पुस्तक – अनंतानुभव (Anantanubhav)
लेखक – डॉ. अनंत कुलकर्णी (Dr. Anant Kulkarni)
शब्दांकन – सुधीर जोगळेकर (Sudheer Joglekar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २५२
प्रकाशन – स्नेहल प्रकाशन. पहिली आवृत्ती सप्टेंबर २०२०
छापील किंमत – ३०० रु.

सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचायला दिल्याबद्दल मी श्री. सुधीर जोगळेकर ह्यांचे आभार मानतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशभर असंख्य सेवा प्रकल्प राबवते. त्यातल्या वनवासी समाजासाठीच्या आणि आरोग्यविषयक संस्थांमध्ये ज्यांनी अनेक वर्षे काम केले त्या डॉ. अनंत कुलकर्णी ह्यांचे हे अनुभव कथन आहे.
पुस्तकात दिलेली त्यांची माहिती

पुस्तकात दिलेली श्री. जोगळेकर ह्यांची माहिती

अनंत कुलकर्णी ह्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या तरुण वयातच स्वतःला ह्या कामात झोकून दिलं. ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी समाजासाठी प्राथमिक आरोग्य सेवा द्यायला सुरुवात केली. डोंगराळ, दुर्गम ठिकाणे, दळणवळणाची साधने कमी, लोकांमध्ये साक्षरतेचा अभाव, गरीबी अशी कितीतरी आव्हाने. संघविरोधी कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा विरोध हेही होतंच. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना कधीकधी मारहाणीचा सामनासुद्धा करावा लागला. अश्या थरारक अनुभवांचं वर्णन अनंतरावांनी पुस्तकात केलं आहे. ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत डगमगून ना जाता उभं राहण्याची ताकद त्यांना संघाच्या वरिष्ठांनी कशी कशी दिली ह्याचंही सविस्तर वर्णन त्यात आहे.

वनवासी क्षेत्रात काम केल्यावर सांसारिक जबाबदारी आणि संघाचं सामाजिक काम दोन्ही करता यावं म्हणून त्यांना नाशिक कार्यक्षेत्र देण्यात आलं. महिंद्र कामपणी मधली नोकरी सांभाळून ते काम करत होते. काही वर्षांनी महिंद्र कंपनी सोडून ते पुन्हा एकदा पूर्णवेळ सामाजिक कार्यात उतरले. “जनकल्याण समिती” आणि इतर संस्थांच्या माध्यमातून रक्तपेढी, रुग्णालये, आरोग्य प्रशिक्षण केंद्रे ह्यांचे जाळे त्यांनी महाराष्ट्रभर उभे करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग इतर राज्यातल्या लोकांना, संस्थांना व्हावा म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. ३३ वर्षे काम पूर्ण करून त्यांनी ठरवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. अलिप्तपणे बाजूला झाले.

अनंत अनुभव घेतलेल्या अनंतरावांचं हे कथन म्हणून … “अनंता”नुभव. अगदी सार्थ शीर्षक.

अनुक्रमणिका

डॉक्टरकी चं शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी त्यांनी आदिवासी भागातल्या आरोग्य केंद्रातच स्वतःहून मागून घेतली. तेव्हाचा विदारक अनुभव.


दुर्गम भाग आणि अपुऱ्या सुविधा असल्यामुळे डॉक्टर, नर्स हवंय त्या प्रमाणात हव्या तेव्हा उपलब्ध नसत. त्यामुळे प्राथमिक उपचारांसाठी तिथल्याच लोकांना प्रशिक्षण देऊन; “आरोग्यपेटी”तून औषधे पुरवून कामाला गती दिली गेली. त्याच धर्तीवरचा “दाई प्रशिक्षण” चा अनुभव.


राजकीय विरोधाचा मुकाबला; प्रेमाने, संयमाने तरीही खंबीरपणे


रक्तपेढीचं काम जोरात सुरु होतंच. त्यातून पुढे आलं एड्स विषयी जनजागृतीचं काम. ते सुद्धा खास संघविचारानुसार भारतीय संस्कृतीततल्या संस्कारांचा आधार घेऊन.



अनंतरावांच्या कामाचं दस्तऐवजीकरण हा संघ परिवारातल्या व्यक्तींसाठी मोठा ठेवा आहेच. पण त्या वर्तुळाबाहेरच्या पण समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या कोणालाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल; ह्यात शंका नाही. संघाबद्दल कुतूहल, आक्षेप आणि शंका असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्या पुस्तकाच्या वाचनातून संघाच्या विचारपद्धतीचं कार्यान्वयन प्रत्यक्ष कसं होतं हे बघणं नक्कीच आवडेल.

शब्दांकन आणि पुस्तकाची मांडणी करताना ती कालानुक्रमे केली आहे. तरी काही वेळा प्रसंगांची पुनरुक्ती झालेली आढळते. आरोग्याच्या कामाच्या विस्ताराची माहिती देताना व्यक्तींची नावे, संस्थांची नावे, त्यांच्या वाढीतले छोटे टप्पे ह्यांचा तपशील जरा जास्त झाला आहे असं वाटतं. पण मूळ कामाचं हे दस्तऐवजीकरण असल्यामुळे ते अनिवार्य देखील आहे. त्यामुळे त्रयस्थ वाचकाने तो तो भाग थोडा झरझर वाचून पुढे जायला हरकत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संथा ह्यांवरच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/