पुस्तक – गोष्ट माझी, तुमची कदाचित सर्वांचीही (Gosht majhi, tumachi kadachit sarvanchihi)
लेखक – सुरेश देशपांडे (Suresh Deshpande)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – रु. १६० /-
प्रकाशन – पार्थ प्रकाशन नोव्हेंबर २०२४

ISBN – दिलेला नाही

लेखक सुरेश देशपांडे यांनी हे पुस्तक मला भेट दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.

पुस्तकाच्या नावाप्रमाणेच ही एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट आहे. कथेचा नायक हाच निवेदक आहे. बँकेत नोकरी लागण्याच्या वयापासून निवृत्त होईपर्यंतच्या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना तो सांगतो आहे. तरुणपणी एका मुलीशी निखळ मैत्री, त्याचं पहिलं प्रेम, त्याच्या जिवलग मित्राशी मनमोकळा संवाद, एका सामाजिक संस्थेबरोबर काम, मैत्रिणीच्या कौटुंबिक समस्या, मित्राच्या कौटुंबिक समस्या असे बरेच प्रसंग त्यात येतात.

पुस्तक विनोदी नाही किंवा रडकंही नाही. थोडं सामाजिक आहे. पण लेखकाला काही ठळक सामाजिक समस्या, मुद्दे महत्वाचे वाटतात इतकंच त्यातून कळतं. निवेदनाच्या ओघात पुस्तक अचानक माहितीपर होतं. निवेदक किंवा एखादं पात्र आपल्याला चक्क एखाद्या लेखाप्रमाणे माहिती सांगतं. उदा. नायकाची पत्नी एका मूकबधिर शाळेत शिकवायला जायचा निर्णय घेते तेव्हा मूकबधिर म्हणजे काय, मतिमंद म्हणजे काय, अशी मुलं का जन्माला येतात, त्यांना काय वेगळा गरज असतात हे नायकाची पत्नी नायकाला समजावून सांगते. दुसऱ्या एका प्रसंग आहे ज्यात एका भूखंडावर अतिक्रमण होतं. त्यातही एक पात्र समजावून सांगतं की राजकारणी आणि गुंड ह्यांचे हे साटेलोटे आहे. तर एकदा नायक मी हे पुस्तक वाचलं असं म्हणत “युद्ध विरहित जग” पुस्तकाचा परिचय देतो.

टिव्ही वरच्या मालिकांमध्ये कसं सतत काही ना काही घडत असतं. प्रसंगांचा एक “ट्रॅक” संपतो, मग दुसरा सुरू होतो. तसंच पुस्तक वाचताना वाटलं की ही न संपणारी मालिका तर नाहीना. पण मालिकांमध्ये एखादा लहान प्रसंग सुद्धा बरेच भाग चालतो. कारण प्रत्येक पात्राच्या भावभावना, चेहऱ्यावरचे हावभाव, संवाद असं दाखवत दाखवत प्रसंग फुलवतात. नको इतका ताणतात किंवा भडक करतात. ह्याउलट हे पुस्तक आहे. किती तरी गंभीर, कौटुंबिक आणि वैचारिक वादळे निर्माण करणारे प्रसंग करणारे यात घडतात उदा. नवराबायको मूल न होऊ देता दत्तक घेण्याचा विचार करतात, एक घटस्फोटीता एका मतिमंद मुलीला दत्तक घेते, दोन पात्रांचा आंतरधर्मीय विवाह होतो इ . पण सगळं अगदी चुटकीसरशी घडतं. ही पात्रं दुसऱ्या पात्रांना आपला विचार सांगतात. मग इतर पात्रं थोडासा विचार करतात आणि लगेच सगळे होकार देतात सगळं छान छान होतं. त्यामुळे प्रसंग खुलत नाहीत मनावर ठसत नाहीत.

पुस्तकातली दोन प्रसंगांची पाने उदाहरणादाखल देतो

नायक ज्या सामाजिक संस्थेची निगडित असतो त्या संस्थेच्या जागेवर गावगुंड अतिक्रमण करत असतात आणि त्याला विरोध करणाऱ्या संस्था चालकांना अपघात होतो तो प्रसंग

नायक आणि त्याची पत्नी मूल जन्माला न घालता दत्तक घेण्याचा विचार घरच्यांना सांगतात तेव्हा

साधारण पुस्तकाचे स्वरूप लक्षात आलं असेल. वाचताना कंटाळा येत नाही पण पुढे वाचत राहायची उत्सुकताही वाटत नाही. इतके नाट्यमय प्रसंग असूनही ते अजून खुलवले असते अजून चांगल्या पद्धतीने गुंफले असते तर कादंबरीची रंजकता वाढली असती असं मला वाटलं.

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

 

तामिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत

माझ्या वेबसाईटवर तुम्हाला लोकप्रिय आणि सुश्राव्य तमिळ गाण्यांचे बोल मराठीत (देवनागरी लिपीत) वाचता येतील. त्यांचा अर्थ सुद्धा मराठीतून समजून घेता येतील. त्यासाठी पुढील लिंकला अवश्य भेट द्या .

तमिळ गाणी आणि त्यांचे अर्थ मराठीत