पुस्तक – संघातील मानवी व्यवस्थापन (Sanghatil Manavi Vyvasthapan)
लेखक – नितीन गडकरी आणि शैलेश पांडे (Nitin Gadkari & Shailesh Pande)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १५१
प्रकाशन – राजहंस प्रकाशन, एप्रिल २०२५
छापील किंमत – रू. २५०/-
ISBN 978-81-19625-88-8

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच (विजयादशमी २०२५) आपली शताब्दी पूर्ण केली. ह्यानिमित्ताने संघाची स्थापना, शंभर वर्षांचा प्रवास ह्याबद्दल विविध माध्यमात चर्चा होत आहे. नागपूरला मोजक्या लोकांनिशी सुरु झालेली संघटना इतकी वर्षे कशी चालली, वाढली आणि भारतीय समाजकारणात-राजकारणात इतकी महत्त्वाची कशी झाली ह्याचं अप्रूप, कौतुक अनेकांना आहे. त्याचवेळी द्वेष आणि असूयाही आहे. संघाचे योगदानाबद्दल अनेकांना कौतुक आहे तर संघ-विचारांना अनेकांना पराकोटीचा विरोधही आहे. बऱ्याच वेळा ही चर्चा एकतर्फी होते. म्हणजे संघाकडून अधिकृतरित्या प्रत्येक वादविवादावर उत्तर दिलं जात नाही. मात्र संघाशी संबंधित व्यक्ती आपली मते, संघाची मूल्ये प्रकट करतात. अशा प्रकटीकरणात एक महत्त्वाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं दिसलं ते म्हणजे नितीन गडकरी लिखित “संघातील मानवी व्यवस्थापन”. नितीन गडकरी हे – रोडकरी , पूलकरी , टोलकरी, विकासपुरुष – अशा नावांनी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री आहेत. लहानपणापासून संघ स्वयंसेवक, तरुण वयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे कार्यकर्ते मग भाजपचे कार्यकर्ते, नेते, राष्ट्रीय अध्यक्ष इतकंच काय पंतप्रधान पदासाठी भाजपमधील योग्य व्यक्तींपैकी एक अशी ख्याती मिळवणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने संघ कसा आहे हे बघणं औचित्यपूर्ण आहे.

हे पुस्तक संघाचा कालसूत्रबद्ध इतिहास नाही तर संघाच्या स्थापनेचे कारण, ध्येय, कार्यपद्धती, वेळोवेळी होत गेलेला बदल ह्या सगळ्यामागे काय तत्वज्ञान आहे ह्यावर भर देणारे आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ही सगळी तात्त्विक चर्चा, उदात्त हेतू केवळ नेत्यांच्या मनात किंवा कागदावर राहिले नाहीत तर लाखो स्वयंसेवकांच्या मनात ते बिंबले गेले आहेत. तीनचार पिढ्या ते विचार अमलात येतायत. आणि त्यातून संघाची ताकद वाढते आहे. त्यामुळे “थेअरी” ते “प्रॅक्टिकल” हे अंतर संघाने कसं कापलं हे बघणंही औत्सुक्याचं आहे. त्यावर लेखकाने आपलं मत मांडलं आहे. ह्यात एकूण १६ लेख आणि चार परिशिष्टे आहेत. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली की त्यांचा अंदाज येईल.

दैनंदिन शाखा हे संघाच्या ताकदीचं उगमस्थान आहे. लहानपणापासून मुले शाखेत जातात, खेळ खेळतात, शूरवीरांच्या गोष्टी ऐकतात, देशभक्तीपर गाणी म्हणतात, मोठ्यांचे विचार ऐकतात. त्यातून संघाचा विचार मनात रुजतो. व्यक्ती कायमची कामाशी जोडली जाते. मोठेपणी ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तरी देशभक्ती, स्वबांधवप्रीती , समाजऋण हे भाव मनात ठेवूनच ती काम करते. ही शाखा कशी चालते, त्याबद्दल वेगवेगळ्या सरसंघचालकांचं मत काय आहे हे पुस्तकात दिलं आहे. त्यामुळे संघाच्या शाखेत कधी न गेलेल्या व्यक्तीला संघाचं हे उघड गुपित जाणून घ्यायची संधी पुस्तक देते.

