पुस्तक : मसालाकिंग (Masalaking)
लेखक : धनंजय दातार (Dhananjay Datar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८१
ISBN : दिलेला नाही
मराठी माणूस सहसास धंद्यात पडत(!) नाही. पण पडलाच तर निग्रहाने पडतो. सर्वोत्तम व्यवसाय करण्याची त्याची इच्छा असते. त्यासाठी मेहनत घ्यायची इतकी तयारी असते की पुढे त्याचे यश सर्वांना अचंबित करते. अशा यशस्वी उद्योगपती पैकी धनंजय दातार आहेत. दुबई आणि आखाती देशांमध्ये त्यांचा मसाल्याचा व्यापार व्यापार आहे. या व्यापाराचा दबदबा इतका आहे की प्रत्यक्ष दुबईच्या राजघराण्यातल्या व्यक्तीने त्यांना “मसालाकिंग” म्हणत गौरवले होते. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली थोडी माहिती.
या पुस्तकात धनंजय दातार यांनी स्वतः त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास प्रवास आठवणींच्या साखळीतून उलगडला आहे त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे टप्पे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणाऱ्या घटना रंजक पद्धतीने सांगितले आहेत.
अनुक्रमणिका :
आज किंग झालेले झालेले दातार लहानपणी मात्र निम्न मध्यम वर्गीय वर्गीय गरीब घरातच वाढले. लहानपणच्या परिस्थितीची एक आठवण
परदेशी जाऊन आलेली माणसं खूप श्रीमंत होतात; त्यामुळे गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर आपणही परदेशात जायला पाहिजे हा विचार किंवा वेड तरुण वयातच त्यांना परदेशाकडे खेचत होतं. त्यामुळे शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीपासूनच परदेशात जायचं वेड त्यांच्या मनात संचारलं होतं. त्यांच्या वडिलांनी दुबईमध्ये जाऊन छोटासं दुकान काढलं होतं आणि ते ठीक-ठाक चालत होतं. त्यामुळे त्यांनाही दुबईला जाण्याचा मार्ग खुला झाला. वडिलांची फारशी संमती नसताना ते दुबईला वडिलांच्या दुकानात कामाला गेले आणि मग खरा परदेश, परदेशातले कष्ट त्यांना दिसले. त्यांच्या वडिलांनी त्यांना मालकाचा मुलगा म्हणून डोक्यावर न चढवता सर्व लहान-मोठी कामे कष्टाची कामे करायला लावली आणि उमेदवारी सुरु झाली. त्यावेळच्या वसुलीच्या कामाचा एक प्रसंग
ह्या सुरुवातीपासून त्यांचा आजपर्यंतचा खडतर प्रवास, आलेल्या अडचणी, काढलेले मार्ग, शिकलेले धडे, अपघात आणि शारीरिक व्याधींशी संघर्ष इत्यादी त्यांनी पुढे पुस्तकात मांडले आहे. या सगळ्याचा उद्देश उद्देश स्वतःची शेखी मिरवणे नसून हे एक प्रांजळ आत्मकथन आहे. त्यांच्याप्रमाणे ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना हे अनुभव मार्गदर्शक ठरावेत ही प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून स्वतःच्या अनुभवावर आधारित निष्कर्ष सुद्धा त्यांनी होतकरू व्यावसायिकांसाठी सांगितले आहेत हे काही सल्ले वाचा
पुस्तकात त्यांनी त्यांच्या आई-वडील, पत्नी आणि मुलांबद्दल एक एक लेख लिहिला आहे. त्यांच्या यशात या प्रत्येकाचा वाटा आहे. आई-वडिलांच्या संस्काराचा, पत्नीने दिलेल्या साथीचा, मुलांनी वडिलांना आपल्याला जास्त वेळ देता येत नाहीये हे समजून घेतल्याचा… दातारांबद्दल त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी लिहिलेले छोटे लेख पुस्तकात आहेत. धनंजयरावांची कुटुंबवत्सलता आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंबाचे पाठबळ/सपोर्ट सिस्टीम अधोरेखित होते.
गरिबीतून श्रीमंत झाल्यावर, हातात पुरेपूर पैसा खेळू लागल्यावर काहीजण त्या पैशाने आंधळे होतात तर काहीजण गरिबीच्या भीतीने कवडीचुंबक होऊ लागतात. ही दोन्ही टोके टाळत स्वतःच्या पैशाचा समाजासाठी उपयोग दातार करतात आणि संपत्तीचा तितक्याच आनंदाने उपभोग घेतात. पत्नीला दिलेली महागड्या गाडीची भेट, मुलांची विमानात लावलेली मुंज, लोकप्रिय कलावंतांच्या हस्ते दुकानांच्या शाखांचे उद्घाटन असे आनंदाचे क्षणही पुस्तकात पुस्तकात आहेत. यश आणि श्रीमंती कशी पेलावी हेसुद्धा त्यातून ते सांगतात.
या पुस्तकाची लेखनशैली चांगली आहे. अजिबात पाल्हाळ न लावता ठळक घटना पटापट सांगितल्या आहेत. लेखक अतिशय प्रांजळपणे आपले गुणदोष सांगतात. वाचकांच्या भावनांना हात घालण्यासाठी गरीबी आणि कठीण प्रसंगांचं वर्णन उगाळत बसले नाहीयेत तर यशाच्या प्रसंगांत आत्मप्रौढी नाहीये.
दातार यांना मिळालेले पुरस्कार
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातून नवे उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी दातार स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी जातात. असे मार्गदर्शन नक्कीच फायदेशीर ठरेल. परदेशात भारताचे महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या धनंजय दातार यांच्या कर्तुत्वाला अभिवादन करण्यासाठी पुस्तक अवश्य वाचा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
स्वानुभव कथनावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran) – अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो (Abhijit V. Banerjee & Ester Duflo) – अनुवाद – अतुल कहाते (Atul Kahate)
- घर सैनिकाचे (Ghar Sainikache)- डॉ. नीलिमा निशाणदार (Dr. Neelima Nishandar)
- चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala) – उपेंद्र पुरूषोत्तम साठे (Upendra Purushottam Sathe)
- नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra) – उदयन् आचार्य (Udayan Acharya)
- निपुणशोध (Nipunshodh) – सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)-गिरीश टिळक (Girish Tilak)
- पांडेपुराण (Pandepuran) – पीयूष पांडे (Peeyush Pandey) – अनुवाद – प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas) – विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil )
- माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi) माधव जोशी (Madhav Joshi)
- राशा (Rasha)-शरद वर्दे (Sharad Varde)
- लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna) – सागर रायकर (Sagar Raykar)
- वाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht) – निरंजन घाटे (Niranjan Ghate)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan) – श्री. एम्. (Shri. M.) – अनुवादक – श्री. वि. पटवर्धन. (S.V. Patwardhan)
- I am no messiah (आय अॅम नो मसीहा) – Sonu Sood with Meena K. Iyer (सोनू सूद व मीना के. अय्यर)
- Lost and Founder (लॉस्ट अॅंड फाउंडर) – Rand Fishkin (रॅंड फिश्किन)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe