पुस्तक – नृत्यावकाश दिवाळी अंक २०२६ (Nrutyavakash Diwali Ank 2026)
भाषा – मराठी (Marathi)
संपादक – आश्लेषा महाजन आणि सायली कुलकर्णी (Ashlesha Mahajn & Sayali Kulkarni)
पाने – १३६
प्रकाशन – पदन्यास प्रकाशन, ऑक्टोबर २०२६
छापील किंमत – रु. २५०/-
दसरा झाला. दिवाळी काही दिवसांवर आली. आणि मराठी वाचकांच्या मनात नव्या दिवाळी अंकांबद्दल उत्सुकता निर्माण होऊ लागली. ह्या वर्षी माझ्या वाचनात आलेला पहिला दिवाळी अंक “नृत्यावकाश”. नृत्य या विषयाला समर्पित दिवाळी अंक आहे. अंकाचं हे तिसरं वर्ष आहे. नृत्याचे वेगवेगळे प्रकार, प्रसिद्ध नर्तिकांचे अनुभव व त्यांचा जीवनपट ह्या अंकात आहे. पण नाचाचा कार्यक्रम सादर होताना प्रत्यक्ष नाचणाऱ्या कलाकाराव्यतिरिक्त अजून अनेकांचे त्यात योगदान असते. त्या विविध बाजूंचा मागोवा घेणारे लेखही ह्यात आहेत.
हे सर्व लेख सात भागांमध्ये गुंफले आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली की विषयांचं वैविध्य आणि लेखकांची नावं लक्षात येतील.


सोनिया परचुरे, फुलवा खामकर आणि काही आघाडीच्या कलाकारांची मनोगतं ह्यात आहेत तर. चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या हेलन व संध्या ह्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे.
भगवान शंकराच्या नृत्यमूर्तींचे वर्णन त्याक्षेत्रातले तज्ज्ञ देगलूरकर सरांकडून वाचायला मिळते.
प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, छायाचित्रण, वाद्यसाथ, गायनसाथ इ. ह्या क्षेत्रातही उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती, मनोगते “नाट्यरंग” भागात आहेत. पाश्चात्त्य नृत्यप्रकाराची ओळख करून देणारा श्रीनिवास शारंगपाणी ह्यांचा लेख आहे.
नृत्याचे कार्यक्रम आयोजित करणे, त्यामागचे सर्व व्यवस्थापन संभाळणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे हे कोणीतरी करत असतं त्यामुळेच सादरीकरण शक्य होतं. अशा “आर्ट मॅनेजमेंट”च्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या श्रुती रानडे ह्यांचे मनोगतसुद्धा ह्यात आहे. कलेला समर्पण आणि आर्थिक नियोजन ह्या परस्परविरोधी बाबी नसून एकमेकांना कशा पूरक आहेत हे उभरत्या नर्तक-नर्तिकांनी नक्की वाचलं पाहिजे.
कन्नड नृत्यप्रकार “यक्षगान” इतर भारतीय नृत्यप्रकारांपेक्षा कसा वेगळा आहे ह्याची मांडणी श्री. फातर्पेकर ह्यांनी केली आहे.
देशविदेशात भारतीय कला आणि नृत्यप्रकारांना घेऊन गेलेल्या विदुषी उषा राव ह्यांच्या कार्याची दाखल सागरिका पटवर्धन ह्यांनी घेतली आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीत नृत्य हा विषय आणि इतर विषय शिकवताना नृत्याचा वापर करण्याबद्दलच्या शक्यता दीप्ती सिधये ह्यांनी आपल्यापुढे ठेवल्या आहेत. “तृतीयपंथीय कलाकारांचा आत्मशोध” आणि “लोकनृत्यविन्यास” ह्यातून रंगमंदिरांच्या बाहेरील जगाचा वेध घेतला आहे.
मजकुराची कल्पना यावी म्हणून काही लेखांचा गोषवारा सांगितला. असे अजून बरेच लेख आहेत. अंकाचं मुखपृष्ठ तजेलदार, डौलदार असं आकर्षक आहे. कृबु (कृत्रिम बुद्धिमत्ता AI) वापरून तयार केलेलं.
काही पाने उदाहरणादाखल
दीनानाथ दलालांच्या चित्रातील नर्तन

लहेजा – नृत्य, नाट्य ह्यासाठीच्या वेषभूषांसाठीचा उद्योग

असा सर्वांगसुंदर, वाचनीय, माहितीपूर्ण दिवाळी अंक आहे. मी स्वतः नाचत नसलो तरी हा दिवाळी अंक वाचून नृत्य आणि त्याच्या आजूबाजूचे घटक ह्यांबद्दलची जाण थोडी वाढली हे निश्चित. सर्व कला आणि विज्ञान ह्यात उत्तमाचा ध्यास घेताना बहुशाखीय ज्ञान कसं आवश्यक आहे हे ठळकपणे कळलं. बहुतेक लेखांमध्ये “नाट्यशास्त्र” आणि त्यातल्या संस्कृत संज्ञा, उक्ती निवेदनाच्या ओघात आल्या आहेत. म्हणजे ते ज्ञान नुसतं पुस्तकात राहून, परीक्षेत उत्तरं देण्यापुरतं राहिलं नाहीये; नृत्यकलाकारांनी ती परंपरा नुसती टिकवून ठेवली नाहीये तर ते ज्ञान आजच्या काळातही लागू पडतंय हे वाचून अभिमान वाटला. त्यामुळे तुम्ही स्वतः नर्तक नसाल तरीही दिवाळी अंक वाचायला आवडेलच.
जर तुम्ही नाचत असाल, नाचाचा आस्वाद घेत असाल तर तुम्हाला हा अंक नक्की आवडेल हे सांगायला नकोच. तुमच्या मित्रमंडळी-नातेवाईकांमधल्या कलाकारांना दिवाळी भेट देण्यासाठीही हा अंक उत्तमच आहे. मी स्वतः तशी भेट देणार आहे. त्यासाठी अंक विकत घेताना दोन्ही संपादकांशी प्रत्यक्ष भेट आणि गप्पांचीही संधी मिळाली. त्यामुळे माझं “अवकाश” अजूनच विस्तारलं.
अंक विकत घेण्यासाठी संपर्क क्रमांक – पदन्यास प्रकाशन 9881498795 / 9860387123
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
कला, कलाकार, कलाविश्व ह्याविषयीच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- अ-मृत पंथाचा यात्री (A-mrut panthacha yatri) – दिनकर जोशी (Dinakar Joshi) अनुवादक – डॉ. सुषमा करोगल (Dr. Shushma Karogal)
- गेशा ऑफ गिओन(Geisha of Gion) – मिनेको इवासाकी(Mineko Iwasaki) (अनुवाद : अनुराधा पुनर्वसु)
- चंद्रमुखी (Chandramukhi) – विश्वास पाटील (Vishwas Patil)
- त्सुबाकी स्टेशनर्स (Tsubaki Stationers) – इतो ओगावा (Ito Ogawa) अनुवाद – मयुरेश कुलकर्णी (Mayuresh Kulkarni)
- पु.ल. (चांदणे स्मरणाचे) (Pu.La. Chandane Smaranache) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- पांडेपुराण (Pandepuran) – पीयूष पांडे (Peeyush Pandey) – अनुवाद – प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
- रेषाटन (reshatan) – शि.द.फडणीस (S.D. Phadnis)
- संवादु-अनुवादु (Sanvadu-Anuvadu) – उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
- स्ट्रगलर्स (Strugglers) लेखिका : मुक्ता चैतन्य (Mukta Chaitanya)
- Chart Throb (चार्ट थ्रोब) – Ben Elton (बेन एल्टॉन)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३७५वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link




