्रम करून आले की. पॅरिसची पोरगी पटवली. आता ही गोरी पोरगी कुठले रंग दाखवणार.
नायजेरियन (अ)सत्याचे प्रयोग – नायजेरियात काम कारणाऱ्या कथानायकाचा सहकारी त्याला त्याच्या बायकोच्या तक्रारी सांगतोय तर सहकाऱ्याची बायको नवऱ्याच्या. आता काय खरं आणि काय खोटं ?
कुस्कोचे पोलीस – कथा नायक दक्षिण अमेरिकेत गेला असताना त्याला विमानात चिनी “लियांग” भेटतो. गप्पागोष्टी होतात. आपल्या प्रवासाच्या गोष्टींची देवाणघेवाण होते. ओळख वाढते. मग ते पुढचे स्थलदर्शन एकत्र कारतात. पण पुढे प्रवासात दारू च्या अंमलाखाली पासपोर्ट हरवतो. आता “कुस्को” शहरातले पोलीसांना तो सापडतो. प्रवासातल्या “हरवले-सापडले” ची घालमेल दाखवणारा हा किस्सा.
रुसलेला किलीमांजारो नि धुसफुसलेला गोरोंगोरो – ही गोष्ट नाहीये तर “किलीमांजारो” पर्वत आणि “गोरोंगोरो” विवराच्या भेटीबद्दलचा लेख आहे. पर्वताच्या भेटीचा योग्य पुन्हा पुन्हा हुकत होता. त्यामुळे जणू तो रुसला होता असं लेखकाला वाटलं आहे. ह्या दोन ठिकाणांचं हे प्रवास वर्णन आहे.
डच पाहुणचार – दोन चिनी मित्र युरोपात फिरायला आलेत. एकाला इंग्रजी येते दुसऱ्याला फक्त चिनी भाषा. प्रवासात इंग्रजी येणारा मित्र एक दिवस लवकर परत निघतो. दुसऱ्याला फक्त एक दिवस थांबून चीनला जाणारं विमान पकडायचंय. हॉटेल मधून थेट विमानतळावर जायचंय. फार बाहेर जायचंच नाही म्हणजे भाषेची अडचण येणारच नाही. पण घालून दिलेली “लक्ष्मणरेषा” ओलांडल्यामुळे भोगावा लागला “विजनवास” – पोलीस कोठडीचा वास. असं काय केलं त्याने ? पुढे सुटका कशी होणार ?
किमया टोकियो कराराची – ही पण गोष्ट नाही तर एक माहितिरंजक लेख आहे. विमान हवेत असताना घोषणा होते की “आपण सौदी च्या हवाई हद्दीतून उडत आहोत. म्हणून पंधरा मिनिटे मद्य वितरण बंद राहील.” सौदी जमिनीवर मद्यावर बंदी आहे म्हणून आकाशात पण ? असं कसं ? विमान आकाशात असताना कोणी गडबड केली, त्रासदायक कृत्य केलं तर त्याला कुठला कायदा लागू होणार विमान कंपनीच्या देशाचा का जिथून विमान उडतंय त्या देशाचा का आणि काही ? ह्यासाठी केला गेला “टोकियो करार” आणि तो करार होण्याआधी कसे मजेशीर खटले घडले होते. हे ह्या लेखात सांगितले आहे.
काही गोष्टींची पाने उदाहरणा दाखल पहा.
जुई चा जपानचा अनुभव
मिडलाईफ क्रायसिक वर मात करण्यासाठी जरा “चावटपणा” करण्याचा सल्ला परदेशात शिरसावंद्य मानून
प्रवासात पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे हे बोलणारे दोन कथानायक … ज्यातला एक नंतर पासपोर्ट हरवतो
लेखकाचा स्वानुभव दांडगा आहे; प्रसंगाची निवड लक्षवेधक आणि मनोरंजक आहे आणि लेखनशैली तितकीच मोकळीढाकळी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे गोष्टी वाचायला खूप मजा येते. नवीन माहिती कळते. रडारड, सामाजिक संघर्ष, आजारपण-अपघात-अपमृत्यु असलं त्रासदायक काही नसल्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचन आपल्याला ताजंतवानं करत. प्रवासवर्णन-परदेशाच्या पार्श्वभूमीवरच्या कथांचा संग्रह हा ललित साहित्यातला वेगळा प्रयोग वाचकांनी नक्की वाचावा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर देशांबद्दलची माहिती, परदेशांतले अनुभव, प्रवासवर्णन इ. बद्दलच्या इतर काही पुस्तकांची परीक्षणे
- एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती (End of the world Bhatakanti) – जयप्रकाश प्रधान (Jayprakash Pradhan)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- गेशा ऑफ गिओन(Geisha of Gion) – मिनेको इवासाकी(Mineko Iwasaki) (अनुवाद : अनुराधा पुनर्वसु)
- चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin vegalya zarokyatun) – डॉ. अंजली सोमण (Dr. Anjali Soman)
- पाचूचे बेट (Pachuche Bet) – हर्मन मेलव्हिल (Herman Melville) – अनुवाद – भानू शिरधनकर (Bhanu Shirdhankar)
- फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- राशा (Rasha)-शरद वर्दे (Sharad Varde)
- वाट तिबेटची (Vat Tibetachi) – मीना प्रभु (Meena Prabhu)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–