पुढच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये ह्या पुढची प्रगत रचना, संघटनेतील उतरंड, प्रचारक, संलग्न संस्थांची स्थापना ह्याची माहिती दिली आहे. ही माहिती तांत्रिक नाही. कार्यकर्त्यांना कसे प्रेरित केले जाते, मूळ मूल्ये कशी अधोरेखित केली जातात हे सांगितलं आहे. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नाही. पण त्या व्यक्ती एकत्र येऊन पूर्णांकासारखे काम करू शकतात; हा भाव रुजवला जातो. म्हणून संघात कार्यकर्ता महत्त्वाचा आहे पण व्यक्तिपूजा नाही, असे लेखकाचे प्रतिपादन आहे. ही स्वयंसेवी संस्था आहे. त्यामुळे ज्याला स्वतः त्याग करायची मनापासून इच्छा आहे तोच ह्यात सामील होईल, हे खरेच. पण सामील झाल्यावर त्या त्यागाला अनुरूप काम मिळतं. आपल्यासारखेच समाजप्रेमी लोक मिळतात. हे सगळं सातत्याने कसे होते, ह्याबद्दलचे वर्णन पुस्तकात आहे.

संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या सरसंघचालकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि निर्णयांचा मोठा वाटा संघाच्या यशात आहे. डॉ. हेडगेवारांपासून आत्ताच्या सरसंघचालकांपर्यंत प्रत्येकाच्या विचारांची, निस्पृहतेची थोडक्यात ओळख दिली आहे. सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि त्यांचे बंधू भाऊराव देवरस ह्यांच्याशी लेखकाचा प्रत्यक्ष परिचय आला. त्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लेख आहेत. पुढील चार लेखांत पुन्हा संघाची तात्त्विक भूमिका मांडली आहे. अभाविप, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र इ. महत्वाच्या संस्था कुठल्या कुठल्या टप्प्यावर झाली हा भाग निवेदनाच्या ओघात आला आहे.

एकूणच ह्या पुस्तकात तत्वज्ञानाचा, “थेअरी”चा भाग जास्त आहे. गीता, उपनिषदे, धर्मग्रंथे ह्यांच्यातील श्लोक व वचने जी भारतीय विचारपद्धतीचा आधार आहे त्यांचा उल्लेख आहे. केवळ स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही तर पुन्हा पारतंत्र्यात जायला नको ह्यासाठी स्वतःची शक्ती विकसित झाली पाहिजे हा विचार पुन्हा पुन्हा मांडला आहे. कार्यकर्त्याने कसे समर्पण करावे हे सांगितले आहे. सरसंघचालक आणि इतर मोठ्या नेत्यांची वचने आहेत. पण असे वाटले की तोच तोच भाग पुन्हा पुन्हा येतो. नितीन गडकरी स्वतः कार्यकर्ते म्हणून कसे घडले, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले, त्यांचे गुणदोष कसे बदलले हे सगळं सविस्तर येईल असं वाटलं होत. त्याची अगदी एकदोन उदाहरणे आहेत. ती पण फार मोघम – वरवरची.

“व्यक्ती तितक्या प्रकृती”, “मतभेद”, “घर म्हटलं कि भांड्याला भांडं लागणारच” ह्या समस्या संघात पण असणारच. पण त्यांवर कशी मात केली जाते हा भाग फार येत नाही. कार्यकर्त्याशी बोललं जातं, वाटल्यास जबाबदाऱ्या बदलल्या जातात इतपत लिहून बोळवण केली आहे. एकूणच सगळे “स्वयं”सेवक असल्यामुळे सगळं आपसूक सुरळीत होत असावं असं पुस्तक वाचून वाटू लागतं. “मानवी व्यवस्थापना”बद्दलच्या पुस्तकात ह्या पैलूचा वस्तुनिष्ठ विचार आवश्यक होता.

काही पाने उदाहरणादाखल वाचा

शाखेची माहिती बद्दलच्या प्रकरणातील दोन पाने


संघाच्या दृष्टीने, धर्म, आत्मतत्त्व


कुशल संघटक/नेता कसा असावा ह्याबद्दलच्या प्रकरणातील दोन पाने

तुम्ही संघाच्या शाखेत कधी गेला नसाल, संघाचे मूळ विचार काय आहेत हे माहिती नसेल तर हे पुस्तक तुम्हाला संघाची वैचारिक बैठक आणि कामाचा विस्तार ह्याबद्दल चांगली माहिती मिळेल. संघाची जुजबी माहिती असेल तरी काही नवे पैलू कळतील. तात्विक चर्चेची पुनरुक्ती टाळून नितीन गडकरींची किंवा इतरांची वैयक्तिक उदाहरणे, अंतर्गत संघर्षाच्या निराकरणाची उदाहरणे, नवीन ध्येये ठरवण्याची प्रक्रिया ह्या सगळ्या बाबी पुढच्या आवृत्तीत आल्या तर “व्यवस्थापन” समजून घेण्याच्या दृष्टीने पुस्तक अजून माहितीपूर्ण ठरेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet