पुस्तक – ब्रँड गुरु (Brand Guru)
लेखिका – जान्हवी राऊळ (Janhavi Raul)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १४२
प्रकाशन – बिग आयडिया पब्लिकेशन , मार्च २०१२
ISBN – दिलेला नाही
छापील किंमत – रु. २२५/-

कुठलाही व्यवसाय सुरु केल्यावर आपलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोचावं, त्याने ते पुन्हापुन्हा खरेदी करावं आणि लोकप्रिय व्हावं असं स्वप्न बघणं, ध्येय ठेवणं स्वाभाविक आहे. हे ध्येय गाठण्यासाठी मालाची गुणवत्ता उत्तम ठेवणं आणि त्याचा वापर केल्यावर लोकांना समाधान मिळणं ह्याचा भाग मोठा आहे. तरीही “बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचे सोनंही विकलं जात नाही” हे आपलं पारंपरिक शहाणपण आहेच ! त्यामुळे विक्री होण्यासाठी “मार्केटिंग”, जाहिरात आवश्यकच. ह्या जाहिरातींतून तुम्ही लोकांना स्वतः बद्दल सांगता, माझं उत्पादन कसं चांगलं, उपयुक्त, फायदेशीर आहे ते सांगता. विक्रीनंतरही वेगवेगळ्या मार्गाने ग्राहकांच्या संपर्कात राहता. त्यातून तयार होतो तुमचा ब्रँड. तुमचं नाव, उत्पादनं, बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) सगळं लोकांच्या मनात ठसतं. हा प्रवास सोपा नाही, कमी कालावधीचा नाही. सहज, आपोआप होईल असाही नाही. अतिशय गांभीर्याने करायची ही कृती आहे. ती कशी केली पाहिजे, कसा विचार केला पाहिजे ह्याची जाण वाढवणारं हे पुस्तक आहे.

पुस्तकातल्या लेखिकेच्या मनोगतातल्या माहितीनुसार त्यांनी रहेजा स्कुल ऑफ आर्टस् मधून कमर्शियल आर्टसची पदवी घेतली. पतीच्या जाहिरातक्षेत्रातील १८ वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांनी उतार चढाव बघितले. त्या आज यशस्वी ब्रँड सल्लागार आणि स्वतःच्या “बिग आयडिया कम्युनिकेशन” या कंपनीच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांचे पतीही नोकरी सोडून “बिग आयडिया”त सहभागी झाले आहेत .

ह्या पुस्तकात ब्रॅंडिंग चे वेगवेगळे पैलू कसे महत्त्वाचे आहेत. हे प्रकरणवार सांगितले आहे. ब्रँड म्हणजे काय, तो तयार करायचा म्हणजे काय, त्यासाठी कसा विचार करायचा इथपासून सुरुवात केली आहे. स्वतःकडे, आपल्याच धंद्याकडे, उत्पादनाकडे वेगवेगळ्या कोनातून बघण्यासाठी प्रश्नावली दिली आहे. त्याची उत्तरं निश्चित झाली की आता हे ब्रॅण्डिंग सांधण्याचे मार्ग – बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य (टॅगलाईन) , माहितीपुस्तक , विक्रीयोग्य वस्तू, प्रेझेंटेशन , कंपनीने छापलेली दिनदर्शिका, टीशर्ट इ. वर एकेक प्रकरण आहे. उदा.  कुठला रंग कुठली भावना दर्शवतो. त्यानुसार आपल्या लोगोमध्ये रंगनिवड कशी करावी लागते. ग्रीटिंग कार्ड, बिझनेस कार्ड कसे कलात्मक करता येईल. माहितीपुस्तिकेचे महत्त्व. प्रदर्शनात मांडण्याच्या तक्त्यांचे विविध प्रकार. प्रत्येक मार्गाची माहिती पोचवण्याची पद्धत वेगळी, सामर्थ्य निराळे त्यामुळे त्यामागची अभिव्यक्तीकला सुद्धा निराळी. ब्रॅण्डिंग करणाऱ्या कंपन्यांना तांत्रिकता, कलात्मकता, लोकभावना ह्याची कशी कसरत करावी लागत असेल हे त्यातून जाणवते.

काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका

ब्रॅण्डिंग प्रश्नावलीची सुरुवात

एका मार्गाबद्दल विचार

वाचकाला प्रोत्साहित करणारे पान

ब्रॅण्डिंगचा प्रत्येक मार्ग स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि तसे व्यवसायिक अभ्यासक्रम सुद्धा आहेत. त्यामुळे एका पुस्तकातून ते सगळं मांडणं आणि समजून येणं शक्यच नाही. पण ह्या क्षेत्रात काम न करणाऱ्या; टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्रे ह्यात जाहिरात बघणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ब्रॅण्डिंग जगताचे दार किलकिले करून आत डोकावण्याची संधी ह्या पुस्तकातून मिळते. नव-व्यावसायिकांनी हे पुस्तक वाचले तर ब्रॅण्डिंगबद्दलची त्यांची जाणीव विकसित होईल. इतरांचं ब्रॅण्डिंग बघताना ते कसं केलं आहे हे थोडं अजून समजून घ्यायचाही आपण प्रयत्न करू.

हे तांत्रिक विषयावरचं पुस्तक आहे. अशावेळी आपल्याला मराठी शब्दांपेक्षा इंग्रजी शब्दांची जास्त सवय असते. ते लक्षात घेऊन लेखिकेने मराठी शब्दांबरोबर कंसात इंग्रजी शब्दही दिले आहेत. काहीवेळा पूर्ण वाक्य, प्रश्न पुन्हा इंग्रजीतही दिले आहेत. हे योग्यच. त्यामुळे मराठी माणसाला मराठी पुस्तक वाचण्यात अडचण येणार नाही !! मात्र ही द्विभाषिकता डोक्यात ठेवून लिखाण केल्यामुळे असेल पण बऱ्याच ठिकाणी मराठी मजकूर हा इंग्रजीचे बोजड भाषांतर झाल्यासारखा आहे. तो अजून ओघवता करता आला असता.

हे पुस्तक हातात घेताना लेखिकेच्या ह्या क्षेत्रातला अनुभव वाचायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी केलेली कामे, त्यांचे ग्राहक, मिळालेला प्रतिसाद, चुका, अनपेक्षित बरावाईट प्रतिसाद असं काही वाचायला मिळेल असे वाटले होते. पीयूष पांडे ह्यांच्या “पांडेपुराण” सारखे काहीतरी. पण तसे अजिबात झाले नाही. त्यामुळे हे पुस्तक जरा पाठ्यपुस्तकासारखे रुक्ष झाले आहे.

पुस्तक वाचताना माझे भाषा शिकवण्याचे उपक्रम, पुस्तक परीक्षणाचा उपक्रम ह्यांचं पण ब्रॅण्डिंग करावं असं वाटू लागलं. ह्या उपक्रमांतून विक्री किंवा कमाई अपेक्षित नसली तरी लक्ष्यप्रेक्षकांपर्यंत (target audience) पोचण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे. बिगरसरकारी संस्था, समाजोपयोगी प्रकल्प ह्यंनासुद्धा ब्रॅण्डिंगची आवश्यकता असतेच.

विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्याबद्दल मराठीत पुस्तक असेल तर त्याचे मला कौतुक वाटते. मराठी ज्ञानभाषा करण्यातले ते योगदान असते. लेखक मराठी, मूळ पुस्तक मराठी असेल तर ते कौतुक दुणावते. इथे स्वतःच्या कामाने मराठी माणसाचा ठसा ह्या क्षेत्रात उमटवणारी व्यक्ती मराठी पुस्तक लिहिते आहे. त्यामुळे कौतुक तीणावले ! जान्हवीताईंनी स्वानुभवरचे पुस्तक लिहिले आहे का मला माहिती नाही. पण तसे नसेल तर नक्की लिहावे.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
व्यवसाय करणाऱ्यांनी आवा ( आवर्जून वाचा )
इतरांनी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्यावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

 

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet