पुस्तक – जरा जाउन येतो (jara jaun yeto)
लेखक – दि. बा. मोकाशी (D. B. Mokashi)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १९३
प्रकाशन – प्रतिमा प्रकाशन जून १९८७
ISBN – दिलेला नाही
दि. बा. मोकाशी हे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव. परंतु याआधी मी त्यांची पुस्तकं वाचली नव्हती. “देव चालले” ही त्यांची कादंबरी आणि “आमोद सुनासी आले” ही कथा; यांच्या बद्दल वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वाचनात आलं त्यामुळे यावेळी उत्सुकतेने मी मोकाशींचं पुस्तक घेतलं. हा त्यांचा कथासंग्रह आहे. सरोजिनी वैद्य आणि माधुरी पणशीकर यांनी कथांची निवड केली आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी कथांचं रसग्रहणही केले आहे.
सगळ्याच कथा अतिशय छान गुंगवून ठेवणाऱ्या आहेत. एकेका विशिष्ट प्रसंगावर त्या कथा आधारलेल्या आहेत. प्रसंगात दृश्य स्वरूपात जे घडतं त्याचबरोबर त्यातल्या मुख्य पात्राच्या मनात काय करतो याचं चित्र मोकाशींनी रेखाटलं आहे. प्रसंग खूप नाट्यमय किंवा क्वचितच घडणारे असे नाहीत. अगदी साधे साधे आहेत. सर्वसामान्य मध्यमर्गीय लोकांचे आपले स्वतःचे अनुभव असतील तर काही आजूबाजूला पाहिलेले. प्रत्येक घटनेत त्यावेळी सामील असणाऱ्या माणसांच्या पिंडानुसार त्याचे मनात उठणारे तरंग निराळे. म्हणूनच प्रसंग साधे असले तरी अशा-अशा वेळी अशा-अशा स्वभावाची व्यक्ती असेल तर काय घडेल हे वाचणं रंजक ठरतं.
काही गोष्टी मधल्या मुख्य प्रसंगांबद्दल सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल.
“गोष्टीची मोहिनी” – दोन सख्ख्या भावांची भांडण आणि त्यातून होणारा रुसवा,
“रोमच्या सुताराची गोष्ट”, “काय रानटी लोक आहेत!” – नवीनच प्रेम जोडून आलेल्या जोडप्यांचा लाडिकपणा. एका गोष्टीत शारीरिक जवळीकीची उत्सुकता तर दुसऱ्या गोष्टीत अशा जवळची पेक्षा मनं जुळण्याची उत्सुकता.
“आपला तुपला चहा”- संसाराच्या रगाड्यात गुंतला गृहस्थ जेव्हा तासभर घरात कोणी नाही तेव्हा ती शांतता एन्जॉय करायची ठरवतो. पण शांततेची सवय नसल्यामुळे अधिकच अस्वस्थ होतो.
“मजोर”- एका प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात हरणांच्या रूपात नवीन जन्मलेले पिल्लू मोठं होत आहे.मग ते प्रमुख नराशी स्पर्धा देऊ लागतं.
“लेणी”- एक जोडपं लेणी बघायला गेलं आहे. त्या लेण्यांचं सौंदर्य आणि त्याचा इतिहास तरुणाला इतकं मंत्रमुग्ध करतो आहे की त्याला आपली प्रेयसीचा सुद्धा क्षणभर विसर पडतो. आजूबाजूच्या गावातले लोक अपल्यासुरखे इतके भारावून कसे गेले नाहीत म्हणजे किती आरसिक आहेत असं वाटतं.
“आमोद सुनासी आले” – ह्या कथेवर “दिठी” नावाचा मराठी चित्रपट आला होता. त्या कथेत मुलाचं अकाली निधन सोसणारा बाप गावातल्या गाईचं बाळंतपण करायला दुःख विसरून पुढे जातो. हा जन्म मृत्यूचा खेळ रंगवला आहे.
“वास्तू”-एका व्यक्तीला स्वतःचं घर बांधायचं असतं वाटेत फिरताना त्याला रिकामा प्लॉट दिसतो आणि त्या प्लॉटवर घराचं बांधकाम चालू असतं. कोण घर बांधेल कसं घर बांधलेले याची उत्सुकता आणि दुसऱ्याचं घर पूर्ण होतंय याचा कुठेतरी हेवा. घर बांधताना खोदकामामध्ये मातीतली मुंग्यांची वारुळे, उंदरांची बिळे, सापांची बिळे, झाडावरची घरटी नष्ट होत आहेत म्हणजे प्राण्यांची घरे पाडून माणसाचं घर बनतंय असा एक तात्विक भागही मनात आहे. अशा या भावभावनांचं सुंदर मिश्रण यात आहे.
“डोंगर चढण्याचा दिवस”- मुलंमुलं मिळून गावाजवळच्या डोंगरावर डोंगरचढाई करायला जातात. जंगलाची अवघड वाट, चढण हे सगळं अनुभवतात आणि परत येतात. म्हटलं तर वेळोवेळी धडपडायची, अगदी जीव जाण्याची शक्यता होती. पण बालपणात ते कळत नाही. मोठेपणी मात्र छोट्या छोट्या गोष्टीतही भीती वाटते. याची गंमत दाखवणारी कथा.
“जरा जाउन येतो”- सगळा सुखवस्तू संसार असूनही अचानक विरक्ती येऊ नाहीशा झालेल्या माणसाची गोष्ट.
“तिसरी हकीकत” – एक सिद्धहस्त, प्रसिद्ध असा लेखक. पण स्वतःच्या बायकोच्या मनात डोकावायचं कधी त्याच्या लक्षात नाही आलं. परंतु “क्रिएटिव्ह ब्लॉक” आल्यावर जेव्हा तो बायकोकडे वळतो तेव्हा.
काही पाने वाचून बघा.
गावाजवळच्या डोंगरात वणवा लागला. गावकऱ्यांची धावपळ सुरु झाली. ती डोळ्यासमोर उभे करणारे वर्णन
लहान मुलांचा डोंगर चढण्याचा अनुभव.ह्याच अनुभवाकडे पोक्त झाल्यावर बघितलं की किती वेगळाच विचार डोक्यात येतो.
मोकाशींची भाषा साधी सरळ अर्थवाही आहे. पण तरीही प्रसंग चपखल डोळ्यासमोर उभा करणारी आहे. गुंतवून ठेवणारी आहे. सुखदुःख, आशा-निराशा, जन्म-मृत्यू,भूतकाळातल्या गोष्टींची आठवण तर येणाऱ्या काळाबद्दल हुरहुर, चुकांबद्दल पश्चाताप तर नवं काही करायची भीती…. अशा एक ना अनेक मानवी भावभावनांचं सुंदर चित्रण या सर्व कथांमधून घडतं. मराठी साहित्यप्रेमींना एकाच वेळी हलकंफुलकं पण त्याचवेळी अतिशय गहन जीवनदर्शन घडवणाऱ्या या गोष्टी आहेत. नक्की आवडतील.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे
- अनोळखी वाटा(Anolakhi vata) – झुम्पा लाहिरी(Jhumpa Lahiri) (अनुवाद : शुभदा पटवर्धन Shubhada Patwardhan)
- इन्स्टॉलेशन्स (Installations) – गणेश मतकरी (Ganesh Matkari)
- अंधारवारी (Andharvari) – हृषिकेश गुप्ते (Hrushikesh Gupte)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- काजळमाया (Kajalmaya) – जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- जयवंत दळवींचा विनोदनामा (Jayavant Dalavincha Vinodanama) – जयवंत दळवी (Jayavant Dalvi)
- जिथली वस्तू तिथे (Jithali vastu tithe) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- झांझिबारी मसाला (Zanzibari Masala) – उमेश कदम (Umesh Kadam)
- तत्रैव (tatraiv)-राजन खान (Rajan Khan)
- थोरली पाती (Thorali Pati)-ग.दि.माडगूळकर(Ga.Di. MadaguLakar)
- दुस्तर हा घाट आणि थांग (Dustar ha ghat ani thang) – गौरी देशपांडे (Gauri Deshpande)
- द्विदल (Dwidal) लेखक – डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondake)
- निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha) – प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo )
- नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) – केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक – संजय बापट (Sanjay Bapat)
- पश्चिम(Paschim)-विजया राजाध्यक्ष (Vijaya Rajadhyaksha)
- प्रवेश (Pravesh) लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- भोकरवाडीतील रसवंतीगृह (bhokarawadItIl rasavantIgruh) -द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
- माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)-जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- मालवणी कथा (Malavani Katha)
- रंगांधळा (Rangandhala) – रत्नाकर मतकरी (Ratnakar Matakari)
- वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाईस (Vatsalavahinincha Adhunik advhais) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- शिन्झेन किस (Shinzek Kiss) – शिन्इची होशी Shinichi Hoshi – अनुवादक – निस्सीम बेडेकर (Nissim Bedekar)
- हास्यमुद्रा (Hasymudra) – मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe