पुस्तक – काकांचे स्वप्न (Kakanche Swapn)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – द्यादुश्किन सोन (Dyadushkin son)
मूळ लेखक – फ्योदर दस्तयेवस्की (Fyodor Dostoevsky )
मूळ पुस्तकाची भाषा – रशियन (Russian)
अनुवाद – अविनाश बिनीवाले (Avinash Biniwale)
पाने – २०३
प्रकाशन – काँटिनेंटल प्रकाशन १९८७. दुसरी आवृत्ती २०१३
छापील किंमत – रु. १७५/-
ISBN – दिलेला नाही
फ्योदर दस्तयेवस्की – ज्याचा बहुतेक वेळा उल्लेख डोटोव्हस्की असाही केला जातो – हा गाजलेला रशियन लेखक, कादंबरीकार. त्याची कादंबरी थेट रशियन भाषेतून मराठीत आणण्याचं मोठं काम श्री. अविनाश बिनीवाले ह्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रत थेट त्यांच्याकडून मला भेट म्हणून मिळाली ही अजून आनंदाची गोष्ट.

कादंबरीचे कथानक १९व्या शतकातल्या रशियातल्या समाजात घडणारे आहे. मुख्य शहरांपासून दूर एका छोट्या गावात घटना घडतात. मोठमोठ्या जमिनी असणारे जमीनदार, त्यांच्या शेतात राबण्यासाठी शेकडो गुलाम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न पिढीजात वाढत जाऊन जणू अतिश्रीमंत स्थानिक राजेच झालेले लोक तेव्हा होते. असेच एक व्यक्तिमत्त्व इथे नायक आहेत; ते म्हणजे “प्रिन्स”. आता उतारवयाला लागलेले, केस-डोळे-पाय-कान ह्या सगळ्यातला जोम गेलेला. पण खोट्या केसांपासून खोट्या लाकडी पायांपर्यंत सगळं वापरून अजून आपण उत्साही तरुण आहोत असं दाखवणारी ही वल्ली आहे. ऐकू कमी येतंय म्हणून मोघम काहीतरी बोलून हो हो करायचं, खोटं हसायचं. तरुणपणी केलेल्या आणि ना केलेल्या पराक्रमांच्या गोष्टी लोकांना ऐकवत राहायचं अशी विनोदी वल्ली.
ह्या म्हातारबुवांची काळजी करतोय हे दाखवण्याची चढाओढ त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि त्यांच्याशी संबंध येणाऱ्या इतर लोकांमध्ये सुद्धा आहे. सगळ्यांचा डोळा प्रिन्सच्या संपत्तीवर आहे. तर काही नातेवाईक त्याला आता असहाय्य, डोक्यावर परिणाम झालेला म्हातारा असं दाखवून संपत्तीचा सांभाळ ते करू शकत नाहीत असं दाखवून संपत्ती हडप करायचा प्रयत्न सुद्धा करतायत.
तर असे हे प्रिन्स प्रवास करता करता एका गावात येतात. बऱ्याच वर्षानंतर त्या गावात त्यांचं येणं होतं त्यामुळे त्या गावातले, त्यातल्या त्यात प्रतिष्ठित, मोठी घर असणारे लोक प्रिन्सचे स्वागत आपल्याला करायला मिळो; त्यांच्याशी सलगी वाढायला मिळो आणि त्यातून काहीतरी फायदा आपल्याला मिळो अशा लोभाने हुरळून जातात. प्रिन्स बरोबर त्यांच्या लांबच्या नात्यातला एक पुतण्या -मझग्ल्यागोफ – सुद्धा असतो जो याच गावात राहत असतो. या गावातल्या जहांबाज बाई मार्या ची मुलगी झिना वर तो प्रेम करत असतो. एकतर्फी प्रेमच. हा पुतण्या आपल्या काकाला मार्याच्या घरी घेऊन येतो. मार्या ही संधी साधून प्रिन्सचं आपल्या मुलीवर लक्ष जावं, त्यांनी तिच्याशी लग्न करावं असा बेत रचते. पण म्हाताऱ्या माणसाशी लग्न करायला झिना कशी तयार होणार? त्यामुळे मार्या तिला वेगवेगळ्या मार्गाने पटवायचा प्रयत्न करते. “त्याच्याशी लग्न कर आणि राणी सारखी रहा. थोडेच दिवसात तो मरून गेला की तू पुन्हा तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न कर” असं आमीष दाखवते आणि बरीच वेगळी वेगळी कारण तिला देते. झिनाच्या मनात अजून पहिला प्रियकर असतो; ज्याच्याबरोबर लग्न करणं घरच्यांच्या विरोधामुळे शक्य झालेलं नसतं. मर्याचा डाव मझग्ल्यागोफला कळल्यावर तोही अस्वस्थ होतो; तर मार्या त्याला उलटसुलट सांगून त्यालाही घोळात घेते. पण झिना आपल्या हातून जाणार की काय असं त्याला वाटत राहतं. नोकर मंडळींकडून जेव्हा गावातल्या इतर बायकांना ही गोष्ट कळते तेव्हा काही अस्वस्थ होतात कारण प्रिन्स आपल्या हातून जाणार की काय असं त्यांना वाटतं. त्याची ही गोष्ट.
मार्या, झिना, पुतण्या इतर बायका ह्यांचा एकेमकांशी बोलत बोलत कसा शह-काटशह देतात ; त्यांच्या वागण्याचा-बोलण्याचा फार्स हा या कादंबरीचा मुख्य भाग आहे एकूण कथानक खूप विनोदी नाही पण हलकफुलक आहे. काही वेळा प्रसंग गमतीशीर आहेत तर काही वेळा ते जरा ओढून काढून आणल्यासारखे वाटतात. एकूण संवादाची भाषा खूपच नाटकी आहे पूर्वीच्या मराठी नाटकांमध्ये जसे नाटकी संवाद होते तशीच परिस्थिती पूर्वी रशियन कथानगांमध्येही रशियन कथनशैलीमध्येही असावं असं दिसतंय. पात्रांचं गुपित गोष्टी पण मोठयाने बोलणं आणि दुसऱ्याच्या कानावर पडणं, एखाद्या पात्राने घरातच लपून राहून प्रसंग ऐकणं असले प्रसंग आहेत. चक्रम-विसराळू-गोंधळलेला म्हातारा आहेच जोडीला. प्रिन्स, मझग्ल्यागोफ, मार्या, झिना, मार्याचा नवरा, झिनाचा पहिला प्रियकर ही पात्र चांगली रंगवली आहेत. मार्याचे संवाद छान आहेत. त्यामुळे आपण सहज पुढे पुढे वाचत राहतो. कादंबरीच्या शेवटी सगळ्यांचेच डावपेच फसल्यावरती पुढे काय झालं हे लेखकाने उपसंहार पद्धतीने सांगितलं आहे.
काही पाने उदाहरणादाखल
प्रिन्सचं वर्णन
मार्याचा झिनाला पटवायचा प्रयत्न


गावातल्या बायका मार्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तिच्या घरीच ठिय्या मारतात तेव्हा

अविनाश बिनीवाले ह्यांनी अनुवादाला पूर्ण न्याय दिला आहे. व्यक्तींची आणि जागांची रशियन नावे सोडल्यास सगळं मराठी आहे आणि मराठमोळं आहे. म्हणी, वाक्प्रचार ह्यांच्या वापरातून सहज संवादी अनुवाद झाला आहे. त्यामुळे रशियन वातावरण आणि मराठी निवेदन हातात हात घालून जातं. त्यामुळेच पुस्तक वाचनीय झालं आहे. जर भाषांतर बोजड झालं असतं तर वाचण्यातला रस फार लवकर निघून गेला असता.
ही कादंबरी वाचताना २०० वर्षांपूर्वीचा रशिया, तेव्हाची परिस्थिती, लोक कसे विचार करत होते, लग्न संस्थेकडे बघण्याचा रशियन दृष्टिकोन इ. आपल्याला कळतं त्यामुळे रंजक कथानकाच्या ओढीपेक्षा या पैलूंच्या माहितीसाठी पुस्तक वाचता येईल. एका प्रथितयश कादंबरीकाराची कादंबरी कशी होती, तेव्हा कादंबरीची शैली कशी असायची हे आपल्याला कळेल.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link



