पुस्तक – खोल खोल पाणी (Khol khol pani)
लेखक – पेरुमाल मुरुगन (Perumal Murugan)
अनुवादक – सुप्रिया वकील (Supriya Vakil)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – கூளமாதாரி (कूळमादारी)
मूळ पुस्तकाची भाषा – तमिळ (Tamil)
इंग्रजी अनुवाद – Seasons of the Palm (सिजन्स ऑफ पाम)
इंग्रजी अनुवादक – व्ही. गीता (V. Geetha)
ह्या पुस्तकाची पाने – ३००
प्रकाशन – जून २०२५, मेहता पब्लिशिंग हाऊस.
ISBN – 9789357205092
तामिळनाडूमधल्या खेडेगावात घडणारी ही कादंबरी आहे. दलित समाजातील लोक तिथल्या उच्च्वर्णीय जमीनदार वा शेतकऱ्यांकडे शेतमजूर म्हणून काम करतायत. ह्या दलित समाजात मुळातली गरीबी, अत्यल्प मजुरी. मोठा पोरवडा त्यामुळे खर्च फार. तरीही काही पैसे वाचले तर अशिक्षितपणामुळे ते साठवणे, वाढवणे असा विचारच फार नाही. उलट दारूत पैसा घालवणे आणि ऋण काढून सण साजरे करणे. मालकासमोर, जमीनदारासमोर पैशासाठी हात कायम पसरलेलेच! ह्यात भरडलं जातं ते लहानपण. “मजूर” बनण्यासाठीच जन्म घेतला जातो. त्यामुळे जेमतेम समजायला लागलं की मुलं आपल्या आईबापाचं कर्ज फेडण्यासाठी मालकाकडे कामाला लावली जातात. ही लहान मुले गुरे राखतात, बकऱ्या चरायला घेऊन जातात आणि मालक सांगेल ती अंगमेहनतीची कामं करतात. मालकाकडेच राहतात. गोठ्यात झोपतात. मालकीण काय देईल ते खायचं. गुरं घेऊन बाहेर पडायचं. लंगोटीवर राहायायचं. दिवसभर मेहनत करून असंच एका आडोशाला झोपायचं. अशाच मुलांच्या आयुष्याची ही कहाणी आहे.
गावात वेगवेगळ्या मालकांकडे काम करणारी अशी मुलं – बुटक्या, लंब्या, लंगड्या, पोटी, काडेपेटी, किवंडी नावाची – आपल्याला कादंबरीत भेटतात. पहाट झाली की बकऱ्यांना चरायला घेऊन ते बाहेर पडतात. बकऱ्यांना त्यांच्या कुरणात सोडलं, जरा निवांतपणा मिळाला की ही मुलं एकमेकांशी गप्पा गोष्टी करतात, खेळतात, एकेमकांची थट्टा मस्करी करतात. तलावात पोहतात. पडक्या विहिरीत बकऱ्या धुतात. मातीत लोळतात. ह्याचे मजेशीर प्रसंगात आहेत. बकऱ्यासुद्धा त्यांचे मित्र मैत्रीणच बनलेले आहेत. त्यामुळे बकऱ्यांनाही नावं आहेत. खोडकर बकरं कुठलं, लाजाळू कुठलं, प्रेमळ कुठलं हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे बकऱ्याचे लाड करतात, कधी त्यांच्यावर रागावतात, प्रसूतीच्या वेळी आजारपणात त्यांची शुश्रूषाही करतात. बकऱ्यांवर चिडताना आपला आवाजही मालकासारखाच झालाय की काय अशी भावना क्षणभर त्याच्या मनात येते. “भूमिका” घेतली की वागणं कस बदलतं !!
मुलं म्हटलं की खोडकरपणा आलाच. त्याच्या जोडीला कायमची भूक. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतातून भुईमुगाच्या शेंगा चोरणं, ताडाची फळं चोरणं, रानमेवा गोळा करण्याच्या नादात बकऱ्यांकडे दुर्लक्ष होणं घडणारच. मग मात्र भयंकर परिणाम होतात. मालकाच्या शिव्या आणि मरेस्तोवर मारहाण…लहानमूल आहे ह्याची तमा न बाळगता !! असे प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.
मालकांची मुलं आणि ही वेठबिगार मुलं आसपासच्या वयायाचीच. त्यामुळे मालकांची मुलं ह्यांच्याबरोबर खेळायला येतात. अस्पृश्यांबरोबर खेळतोय हे घरच्यांना कळलं तर कंबख्ती आहे, हे माहिती असूनही. पण खेळताना मालकाचा पोर म्हणून हे म्हणतील ते खेळ खेळायचे; ह्यांनी खोडी काढली, फटके दिले तरी नोकरमुलांनी ते सहन करायचं. मालक मालक म्हणून नाकदुऱ्या काढायच्या. त्यातून काही आगळीक झाली आणि ते मालकाच्या कानावर गेलं की “माझा मुलगा ढीग म्हणाला .. तुला शेण खायला कोणी सांगितलं?” ह्या न्यायाने पुन्हा शिक्षा गुलामालाच. दोन लहानपणांमधली ही दरी दाखवत दाखवत पुस्तक पुढे जाते. मालक – नोकर नात्याचे संस्कार लहानपणापासून दोन्हीबाजूने कसे होतात, समाजाची दुःस्थिती पुढे कशी राखली जाते हेच ह्यातून जाणवतं.
अशा प्रसंगांनी गुंफलेली ही कादंबरी आहे. प्रसंग सुटे सुटे वाटले तरी हळू हळू पुढचे मागचे संदर्भ जुळत जुळत मोठी कथा आपल्या डोळ्यासमोर येते. एका शोकांतिकेत पर्यवसान होतं.
கூளமாதாரி (कूळमादारी) ह्या मूळ नावात மாதாரி(मादारी) ही तामिळनाडूतील मागासवर्गीय जात आहे. கூளம் (कूळम्) म्हणजे शेतीतलं उरलंसुरलं, गुरांना खायला ठेवलेलं
आता काही पाने उदाहरणादाखल वाचा
बकरीचं बाळंतपण बघणारी ही “बाळं”

मालकाचा मुलगा सेल्वन आणि “बुटक्या” ह्यांच्यातला संवाद


शिक्षेच्या भीतीने घरी पळून जाण्याचा प्रसंग


अनुवाद उत्तम झाला आहे. व्यक्तींची आणि ठिकाणांची नावं तमिळ आहेत म्हणून ती तमिळ कादंबरी आहे असं कळतं अन्यथा ती मराठीच वाटते, इतकं भाषांतर मराठमोळं आहे. त्यासाठी अनुवादक सुप्रियाजींचे आभार. पण तमिळ नावं मराठीत लिहिताना मात्र अजून काळजी घ्यायला हवी होती. इंग्रजी स्पेलिंगवरून ती मराठीत लिहिताना “th” म्हणजे “थ”, “a” म्हणजे “अ की आ” असा गोंघळ केला आहे. प्रत्यक्ष लेखकाचं तमिळ नाव பெருமாள் म्हणजे पेरुमा”ळ” आहे. पेरुमा”ल” नव्हे. “अमरान टॉकीज” असं नाव आहे. ते “अमरन् टॉकीज” असणार. “थुंगाये थंबी थुंगाये” असा चित्रपटाचा उल्लेख आहे. नेटवर शोधल्यावर कळतं की तो “தூங்காதே தம்பி தூங்காதே” म्हणजे “तूंगादे तंबी तूंगादे” असं नाव आहे. मला तमिळ येत असल्यामुळे ह्या चुका लगेच जाणवल्या. “मध्यरात्रीनंतरचे तास” ह्या नावाच्या मराठी अनुवादित पुस्तकातही अशा बऱ्याच चुका होत्या (वाचा : https://learnmarathiwithkaushik.com/courses/madhyaratrinantarache-tas/ ). अनुवादकाने इंग्रजीवरून अनुवाद केला असेल तरी मूळ पुस्तकाच्या भाषेतल्या शब्दांचे योग्य उच्चार मूळ भाषिकाला विचारले पाहिजेत. भारतीय भाषांच्या बाबतीत हे नक्कीच शक्य आहे.
अशा ह्या पुस्तकात सामाजिक उच्चनीचतेची जाणीव दिसते. पुस्तकात मुलांच्या गप्पा, खोड्या दिसतात. शिक्षेच्या भीतीने पळून जाणं आणि सापडणं दिसतं. बेदम मार खाणं दिसतं. वयात येण्याआधीच लैंगिकतेची ओळख झाल्यामुळे होणारी त्याबद्दलची उत्सुकता दिसते. मार खाऊन झाल्यावर वाढता कोडगेपणा दिसतो. आपण काम सोडलं तर आपल्या लहान भावाला कामाला यावं लागेल ह्याचीही काळजी वाटते. दिवसेंदिवस घरी जायला न मिळाल्यामुळे अशा भुकेच्या, वेदनेच्या क्षणी आईची, आजीची येणारी जाणीव बघून आपलंही मन कातर होतं. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गच नसल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात.. “खोल खोल पाण्यात” आहे ह्याच गडद जाणीवेत कादंबरीचा शेवट होतो. अशा पाण्यात डोकावायला तुम्हालाही भावेल, कदाचित एखाद्या बुडत्याला हात द्यायची इच्छा मनात निर्माण होईल.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
- तिमिरपंथी (Timirapanthi) – ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt) अनुवाद – सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
- जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) – आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद – सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
- वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) – सदानंद दाते (Sadanand Date)
- पुढचं सोंग (Pudhach Song) – नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) – गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
- तुकाराम (Tukaram) – शफी पठाण (Shafi Pathan)
- ज्युलियस सीझर (Julius Caesar) – विल्यम शेक्सपियर (William Shakespeare) अनुवाद – शिरीष सहस्रबुद्धे (Shirish Sahasrabuddhe)
- वैदिक हिंदू ग्रंथ परंपरा : स्वरूप, सार आणि संवाद (Vaidik Hindu Granth Parampara : Swarup, Sar Ani Samvad) लेखक – माधव जोशी (Madhav Joshi)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३७४वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


