

पुस्तक – कॅडबरी (Cadbury)
लेखक – निकेतन तावडे (Niketan Tawde)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २०४
प्रकाशन – राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २०२६
छापील किंमत – रु. ३८०/-
ISBN – 978-93-48736-33-8
लहान मुलांना काय खायला आवडतं ? बिस्किटं, चॉकलेट, कॅडबरी, वेफर्स, मॅगी, लेज, कुरकुरे, ओरियो … यादी खूप मोठी आहे. पण ह्या यादीकडे आज जरा वेगळ्या नजरेने बघा. बिस्किटं, चॉकलेट आणि वेफर्स हे पदार्थ आहेत; लेज, ओरियो ही विशिष्ट नावं आहेत. तर चॉकलेटच्या कुठल्याही मोठ्या बारला आपण कॅडबरी म्हणतो. नूडल्सना आपण सर्रास मॅगी म्हणतो. प्रत्यक्षात ही कंपनीची नावं आहेत हे आपण विसरून जातो इतकं त्या कंपन्यांनी आपल्या जीवनात आणि मनात स्थान मिळवलं आहे. “कॅडबरी” कंपनीला हे कसं जमलं, त्यासाठी त्यांनी काय काय केलं, सुरुवात कुठून झाली हे सगळं समजून घ्यायची तुम्हाला इच्छा आहे का ? इच्छा असेल, तर एका हातात “कॅडबरी डेरी मिल्क” घेऊन दुसऱ्या हातात “कॅडबरी” पुस्तक वाचायची कल्पना कशी वाटते आहे ?
लेखक निकेतन तावडे हे स्वतः चॉकलेटच्या पदार्थांच्या निर्मितीत कार्यरत आहेत. चोकोइलेट (Chocoelate pvt ltd) ही त्यांची कंपनी चॉकलेटचे बुके आणि गिफ़्ट हॅम्पर बनवते. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

“कॅडबरी” हे कंपनीचं नाव हे खरं तर आडनाव आहे. आपल्याकडे जसे चितळे, हल्दीराम, पेठे, आठवले अशा आडनावांच्या कंपन्या आहेत तसंच. कौटुंबिक व्यवसायाची पार्श्वभूमी असणाऱ्या जॉन कॅडबरी ह्यांनी १८२४ मध्ये इंग्लंडमध्ये ” कॅडबरी टी अँड कॉफी” असं दुकान काढलं. तिथून पुढे त्यांचं लक्ष तेव्हा नव्याने बाजारात जोर धरू लागलेल्या “कोको बियांच्या पेयाकडे” गेलं. सुरुवातील चहाकॉफी प्रमाणेच “कोको”चे सुद्धा पेयच असायचे- “चोकोलात”. इंग्लंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, इतर युरोपीय देश सगळीकडे हे पेय प्रसिद्ध होत होते. उद्योगी लोक ह्यात नवनवीन प्रयोग करून बघत होते. त्यातून कंपन्या सुरु करून नशीब अजमावत होते. कॅडबरी, नेस्ले, हर्षे, क्राफ़्ट, लिंड् अशी आत्ता प्रसिद्ध असणाऱ्या कंपन्यांची सुरुवात तेव्हाची आहे. ह्या पुस्तकात लेखक आपल्याला त्या काळात घेऊन जातात. खरं म्हणजे त्याही आधी.
“कोको” ला दक्षिण/मध्य अमेरिकी देशांच्या जुन्या आदिवासी जमाती “ककाव” म्हणत. ते कडू पेय शक्तीवर्धक समजले जायचे. त्यांच्याकडून युरोपियन व्यापाऱ्यांमार्फत कोकोच्या बिया आणि पेय युरोपात आले. हा सगळा इतिहास वाचण्यासारखा आहे “थिओब्रोमा”, “चॉकोलेट” ह्या शब्दांचा जन्म कसा झाला हे वाचणं खूप रंजक आहे.
“कोको”चे पेय प्रसिद्ध झाले. त्याचा कडवटपणा घालवण्यासाठी पुढे त्यात साखर, दूध, घालणं, ते घट्ट बनवणं असे प्रयोग सुरु केले. असे प्रयोग यशस्वी झाले की बाजारात त्या कंपनीचा दबदबा वाढे. मग इतर कंपन्यांना नवं काहीतरी करण्याची गरज पडे. त्यातून “कॅडबरी” आणि इतर कंपन्यांची “डेअरी मिल्क”, “किटकॅट”, “टॉब्लेरॉन” अशी गाजलेली उत्पादने तयार झाली. त्यामुळे पुस्तक वाचताना फक्त “कॅडबरी” कंपनीच नाही तर एकूण चॉकलेट उद्योगाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. व्यावसायिक स्पर्धा अनिवार्यच पण दोन महायुद्धांच्या झळाही कंपनीला बसल्या. वैयक्तिक, कौटुंबिक धक्के पचवावे लागले. त्यातून तावून सुलाखून बाहेर पाडण्यासाठी “कॅडबरी कुटुंबियांच्या चार पिढ्यांनी” कसे कसे योगदान दिले ह्याची सविस्तर माहिती पुस्तकात येते.
“कॅडबरी” कुटुंबीयांकडे व्यावसायिक हुशारी बरोबर, नीतिमत्ता आणि सामाजिक दायित्वाची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी मोठी जागा विकत घेऊन तिथे कंपनी आणि कर्मचाऱ्यांची वसाहत “बोर्नव्हिल” वसवले. अजून बरीच समाजोपयोगी कामे केली त्याचीही माहिती पुस्तकात प्रसंगोपात येते. “कॅडबरी”च्या गोडव्याला असलेला माणुसकीचा गोडवा लोभस वाटतो.
पुस्तकाच्या शेवटच्या भागात अमेरिकन “क्राफ़्ट” कंपनीने “कॅडबरी” कंपनीचे अधिग्रहण कसे केले, त्यासाठी भांडवली बाजारात अधिकाधिक समभाग (शेअर्स) विकत घेणे, डिव्हीडंड देणे वगैरे आर्थिक डावपेचांचा तांत्रिक भागही आला आहे. कुटुंबाचे अधिपत्य जाऊन ती दुसऱ्यांच्या मालकीची झाली आणि कंपनीचा नवा प्रवास सुरु झाला.
कॅडबरी कंपनीचा भारतात प्रवेश, उद्योगविस्तार ह्याबद्दल शेवटचे प्रकरण आहे.
कंपनीचे नेतृत्व करणारे शेवटचे “कॅडबरी” बंधू एकमेकांशी गप्पा मारतायत असे पुस्तकाचे स्वरूप आहे. कंपनीवर आता कुटुंबीयांचा ताबा राहणार नाही ह्या भावनेतून ते भूतकाळाला उजाळा देतायत अशा प्रकारे प्रकरणांची सुरुवात आणि शेवट संवादाने होते. मध्ये त्रयस्थ निवेदक माहिती देतो अशा प्रकारे लेखनशैली आहे.
आपण दुकानातून विकत आणतो ती कॅडबरी म्हणजे गोड पदार्थ. गोड खायला मुलांना आणि मोठ्या माणसांनाही आवडतंच. त्यामुळे गोड पदार्थ तयार करणं आणि विकणं हे तर सोपं काम, त्यामुळे कंपनी प्रसिद्ध झाली, भरपूर पैसे कमावले असं आपल्याला वाटलं तर नवल नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की कोको बियांपासून चॉकलेट हा प्रवास आणि एका छोट्या चॉकलेट बनवणाऱ्या व्यक्तीपासून बहुराष्ट्रीय कंपनी पर्यंतचा प्रवास दोन्ही सोपे नाहीत. म्हणूनच “एका गोड उद्योगाचा खडतर जगप्रवास” हे उपशीर्षक योग्य आहे.
आता काही पाने उदाहरणादाखल वाचा
व्यावसायिक स्पर्धा नवीन उत्पादन तयार करायला कशी भाग पाडते.


ह्या पुस्तकाचे एक प्रकाशन डोंबिवलीत २९ ऑगस्ट २०२६ ला झाले होते. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो.
कार्यक्रमाचे अजून फोटो आणि व्हिडीओ बघण्यासाठी लिंक https://www.facebook.com/kaushik.lele/posts/pfbid0UNLbu5PvzJm28qbFNmwjxNZ93hE2tgQECrBoMuueGje1kAGyBxRKFf7SNBrr1ippl
निवेदनाच्या ओघात ह्या क्षेत्रातल्या खूप वेगवेगळ्या लोकांची आणि घटनांची नावं, सनावळ्या येतात. पुस्तक पूर्ण केल्यावर कदाचित ते तपशील पूर्णपणे लक्षात राहतील असं नाही. मात्र चॉकलेट उद्योगाचे महत्त्वाचे टप्पे, किस्से, व्यावसायिक स्पर्धेचं मर्म, सहृदय उद्योजकांचे गुण ह्या गोष्टी मनात नक्की रेंगाळतील. मग घ्या कॅडबरी हातात !
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
उद्योग, तंत्रज्ञान, विशेष व्यावसायिक अनुभव ह्यांच्यावरील इतर पुस्तकांची मी लिहिलेली परिक्षणे
- आघाडीचे महिला नेतृत्व (Aaghadiche mahila netrutv ) – सुधा मेनन (Sudha Menon)- अनुवाद : सुमिता बोरसे (Sumita Borase)
- इंडियाज रेल्वेमॅन (India’s railwayman) – राजेंद्र बी. आकलेकर (Rajendra B. Aklekar) अनुवाद – अनुराधा राव (Anuradha Rao)
- ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre) – आलोक शुक्ल (Alok Shukla) – अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)
- कथा मारुती उद्योगाची Katha Maruti Udyogachi- आर. सी. भार्गव(R.C. Bhargav) – अनुवाद :- जॉन कोलासो (John Colaco)
- काचेपलीकडचे जग (kachepalikadache jag) – विद्याधर म्हैसकर (Vidyadhar Mhaiskar)
- काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale – Sahavedanetun Samruddhikade) – वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashikar)
- जंक्शन (Junction) – विनायक रत्नपारखी (Vinayak Ratnaparakhi)
- टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn) – सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
- टाटा एक विश्वास (Tata Ek Vishwas) – माधव जोशी (Madhav Joshi)
- द आंत्रप्रेन्यूअर (The Entrepreneur) – शरद तांदळे (Sharad Tandale)
- निकोला टेस्ला (Nikola Tesla) – सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar)
- प्रदीप लोखंडे, पुणे-१३ (Pradip Lokhande, Pune-13) – सुमेध वडावाला(रिसबूड) (Sumedh Wadawala (Risbud)
- पांडेपुराण (Pandepuran) – पीयूष पांडे (Peeyush Pandey) – अनुवाद – प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
- पोलादी (Poladi) – अनुजा तेंडोलकर (Anuja Tendolkar)
- पासबुक माझ्या आयुष्याचं (Passboook Mazya Ayushyache) – आरती संजय कार्लेकर (Arati Karlekar)
- द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)-डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick) – अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- ब्राह्मोस (Brahmos) – ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai) अनुवादक – अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
- ब्रँड गुरु (Brand Guru) – जान्हवी राऊळ (Janhavi Raul)
- भारतीय उद्योगातले ऑनलाईन आयडॉल्स (Bharatiya Udyogatale Online Idols) – अनुराधा गोयल (Anuradha Goyal) – अनुवादिका :शुभदा पटवर्धन (Shubhada Patwardhan)
- भारताची अणुगाथा (Bharatachi Anugatha) – आल्हाद आपटे (Alhad Apte)
- माझंही एक स्वप्न होतं(majhahi ek swapna hota) – वर्गीस कुरियन(Verghese Kurien) (अनुवाद – सुजाता देशमुख)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi) माधव जोशी (Madhav Joshi)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- रुसी मोदी – द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (Rusi Modi : The man who also made steel) – पार्थ मुखर्जी, ज्योती सबरवाल (Partha Mukherjee & Jyoti Sabharwal ) – अनुवादक : अंजनी नरवणे (Anjani Naravne)
- रुळानुबंध (Rulanubandh) – गणेश मनोहर कुलकर्णी (Ganesh Manohar Kulkarni)
- रेडी फॉर टेक ऑफ (Ready for take off) – सचित जैन (Sachit Jain) अनुवाद – शुभदा पटवर्धन (Shubhada Patawardhan)
- लीन इन (Lean in) – शेरिल सॅंडबर्ग (Sheryl Sandberg) – अनुवाद : अशोक पाध्ये (Ashok Padhye)
- स्ट्रगलर्स (Strugglers) लेखिका : मुक्ता चैतन्य (Mukta Chaitanya)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya) लेखक – गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
- स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) – डॉ. अनंत लाभसेटवार (Dr. Anant Labhsetwar)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- AADHAR-A Biometric history of India’s 12-Digit Revolution आधार-अ बायोमेट्रिक हिस्टरी ऑफ इंडिया’ज १२-डिजिट रिव्हॉल्युशन – Shankar Aiyar ( शंकर अय्यर )
- The Baba Ramdev Phenomenon (द बाबा रामदेव फेनॉमेनन) – Kaushik Deka (कौशिक डेका)
- Chandrayaan-3 (चंद्रयान – ३) – अजेय लेले (Ajey Lele)
- Jugaad Innovation जुगाड इनोव्हेशन – Navi Radjou (नवी राजू), Dr. Jaideep Prabhu (डॉ. जयदीप प्रभू),Dr. Simone Ahuja (डॉ. सिमॉन अहुजा)
- Lost and Founder (लॉस्ट अॅंड फाउंडर) – Rand Fishkin (रॅंड फिश्किन)
- Squaring the blockchain (स्क्वेअरिंग द ब्लॉकचेन ) – Kunal Nadwani (कुणाल नंदवानी )
- The TCS Story & Beyond (द टीसीएस स्टोरी अॅंड बियॉंड) – S. Ramadorai एस. रामदुरै
- The Watson Dynasty(वॉटसन डायनॅस्टी)-Richard S. Tedlow(रिचर्ड एस.टेड्लोव)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३७२वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link







