पुस्तक – मुक्ति पथावर (Mukti Pathavar)
लेखक – स्वामी आत्मानंद पुरी (Swami Atmanand Puri)
अनुवाद – ब्रह्मचारी एकनाथ (Brahmachari Ekanath)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – On the road to freedom (ऑन द रोड टू फ्रीडम)
मूळ पुस्तकाची भाषा – English (इंग्रजी)
पाने – २४०
प्रकाशन – माता अमृतानंदमयी मिशन ट्रस्ट जानेवारी २००७
छापील किंमत – दिलेली नाही
ISBN – दिलेला नाही
भारताचा अध्यात्मिक वारसा खूप मोठा आहे. वेद उपनिषदातील तत्त्वज्ञान, योग, आयुर्वेद, शास्त्रीय संगीत, नृत्य, कुटुंबव्यवस्था अशा अनेक गोष्टींचं प्रदेशातल्या लोकांना आकर्षण असतं. त्यातून बरेच परदेशी लोक भारतात या पारंपारिक विद्यांचा अभ्यास करायला येतात. त्यातले काहीजण इथेच रमतात. स्थायिकही होतात. काहीजण ह्या अध्यात्ममार्गावर, ज्ञानमार्गावर स्वतःला इतके झोकून देतात की ते एखाद्या भारतीय हिंदू व्यक्ती प्रमाणे संन्यास दीक्षा घेतात. असे परदेशी संन्यासी आपण क्वचित वेगवेगळ्या साधुसंतांच्या संस्थांमध्ये, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक महोत्सवांमध्ये बघितले असतील. या व्यक्तींना भारताची ओळख कशी झाली असेल, त्यांना आकर्षण का वाटलं असेल आणि इथेच कायमस्वरूपी राहण्याचा धाडसी निर्णय कसा घेतला असेल त्याच्या प्रत्येकाच्या कहाण्या वेगवेगळ्या असतील. ती कहाणी समजून घ्यायला, त्यांना कशात आनंद मिळाला, कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि मागे वळून बघताना त्या निर्णयाबद्दल त्यांना समाधान वाटते आहे का हे सगळं समजून घ्यायला तुम्हाला आवडेल का? तसं असेल तर “मुक्ति पथावर” हे पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल.
पुस्तकाचे लेखक स्वामी परमात्मनंदजी हे मूळचे अमेरिकन. त्यांचं आधीचं नाव नील. एका मध्यमवर्गीय घरात नील वाढत होता कॉलेजमध्ये जाऊ लागला होता. शिकून चांगली नोकरी मिळवणं, भरपूर पैसे कमावणं, आरामाचं जीवन जगणं, प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देणं ही भौतिक प्रगती हे सर्वसाधारणपणे लोकांना प्रवृत्त करणारी स्वप्न होती. अशाच वातावरणात तोही वाढत होता. पण यापेक्षाही काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे अशी भावना बळावत होती. कॉलेजच्या वयात असतानाच त्याला योग, भगवद्गीता याबद्दल जुजबी माहिती मिळाली आणि त्याच्या हृदयाची तार छेडली गेली. त्यातलं तत्वज्ञान लगेच पूर्णपणे समजलं नाही तरी आयुष्याकडे बघायची दृष्टी बदलू लागली. चाकोरीबद्ध शिक्षणाचा उद्देश केवळ पैसा कमावणे एवढाच असून त्या माध्यमातून जीवनातील सुखोपभोग घेण्यासाठीच हे सर्व आहे असे त्याला वाटू लागले. अत्यंत साधी जीवनशैली पुरेशी आहे त्यासाठी अधिक पैशाची गरज नसून एखाद्या लहानशा नोकरीने काम भागू शकेल असेही वाटू लागले. भारताबद्दल अनावर ओढ वाटू लागली. सुरुवातीला योग, हठयोग, यांच्याबद्दल वाचन आणि ते शिकवणाऱ्या शिक्षकांच्या भेटीसाठी त्याने थेट नेपाळ गाठलं. वास्तव्य केलं. पण नेपाळ ही आपली कर्मभूमी नाही तर भारतच आहे हे त्याचं हृदय सांगत राहिलं. तो भारतात आला .भारतीय तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचत होता. तमिळनाडूमधील तिरुवन्नामलै येथे पूर्वी राहत असणाऱ्या रमण महर्षींचा संदर्भ त्याला मिळाला. रमण महर्षी पूर्वीच समाधीस्थ झाले असले तरी आणि त्याने रमण महर्षींना मनोमन गुरु मानले. थेट तिरुवन्नामलै गाठली.
