पुस्तक – Chandrayaan-3 (चंद्रयान – ३)
लेखक – अजेय लेले (Ajey Lele)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – १३६
प्रकाशन – रूपा पब्लिकेशन, २०२३
ISBN – 978-93-5702-686-4
छापील किंमत – रु. २५०/-
२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचे “चंद्रयान” चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले आणि एक इतिहास घडला. सर्व भारतीयांच्या माना अभिमानाने आणि आनंदाने उंचावल्या. क्रिकेट विश्वचषकातला अटीतटीचा अंतिम सामना ज्या उत्सुकतेने भारतीय पाहतात तीच उत्सुकता, हुरहूर एक वैज्ञानिक घटना बघण्यासाठी भारतीयांनी दाखवली. चंद्रावर उतरण्याचा ह्याआधीचा प्रयत्न – चंद्रयान-२ – अगदी शेवटच्या क्षणी असफल झाला होता. के सिवन आणि पंतप्रधान मोदी ह्यांची साश्रू नयनांनी झालेली भेट आपल्या मनावर कोरली गेली. त्या अपयशातून स्वतःला सावरून, धडा घेऊन इसरोने ही मोहीम यशस्वी केली ह्यामुळे आनंद द्विगुणित झाला. आपण सर्वांनीच शास्त्रज्ञांचे आणि भारत सरकारचे अभिनंदन केले, कौतुक केले.
पण सर्वसामान्य माणसांनी ही घटना फक्त एक “सोहळा” म्हणून मर्यादित ना ठेवता, ह्या घटनेबद्दल, प्रकल्पाबद्दल आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. ह्यातली तांत्रिक आणि वैज्ञानिक माहिती समजून घेतली पाहिजे. आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार एक पाऊल तरी पुढे टाकलं पाहिजे. माझं हे मत जर तुम्हाला मान्य असेल तर अजेय लेले लिखित Chandrayaan-3 पुस्तक तुम्हाला मदतरूप होईल.
आधी लेखकाची ओळख करून घेऊया. पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती
इंटरनेट वर दिलेली त्यांची माहिती ( https://www.idsa.in/profile/alele )
Group Captain Ajey Lele (Retd.) was a Senior Fellow at the Manohar Parrikar Institute for Defence Studies and Analyses and headed its Centre on Strategic Technologies. He started his professional career as an officer in the Indian Air Force in 1987 and took early retirement from the service to pursue his academic interests. He has a Masters degree in Physics from Pune University, and Masters and MPhil degrees in Defence and Strategic Studies from Madras University. He has done his doctorate from the School of International Studies, Jawaharlal Nehru University (JNU), New Delhi. His specific areas of research include issues related to Weapons of Mass Destruction (WMD), Space Security and Strategic Technologies. He has contributed articles to various national and international journals, websites and newspapers. He has authored ten books and has also been an editor for seven books. He is a recipient of K. Subrahmanyam Award (2013) which is conferred for outstanding contribution in the area of strategic and security studies.
Gp Capt Ajey Lele is on the Editorial Committee of the Journal of Defence Studies.
चंद्रयान मोहिमेची सर्व अंगांनी ओळख व्हावी हा लेखकाचा उद्देश दिसतो.
अनुक्रमणिकेवर एक नजर टाका
India scripts history – भारताच्या अवकाश संशोधनाच्या प्रवासाचा थोडक्यात मागोवा. भारताने चंद्र मोहिमेचा विचार करायला २००३ सुरुवात केली. त्यामागे काय विचार होता
The dynamics of the moon – मोहिमेसाठी “चंद्र”च का ? ह्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे दिलं आहे. चंद्र आणि पृथ्वीचा संबंध, चंद्रावर असू शकणारी खनिजे, लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी एक थांबा असे नाना पैलू ह्यात आहेत.
India’s first two missions to the moon – चंद्रयान-१ आणि २ मोहिमा काय होत्या. त्यांची उद्दिष्टे. यानाची रचना. यशापयश. यान म्हणजे फक्त वाहन नाही तर त्यात वेगवेगळी यंत्रे असतात ; रडार, क्ष-किरण प्रक्षेपक, कॅमेरे वगैरे. आणि हे फक्त भारताचंच नाही तर इतर देशही अशा मोहिमांत सहभागी होऊन आपापली यंत्र यानातून पाठवतात.
Chandrayaan-3:ISRO’s moon supremacy – चंद्रयान-३ यानाची रचना, त्यातली यंत्रे ह्यांची माहिती. हे यान पृथ्वीवरून थेट चंद्रापर्यंत पोचलं नाही तर आहि पृथ्वीभोवती फिरत फिरत एक विशिष्ट उंचीवरून चंद्राकडे गेलं आणि तिथे चंद्राभोवती फिरत फिरत खाली उतरलं. हा प्रवास सोप्या शब्दांत समजावला आहे. यान उतरल्यावर पुढे काय झालं हे सांगितलं आहे.
Learning from Chandrayaan-2’s failure – चंद्रयान-२ का अपयशी ठरलं ह्याची इसरो ने शोधलेली कारणं आणि त्यानुसार चंद्रयान-३ मध्ये काय बदल केले गेले. अनंत अवकाशात संपूर्णपणे अनोळखी ठिकाणी काय काय घडू शकेल ह्याचा फक्त कल्पनेनेच विचार करून शास्त्रज्ञांना सगळी तयारी करावी लागते. तशी दणकट यंत्र बनवावी लागतात. त्याचं सॉफ्टवेअर लिहावं लागतं. मी स्वतः एक “सॉफ्टवेअर इंजिनियर” असल्याने “unclear requirement” साठी कोडिंग करताना किती त्रास झाला असेल ह्याची मी कल्पना करू शकतो.
Industry and people – हा प्रकल्प इसरो चा असला तरी सगळी यंत्र काही इसरो तयार करत नाही. ते काम “आउटसोर्स” असतं. भारतातल्या वेगवेगळ्या सरकारी आणि खाजगी कंपन्या ह्यासाठी लागणारे यंत्रांचे भाग बनवतात. आणि सर्वात शेवटी सगळं एकत्र होऊन प्रक्षेपक, त्याची यंत्रणा, यान बनतं. हे काम करणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्या आणि त्यांचं काम ह्याबद्दल प्रत्येकी दोनचार ओळीचा आढावा आहे. उच्च दर्जा सांभाळणं, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणं, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणं हे सगळं प्रत्येक कंपनी करते. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या विचारांना मूर्त स्वरूप देणारे हे भागीदार आहेत. हा विचार वाचकांच्या मनावर ह्यातून बिंबवला जातो.
Global moon agenda – अमेरिका, रशिया, चीन, जपान, उ. कोरिया, द.कोरिया, इस्रायल ह्या प्रगत देशांनी कुठल्या चंद्रसफरी केल्या आहेत; पुढे त्यांच्या काय योजना जाहीर झाल्या आहेत ह्याची थोडक्यात माहिती आहे. ह्यातून भारत जगात कुठे आहे ह्याचं भान येतं. चंद्रयान-३ हा मोठा टप्पा आहे आणि पल्ला खूप लांबचा आहे ह्याची जाणीव होते.
Moon rovers: An overview – प्रत्यक्ष अंतराळवीर चंद्रावर उतरणे आणि “रोव्हर” अर्थात यांत्रिक बग्गी चंद्रावर फिरणे हे दोन पर्याय मानवापुढे उपलब्ध आहेत. दोन्हीचे स्वतःचे फायदेतोटे आहेत. आत्तापर्यंत झालेल्या देशोदेशीच्या महत्वपूर्ण मोहिमांमध्ये बग्गीचा वापर कसा केला गेला ह्याची माहिती आहे.
India’s moon tryst – पुढे काय ? भारताचा चंद्राबद्दलची पुढची योजना अजून निश्चित समोर आलेली नाही. चंद्रावर स्वारी करायच्या राजकीय स्पर्धेत उतरायचं; का सहकारी-संशोधन करायचं का आणि काही हा प्रश्न विचारत पुस्तकाचा समारोप केला आहे.
पुढे संदर्भांची यादी आणि index आहे. पुस्तकात यानाचे आणि चंद्राचे रंगीत फोटो सुद्धा आहेत.
एक दोन पाने उदाहरणादाखल वाचून बघा.
चंद्र का ?
यानात काय काय असतं.. त्यातला एक भाग ?
सहभागी कंपन्यांबाबद्दलच्या यादीतला एक भाग
असं हे “short and sweet” पुस्तक आहे. विषय “रॉकेट सायन्स”चा आहे. तो कठीण आणि अतितांत्रिक असला तरी तो सोप्या भाषेत मांडला आहे. सर्वसामान्यांना झेपेल इतपतच तांत्रिक तपशील दिलेला आहे. त्यामुळे पुस्तकाचं वाचन माहितीपूर्ण होतं तरी विद्वत्जड होत नाही. रंजक होतं. प्रत्येक भारतीयाने आणि विशेषतः विद्यार्थी व तरुणांनी हे सकस वाचन अवश्य करावं.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
विज्ञान, तंत्रज्ञान, सामान्यज्ञान ह्याविषयीच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- आकाशदर्शन २०१९ (Akashadarshan 2019) – दा. कृ. सोमण (D.K. Soman / Da. Kru. Soman)
- ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre) – आलोक शुक्ल (Alok Shukla) – अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)
- ’च’ची भाषा (‘Cha’chi bhasha) – अतुल कहाते (Atul Kahate)
- टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn) – सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
- द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)-डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick) – अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)
- ब्राह्मोस (Brahmos) – ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai) अनुवादक – अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
- भारताची अणुगाथा (Bharatachi Anugatha) – आल्हाद आपटे (Alhad Apte)
- माझंही एक स्वप्न होतं(majhahi ek swapna hota) – वर्गीस कुरियन(Verghese Kurien) (अनुवाद – सुजाता देशमुख)
- शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman) – रिचर्ड फाईनमन (Richard Feynman) – अनुवाद – माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
- साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya) लेखक – गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
- AADHAR-A Biometric history of India’s 12-Digit Revolution आधार-अ बायोमेट्रिक हिस्टरी ऑफ इंडिया’ज १२-डिजिट रिव्हॉल्युशन – Shankar Aiyar ( शंकर अय्यर )
- Elon Musk:How The Billionaire CEO Of SpaceX and Tesla is shaping our future (एलॉन मस्क :हाऊ द बिलियनर सीईओ ऑफ स्पेसएक्स अॅंड टेस्ला शेपिंग अवर फ्यूचर) – Ashlee Vance (अॅश्ली वान्स)
- Going Viral (गोइंग व्हायरल) – Balram Bhargava (बलराम भार्गव)
- The Idiot brain (द इडियट ब्रेन) – Dean Burnet (डीन बर्नेट)
- The TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अॅंड बियॉंड) – S. Ramadorai एस. रामदुरै
- Theory Of Everything (थिअरी ऑफ एव्हरीथिंग)- Stephen Hawking (स्टीफन हॉकिंग)
- The Watson Dynasty(वॉटसन डायनॅस्टी)-Richard S. Tedlow(रिचर्ड एस.टेड्लोव)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe