पुस्तक – इथियोपियी सुरस कथा (Ethiopiyi suras katha)
लेखक – उमेश कदम (Umesh Kadam)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १६०
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, जानेवारी २०२६
छापील किंमत – रु. २६०/-
ISBN – 9789357201704
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस या जागतिक मानवतावादी संस्थेसाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वीस वर्षे कायदा सल्लागार म्हणून उमेश कदम यांनी काम केलं आहे. त्यापैकी २००८ ते १८ ही दहा वर्ष ते आफ्रिकेमध्ये होते. त्यातील पहिली अडीच वर्षे ते इथियोपियात वास्तव्याला होते. त्यानंतर इतर देशात त्यांची बदली झाली. इथिओपिया आणि आजूबाजूच्या बऱ्याच आफ्रिकी देशांना कमीअधिक कालावधीसाठी भेट देण्याचीही संधी मिळाली. प्रत्यक्ष वास्तव्य करताना तिथली संस्कृती, खानपान, हवामान याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला. रेडक्रॉस च्या कामामुळे आदिवासींची जीवनपद्धती, एकूण सामाजिक समस्या आणि त्यांची राजकीय कारणे इ . जवळून बघता आले. भारतापेक्षा इतिहास, भूगोल, संस्कृती, गरिबी, सामाजिक प्रश्न, सशस्त्र बंडखोरी, अंतर्गत यादवी या सर्व बाबतीत इथिओपिया खूपच वेगळा आहे. तिथे कामानिमित्त जाऊन राहणं हे युरोपअमेरिके सारख्या प्रगत देशांमध्ये स्थायिक होण्यासारखं नक्कीच नाही. आपल्यापैकी असं धाडसाचं काम फारच थोडे लोक करतील. आपल्यासाठी आफ्रिकेचा इतका मोठा विभागभूभाग अपरिचितच राहू शकतो. म्हणूनच उमेश कदम यांच्यासारखी धाडसी आणि संवेदनशील व्यक्ती जेव्हा तिचे अनुभव आपल्यासमोर मांडेल तेव्हा ती संधी तरी आपण दवडता कामा नये.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती. (जन्मवर्ष चुकलेलं आहे असं वाटतंय.)

हे पुस्तक प्रवासवर्णन नाही किंवा सामाजिक -ऐतिहासिक असं दस्तऐवजीकरणही नाही, तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे या सुरस कथा आहेत. किस्से आहेत. लेखकाला आलेले अनुभव आहेत. तिथल्या वास्तव्यात सहकाऱ्यांकडून समजलेल्या घटना आहेत. काही मजेशीर, काही गंभीर. तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या. त्याला थोडी कल्पनेची जोड देऊन कथास्वरूप आणलं आहे. ह्यांत आफ्रिकन आदिवासींच्या चालीरीतींची धमाल दिसेल तर काही वेळा त्यातून निर्माण झालेला पेचप्रसंग वाचायला मिळेल. आदिस अबाबा शहराचे वातावरण, राहणीमान कसं झकास आहे हे समजेल. दुसरीकडे अंतर्गत यादवीमुळे लोक आपला जीव मोठे धरून परागंदा होत निर्वासित म्हणून इतर देशात जायची धडपड का करतात हेही समजेल. आता यातल्या काही कथांबद्दल सांगतो
तुम्ही भयानक आहात – लेखक त्याच्या एका आफ्रिकन सहकाऱ्याला कौटुंबिक समस्येबद्दल सल्ला देतो. त्या सल्ल्यानुसार वागल्याने समस्या सुटते. तो लेखकाला अभिनंदनपर पत्र पाठवतो. पण आफ्रिकन सहकाऱ्याचे इंग्रजीचे ज्ञान यथातथा असल्यामुळे त्या लिखाणातून झालेल्या गैरसमजातून लेखकाच्या घरीच कौटुंबिक समस्या उभी राहू लागते.
आफ्रिकी युती आणि सम्राटांची युक्ती – साऱ्या आफ्रिकी राष्ट्रांची एक विभागीय संघटना स्थापन करावी या उद्देशाने इथियोपियाच्या सम्राटांनी १९६३ मध्ये एक शिखर परिषद बोलावली होती. बहुतेक सगळ्या मुद्द्यांवर सर्व राष्ट्रांचं एकमत झालं. पण संघटनेचं मुख्यालय कुठे असावं यासाठी दोन-तीन देशांमध्ये चुरस निर्माण झाली. मुख्यालय आपल्या देशात आदिस अबाबा इथे यावं यासाठी इथिओपियन सम्राट काय प्रलोभन दाखवतात ते वाचा . इतक्या उच्च दर्जाच्या वाटाघाटींमध्ये असंही घडत असेल हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मेंगेशाची महत्त्वकांक्षा – गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड करणाऱ्या, सन्मार्गाने चालणाऱ्या मेंगेशा नावाच्या मुलाची ही गोष्ट आणि त्याचा सुखांत शेवट.
चाट खाऊन पडावे – “चाट” नावाच्या वनस्पतीची पानं आफ्रिकेत तंबाखू सारखी खाल्ली जातात. त्याची नशा चढते. तिथल्या बाजारात म्हणे ती सर्रास दिसते आणि आजूबाजूच्या देशात निर्यातही होते. या चाट खाण्याची मनोरंजक निरीक्षणे या लेखात आहेत.
मसूर मॅक्रोनी नि मुर्सी – आदिवासींच्या चित्रविचित्र सवयींचे, स्वागताचे आणि बेरकीपणाचे किस्से
मियाझाची मुलगी मरीना – इथिओपिया देशाला लागून एरिट्रिया नावाचा देश आहे. लेखकाच्या घरी स्वयंपाककाचं काम करणाऱ्या मियाझाची मुलगी मरीना एरिट्रियात होती. मायलेकींची अशी ताटातून कशी झाली. निर्वासित म्हणून परागंदा होण्याचा निर्णय मरीनाने कसा घेतला आणि शेवटी तिसऱ्याच देशात मायलेकींची भेट कशी झाली याची एक अस्वस्थ करणारी पण सुखान्त कहाणी.
अपहरण( होऊ घातलेल्या) पत्नीचे – लग्नाच्या बाबतीत आफ्रिकन आदिवासी जमातींचे आपापले रीतीरिवाज आहेत. एका जमातीत अशी प्रथा आहे की, मुलगा वयात आला की त्याने आपल्या आवडीच्या मुलीचे चक्क अपहरण करायचे! तिला पटवायचे आणि मग लग्न करायचे !! अहो पण हा रिवाज आफ्रिकेच्या बाहेर युरोपात पाळायला गेलात तर घोटाळा नाही का होणार? पण हा घोटाळा केला “बिर्हानू”ने. हा बिर्हानू कोण युरोपात कसा पोहोचला आणि त्याच्या घोटाळ्याचा शेवट काय झाला की धमाल वाचण्यासारखी आहे.
एक धक्कादायक गोष्ट – इथे पुन्हा गरिबीतून बाहेर पडण्याची त्यासाठी निर्वासित होण्याची , रेफ्युजी बनण्याची कहाणी आहे. पण ही मेंगेशासारखी सरळमार्गी व्यक्ती नाही तर इथे एक बनेल बाई आहे. ही बाई इथियोपियातून कशी बाहेर पडते आणि काय काय “उद्योग” करते हे लेखकाला तिच्या नवऱ्याच्या तोंडूनच ऐकायला मिळते.
मी इथिओपियी तुरुंगात जातो – आपले लेखक महाशय तुरुंगात गेले होते… पण फक्त बघायला, सामाजिक उपक्रमांचा सर्वेक्षण करायला. आणि ते तुरुंग इतके सुंदर दिसले की कदाचित तुम्हीही तिथल्या तुरुंगात जायचा विचार कराल.
चिन्मय आफ्रिका – हे शीर्षक वेगळं आहे. भक्तिमय, सूरमय च्या धर्तीवर “चीन”मय” याअर्थी चिन्मय असा उल्लेख लेखकाने केला आहे. आफ्रिकेमधल्या अराजकाचा आपल्या फायद्यासाठी वापर करत चीनने आपले पाय आफ्रिकेत रोवले आहेत. तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क प्रस्थापित केला आहे. रस्ते, पूल रेल्वे, सरकारी इमारती अशा सर्व पायाभूत सुविधांमध्येही चीनचाच वरचष्मा आहे. एका अर्थाने चीनचा हा नववसाहतवादच आहे. त्याचं लेखकाला दिसलेलं स्वरूप.
काही पाने उदाहरणादाखल
“अस्सा तुरुंग सुरेख बाई “
कष्ट करून पोट भरणारा आणि प्रगतीचा विचार करणारा मेंगेशा

अशा कथा व अनुभववर्णनपर ललित लेख आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर “फक्त प्रौढांसाठी” असा उल्लेख आहे. पुस्तकावर असा उल्लेख मी पहिल्यांदाच बघितला. त्याबद्दल मनोगतात लेखक असे म्हणतात की; “सुरस कथा” म्हटल्यावर या कथा फक्त लहान मुलांसाठी असाव्यात असा समज झाला असता. पण तसं नसल्यामुळे कंसात फक्त प्रौढांसाठी असा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. पण “फक्त प्रौढांसाठी” म्हटल्यावर पुस्तक अश्लील, शृंगारिक किंवा अति हिंसक असेल असं मनात येतं. प्रत्यक्षात तसं काही नाही. दोन-तीन गोष्टींमध्ये नवराबायकोचे संबंध , गर्भधारणा, फसवणूक, व्यभिचार यांचे उल्लेख येतात. पण इतपत उल्लेख हल्ली कुठल्याही कादंबरीत वा सामाजिक लेखांमध्ये वाचायला मिळतात -“फक्त प्रौढांसाठी” असं न लिहिता. त्यामुळे हे असं स्वतंत्र लिहिण्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. काही वाचक पुस्तक घेणार नाहीत तर काही वाचक फार अपेक्षेने पुस्तक घेतील. 🙂 गोंधळ टळेल असं आकर्षक शीर्षक सुचलं असतं. (एक गंमत … हे पुस्तक वाचत असताना पंकज भोसले यांचं “फ्रेन्च मेनिॲक” असं पुस्तक वाचण्यात आलं. त्यात तर पानोपानी अश्लील चित्रफितींची सूचक वर्णनं आणि पॉर्नस्टार ह्यांचे उल्लेख आहेत. किंबहुना तोच पुस्तकाचा आत्मा आहे. तरी त्या पुस्तकावर “फक्त प्रौढांसाठी” असं लिहावसं वाटलं नाहीये . असो. )
प्रत्येक लेख हा मिश्र निवेदनशैलीचा आहे. लेखक त्यावेळी तिथे कसा आणि का होता हे सांगितलं आहे. किस्सा समजून घेण्यासाठी आवश्यक ती ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमी सुद्धा थोडक्यात स्पष्ट केली आहे. लेखक आणि इतर पात्रांच्या संवादातून किस्सा खुलतो. पुन्हा लेखक आपलं मत मांडतो. अशाप्रकारे त्या त्या कथेला आवश्यक अशा पद्धतीने निवेदन होतं. लेखकाची शैली मिश्किल, नर्मविनोदी आहे त्यामुळे आपण त्याच्याबरोबर समोरासमोर गप्पा मारतोय असंच वाटतं. त्यातून पुस्तकाची वाचनीयता दुणावते.
मुखपृष्ठ आकर्षक आहे. आदिवासी व्यक्ती आणि तिच्या पार्शवभूमीवर गोष्टीच्या संदर्भातले दृष्य असं चित्र आहे. सरदार जाधव ह्यांनी मुखपृष्ठ केलं आहे. पुस्तकाच्या आतही खरे फोटो किंवा किमान रेखाचित्र असती तर अजून प्रेक्षणीय झालं असतं.
काही वर्षांपूर्वी लेखकाचं झांजिबारी मसाला हे पुस्तक वाचलं होतं आता हे दुसरं. लेखकाचे अनुभव हे सहसा मराठी समाजात न घेतले जाणारे आहेत. त्यामुळे त्यांनी लिहित राहावं आणि अशा अनोख्या प्रदेशाची सैर वाचकांना घडवत राहावी.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे
- इन्स्टॉलेशन्स (Installations) – गणेश मतकरी (Ganesh Matkari)
- अंधारवारी (Andharvari) – हृषिकेश गुप्ते (Hrushikesh Gupte)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- काजळमाया (Kajalmaya) – जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- जयवंत दळवींचा विनोदनामा (Jayavant Dalavincha Vinodanama) – जयवंत दळवी (Jayavant Dalvi)
- जिथली वस्तू तिथे (Jithali vastu tithe) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- जरा जाउन येतो (jara jaun yeto) – दि. बा. मोकाशी (D. B. Mokashi)
- झांझिबारी मसाला (Zanzibari Masala) – उमेश कदम (Umesh Kadam)
- तत्रैव (tatraiv)-राजन खान (Rajan Khan)
- थोरली पाती (Thorali Pati)-ग.दि.माडगूळकर(Ga.Di. MadaguLakar)
- द्विदल (Dwidal) – डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondake)
- निळ्या दाताची दंतकथा (Nilya Datachi Dantakatha) – प्रणव सखदेव (Pranav Sakhadeo )
- नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) – केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक – संजय बापट (Sanjay Bapat)
- पश्चिम(Paschim)-विजया राजाध्यक्ष (Vijaya Rajadhyaksha)
- प्रवेश (Pravesh) लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- भोकरवाडीतील रसवंतीगृह (bhokarawadItIl rasavantIgruh) -द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
- मालवणी कथा (Malavani Katha)
- रंगांधळा (Rangandhala) – रत्नाकर मतकरी (Ratnakar Matakari)
- राशोमोन आणि इतर जपानी कथा (Rashomon Ani Itar Japani Katha)
- वेगळं जग (Vegale Jag) – गंगाधर गाडगीळ (Gangadhar Gadgil)
- शिन्झेन किस (Shinzek Kiss) – शिन्इची होशी Shinichi Hoshi – अनुवादक – निस्सीम बेडेकर (Nissim Bedekar)
- ही आगळी कहाणी (hi aagali kahani)-निलेश नामदेव मालवणकर (Nilesh Namdev Malavanakar)
- हास्यमुद्रा (Hasymudra) – मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)
- अनाहत (Anahat) – प्रणिता खंडकर (Pranita Khandkar)
- गोल्पे विभोर (Golpe Vibhor) – बाणी बसू (Bani Basu) अनुवादक – सुमती जोशी (Sumati Joshi)
- ५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा (5960 Ani itar chittchakshuchamatkarik katha) – इमॅन्युअल व्हिन्सेंट सँडर (Emanuel Vincent Sander)
- माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti) – छाया महाजन (Chhaya Mahajan)
- क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी (Ksha kshullakachi balck comedy) – श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar)
- बे दुणे पाच (Be dune pach) – सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
- राक्षस आणि पोपटाची ॲडल्ट कथा (Rakshas ani popatachi adult katha) – श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar)
- प्रीत ही बावरी (Preet hi baawari) – अविनाश गडवे (Avinash Gadwe)
- माझी जन्मखेप (Mazi Janmkhep) लेखक – मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste)
- शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete) – क्षितिज देसाई (Kshitij Desai)
- महानगर (Mahanagar) – मिलिंद बोकील (Milind Bokil)
- जपानी लघुकथा भाग एक, दोन (Japani laghukatha Part 1& 2) -सुजाता गोखले (Sujata Gokhale)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३६८वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link