आतला आवाज, नियती किंवा जणू हे सर्व पूर्वनियोजित असावं अशा पद्धतीने रमण महर्षी आश्रमातल्या रत्नमजी यांनी त्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकन नीलची दिनचर्या पूर्णपणे बदलली. नील आता साधक झाला. रत्नमजी आपले गुरु. ते सांगतील तसं वागायचं त्यांनी ठरवलं. शरीरावरची आसक्ती उडून जावी म्हणून रत्नमजींनी त्यांना अतिशय खडतर दिनचर्या पाळायला लावली. फक्त शारीरिक कष्ट नव्हे तर राग, लोभ, भूक, तहान, या नित्य भावनांवर सुद्धा विजय मिळवण्यासाठी त्यांना सतत उद्युक्त केले. ध्यानधारणा कशी करावी, कसा नेम पाळावा हे शिकवले. पुन्हा पुन्हा त्यांची परीक्षा घेऊन मडकं अजून किती कच्चं आहे हे सुद्धा दाखवत राहिले. रत्नमजींबरोबर त्यांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. रत्नमजींच्या दैवी शक्तीचा अनुभव घेतला, त्यांच्या कृपेने उच्च मानसिक अवस्थेच्या अनुभवाची झलक काही वेळा पाहायला मिळाली.
पुढे रत्नमजींच्या देहावसनानंतर पुन्हा एकदा पूर्वनियोजित असल्याप्रमाणे केरळ मधल्या माता अमृतानंदमयी (अम्मा) यांचा शिष्य त्यांच्याकडे आला. आतापर्यंत आम्हांबद्दल काहीही माहिती नसणाऱ्या नीलला आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी गुरु अम्मा आहेत हे पटलं आणि ते तिकडे राहायला गेले. ते १९७९ साल होतं. माता अमृतानंदमयी आत्ताएवढ्या प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या. केरळमधील त्यांच्या खेडेगावाच्या आसपासचे लोक त्यांना ओळखू लागले होते. जिच्या अंगात येतं अंगात देवी संचार होतो आणि जी आपल्या समस्यांवर उपाय सांगते अशी एक तरुणी इतपतच लोकांना समजत होतं. ज्या पद्धतीने नीलना अम्मांनी बोलवून घेतलं, जेवढा नीलचा अभ्यास आणि साधना झाली होती त्यावरून त्यांनी ओळखलं की ही इतर लोक समजतात तशी एक केवळ अंगात येणारी येणारी मुलगी नाही. तर ही आत्मसाक्षात्कार झालेली विभूती आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये ती मिळून मिसळून राहते, मी एक वेडी मुलगी आहे असा अविर्भाव आणून राहत असली तरी ते केवळ त्यांचं वरवरचं रूप आहे. ज्यांना खरंच साधना करून आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे अशांसाठी त्या परमेश्वराने धाडलेल्या गुरूच आहेत. नील त्यांच्या गावातच राहू लागला. अजूनही तीन-चार शिष्य त्यांना येऊन मिळाले. रत्नमजींप्रमाणेच अम्मासुद्धा त्यांना खडतर परिश्रम करायला लावू लागल्या. परीक्षा घेऊ लागल्या. नीलच्या मनातले भाव थेट ओळखून त्याला अचंबित करत होत्या. मनात येणारे विकल्प, कधीकधी गुरुंच्या निर्णयावर येणारे शंका हे सगळे भाव ओळखून त्यांना मार्गदर्शन करत गेल्या.
अनुभव कथनाच्या या पहिल्या भागात अमेरिकन नीलचा इथपर्यंतचा प्रवास आहे.
काही पाने उदाहरणादाखल
रमण महर्षींच्या आश्रमात पहिल्या दिवशी आलेला दैवी अनुभव


मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आणि गुरुंनी घेतलेली परीक्षा


अम्मांच्या आश्रमात येणारे लोक सर्वसामान्य लोक त्यांच्या घरगुती समस्या घेऊन येतात, अम्मांच्या सहवासात शांतता वाटते म्हणून येतात. ते तपस्वी साधक नसतात. ह्या परिस्तितीमुळे आश्रम सोडावा असं वाटत असताना अम्मांनी केलेलं मार्गदर्शन.


ज्ञानमार्गाने अध्यात्मिक मार्गावर प्रगती करणे किती कठीण आहे, किती त्रासदायक आहे याचीच प्रचिती या पुस्तकाच्या वाचनातून येते. असंख्य शारीरिक कष्ट लेखक स्वतः भोगत होते आणि आपल्या गुरूंनाही भोगताना बघत होते. पण तरीही मन विचलित होऊ द्यायचं नाही. दिलेलं काम करायचं. सांगितलेली ध्यानधारणा करायची. हे करताना स्वतःच्या शारीरिक-मानसिक क्षमतेवर पुन्हा पुन्हा शंका उपस्थित होत्या. कधी खूप आत्मिक समाधान लाभले आहे, मन एकाग्र झाले आहे अशी अनुभूती आली की आपण आत्मसाक्षात्काराच्या जवळ पोहोचलो अशी भावना यायची. तर काही वेळा इतकी वर्ष तपश्चर्या करूनही आपली काहीच प्रगती झाली नाही; अजूनही मनावर नियंत्रण नाही; मन शुद्ध झालेले नाही असं वाटून ते खचलेही. जणू सापशिडीचा खेळच. त्यामुळे हे पुस्तक अध्यात्मिक विषयावरचे असले तरी एखाद्या रहस्यचित्रपटाप्रमाणे वाटते. आता पुढे काय होतंय? त्यांना देव दिसला का? आता त्यांची समाधी लागली का? याची उत्कंठा आपल्यालाही लागू राहते. पैशाची किंवा कुठल्या वस्तूची गरज असताना ती गरज आपोआप भागली जाणे, गुरूंना मनातले कळणे, गुरु आणि इतर संतांच्या तपाचं तेज डोळ्याने दिसणे, गुरु मार्गदर्शन करताना वेगळी अनुभूती येण्याची वर्णने असे काही अद्भुत अनुभव या पुस्तकात आहेत. त्यामुळे पुस्तक वाचन रंजकही होतं. अनुवाद सरस झाला आहे.
आपल्या भारतीय जीवनपद्धतीमध्ये तत्वज्ञान किती सहजपणे वर्षानुवर्षे सामावले गेले आहे ह्याची जाणीवही हे पुस्तक वाचताना होते. लेखक म्हणतात की …. “भारतीय लोक आई-वडिलांना गुरुजनांचा आदर करतात. त्यामुळे आदराची, भक्तीची सवय त्यांना असते. त्याचंच विशाल स्वरूप म्हणजे ईश्वराची भक्ती होते. पण अमेरिकन जीवनशैलीमध्ये आई-वडिलांकडे सुद्धा इतक्या भक्तीभावाने, आदराने बघितले जात नाही. पण परमेश्वर परमपिता आहे म्हणून त्याच्यावरच्या भक्तीची अपेक्षा केली जाते. भक्तीची, आदराची सवय घरातच नसल्याने अचानक परमेश्वराबद्दलचा भक्तीभाव सहजपणे उत्पन्न होत नाही.”. लेखकाचा हा दृष्टिकोन मला वैशिष्ट्यपूर्ण वाटला. लेखक भारताकडे नितांत कौतुकाने बघतो.
बराच वेळा घर-संसाराला, आयुष्याच्या कटकटीला वैतागलेले लोक म्हणतात की हे सगळं सोडून संन्यास घ्यावा असं वाटतं. पण संन्यासी होणं म्हणजे काही खायचं काम नाही हे या पुस्तकाच्या वाचनातून कळेल. सर्वसामान्य संसारी आयुष्यात असणाऱ्या कष्टांच्या कितीतरी जास्त कष्ट त्या मार्गावर आहेत. संसारी जीवनात तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला तुम्हाला लगेच मिळतो. त्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकता. पण इथे मात्र किती वर्ष तपश्चर्या करून आत्मज्ञान प्राप्त होईल? सांगता येत नाही. खरंच आत्मज्ञान असतं; का ते एक आभासी मृगजळ आहे ज्याच्या मागे आपण धावण्याचा वेडेपणा करतो आहे असंही वाटण्याची दाट शक्यता आहे. हे उमगेल.
अशाप्रकारे हे पुस्तक आपल्याला ज्ञानसाधना करणाऱ्या तपस्वी लोकांच्या वेगळ्या दुनियेत डोकावून बघायची, ते थोडं समजून घेण्याची संधी देते. ती संधी सुजाणवाचक नक्की घेतील.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
- तिमिरपंथी (Timirapanthi) – ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt) अनुवाद – सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
- जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) – आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद – सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
- वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) – सदानंद दाते (Sadanand Date)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


