पुस्तक – अ-मृत पंथाचा यात्री (A-mrut panthacha yatri)
लेखक – दिनकर जोशी (Dinakar Joshi)
अनुवादक – डॉ. सुषमा करोगल (Dr. Shushma Karogal)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – અ-મૃત પંથનો યાત્રી (अमृत पंथनो यात्री A-mrut panthano yatri)
मूळ पुस्तकाची भाषा – गुजराथी (Gujarati)
पाने – १९८
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, ऑक्टोबर २०११
ISBN – 978-81-8498-291-4
छापील किंमत – रु. १८०/-

गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. त्यांच्या लहानपणापासून निधनापर्यंत पूर्ण जीवनपट आहे. कथनाचा भर त्यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यात पुन्हा पुन्हा होणारे आप्तजनांचे मृत्यू, परदेशांत भेटलेले खास चाहते व्यक्ती ह्यावर आहे. त्यामुळे रवींद्रनाथ-एक माणूस-म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली असेल ह्याचा अंदाज येतो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका आणि कार्य ह्यांचे चित्रण मनाला भिडत नाही. एका चांगल्या, बऱ्यापैकी नावाजलेल्या लेखक-कवीचे चरित्र वाचतोय असं वाटत राहतं. शांतिनिकेतनाची त्यांनी सुरुवात केली हे कळते पण नक्की काय प्रयोग केले. ते त्यांना कसे सुचले असतील. त्याचे अनुभव कसे असतील हा भाग काहीच येत नाही. रवींद्र संगीत हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग आहे. तो प्रभावीपणे येत नाही. गांधीजी आणि त्यांच्या भेटी, जालियनवाला हत्याकांडाच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका असे काही राजकीय प्रसंग येतात. पण एकूणच चार भेटीगाठी, थोडी पत्रकबाजी ह्यापेक्षा जास्त काही घडल्याचं दिसत नाही. मात्र प्रसंगांच्या वर्णनात त्यांचे लाखो चाहते, समाजावर प्रभाव असे उल्लेख येतात. त्यामुळे ताळमेळ लागत नाही.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

ठाकूर खानदान म्हणजे जुन्या जमीदारी कुटुंबाचे. त्यात वाढणाऱ्या रवींद्रला जरा पाश्चात्य जीवनशैलीची ओळख व्हावी, लंडनला जायची पूर्वतयारी व्हावी अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना लहानपणी मुंबईला तर्खडकरांच्या घरी काही महिने राहायला पाठवलं होतं. तर्खडकरांच्या मुलीशी त्यांचे स्नेहसंबंध जमले. पण घरच्यांनी त्याला पसंती दिली नाही. त्या वास्तव्यातला एक प्रसंग


गांधी-ठाकूर भेटीचा प्रसंग


आज आपण त्यांना मोठे साहित्यिक म्हणून ओळखतो. त्या काळीही ते लोकप्रिय होतेच. पण समीक्षक आणि अभिजन वर्ग मात्र काही प्रमाणात त्यांची हेटाळणी करत होता त्याबद्दलचा एक प्रसंग.

परदेशात त्यांना भेटणारे चाहते अनेक होते. त्यातले काहीतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत. महिला जणू एकतर्फी प्रेमात पडत. असं ह्या पुस्तकातून जाणवतं. वृद्ध ठाकूरांच्या परदेश प्रवासात त्यांची पूर्ण बडदास्त ठेवणारी परदेशी चाहती होती. संगीत, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी लोकसुद्धा शांतिनिकेतन मध्ये राहत होते. अशांपैकी एलिझाबेथ बद्दलचा एक प्रसंगमी ठाकूरांचे एक पुस्तक वाचले आहे. त्यांच्याबद्दल जुजबी सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर वाचावं अशी इच्छा होती. मला माहीत असलेले पैलू सुद्धा ह्या पुस्तकात स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे अपरिचित पैलू तर बरेच सुटले असतील असं वाटतं. इतक्या मोठ्या आणि विविधांगी प्रतिभेच्या धनी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला २०० पानांत बांधण्याचं काम कठीण आहे. आणि ह्या पुस्तकाने ते समर्थपणे पेललं आहे असं वाटत नाही. पुस्तकाचे निवेदन मध्येच ललित शैलीत संवादपर होते, मध्येच एखाद्या निबंधाप्रमाणे माहितीपर होते. त्यामुळे मी कथनात रममाण झालो नाही. अनुवाद चांगला झाला आहे.

पुस्तक वाचून समाधान झालं नाही. रवींद्रनाथांवर अजून चांगलं पुस्तक असेल तर नक्की सुचवा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संथा ह्यांवरच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe